ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाची तयारी सुरू, या ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या लग्नाची तयारी सुरू, या ठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

अभिनेता राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. गेले काही वर्ष दोघं एकमेकांना डेट करत आहेत. बऱ्याचदा ही जोडी एकत्र कार्यक्रमांना उपस्थित असते. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमार आणि पत्रलेखा 10,11,12 नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत अशा चर्चा आहे. मात्र याबाबत दोघांकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर न आल्यामुळे हे लग्न एक सिक्रेट वेडिंग असण्याची शक्यता आहे. 

भूमी पेडणेकरने शाहिदसोबत काम करण्यास दिला नकार, जाणून घ्या कारण

कसा रंगणार विवाहसोहळा

दिवाळी आधीपासून राजकुमार आणि पत्रलेखा यांची सुरू असलेली खरेदीची लगबग पाहून असा अंदाज लावण्यात येत आहे की आजपासून विवाहसोहळ्याला सुरूवात होणार आहे. दिवाळी पार्टीसाठीही अनेक ठिकाणी राजकुमार आणि पत्रलेखाने एकत्र हजेरी लावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून चंदिगढमध्ये त्यांच्या विवाहसोहळ्याला सुरूवात होणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच हे कपल त्यांच्या कुटुंबासोबत चंदिगढला जाऊन आले होते. लग्नाच्या तयारीसाठीच सर्वजण चंदिगढला गेले होते असा अंदाज आहे. चंदिगढ आधी अनेक वेडिंग डेस्टिनेशन राजकुमार आणि पत्रलेखाने ठरवले होते मात्र शेवटी त्यांनी चंदिगढमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

पूनम पांडे पुन्हा चर्चेत, पतीविरोधात केली तक्रा

ADVERTISEMENT

बॉलीवूडमध्ये लागोपाठ रंगणार विवाह सोहळ्याची धमाल

बॉलीवूडमध्ये सध्या अनेक सेलिब्रेटींच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये आलिया-रणबीर, विकी- कतरिना आणि राजकुमार- पत्रलेखा यांची नावे आहेत. मात्र या सर्वांमध्ये राजकुमार आणि पत्रलेखा लवकर बाजी मारणार असं दिसत आहे. सुरुवातीला यांचे लग्न पिंक सिटी जयपूरमध्ये पार पडणार अशी चर्चा होती, मात्र आता त्यांच्या लग्नाचे डेस्टिनेशन बदलले आहे. आजपासून चंदिगढमध्ये हा विवाहसोहळा रंगण्याची शक्यता आहे. पत्रलेखाला साध्या पद्धतीने आणि विधीपूर्वक लग्न करायचं आहे. या सोहळ्याला नातेवाईक आणि बॉलीवूडमधील काही मोजक्या जवळच्या पाहुण्यांना आमंत्रण असेल. यासाठी पत्रलेखाचे कुटुंब शिलॉंगमध्ये तयारीला सुद्धा लागले आहे. त्यानंतर मुंबईतही एक रिसेप्शन पार पडणार आहे. कोविडमुळे नियमांचे पालन करत एक छोटासा कार्यक्रम मित्रमंडळींसाठी मुंबईत केला जाणार आहे.

अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडमध्ये पूर्ण झाली 52 वर्ष, शेअर केल्या जुन्या आठवणी

10 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT