ADVERTISEMENT
home / मनोरंजन
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नव्या ‘दया बेन’ची एन्ट्री

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नव्या ‘दया बेन’ची एन्ट्री

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे.  गेली अनेक वर्ष टेलीव्हिजनवर लोकप्रियता मिळवण्यात या मालिकेला चांगलंच यश मिळालं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांचे प्रेम आहे. जेठालाल आणि दयाबेन या तर प्रेक्षकांच्या अतिशय आवडत्या भूमिका आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या शोमधून दया बेन साकारणारी दिशा वकानी अचानक गायब झाली होती. गरोदरपण, बाळाचं संगोपनासाठी तिने मालिकेतून एक्झिट घेतली होती. 2017 साली तिने गरोदरपणामुळे मालिका सोडली होती.  प्रेक्षक आणि निर्मात्यांनी दिशाला पुन्हा मालिकेत आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तिच्यासाठी अनेक काळ वाट पाहिली. मात्र दिशाकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता शेवटी कंटाळून निर्मात्यांनी नव्या दयाबेनचा शोध घेण्यास सुरूवात केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या दयाबेनसाठी ऑडिशनला सुरूवात झाली असून एक नाव यासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे.

कोण असणार नवी दयाबेन

दया बेनच्या पात्रामध्ये दिशा वकानीने अक्षरशः जीव ओतून काम केलं होतं. तिचा आवाज, तिची स्टाईल सर्वांपेक्षा हटके होती. मात्र बाळंतपणानंतर  तिने मालिकेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. ज्याचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होऊ लागला. सर्वांना आजवर वाटत होतं की दयाबेन साकारणं इतर कोणालाही जमणार नाही. त्यामुळे आजवर दयाबेन परत येईल याची निर्मात्यांनी वाट पाहिली. पण आता त्यांनी हम पांचमधील ‘स्विटी’ म्हणजेच राखी विजनची निवड केली आहे. राखी विजनने नव्वदच्या काळात हमपांच मालिकेत एक असंच हटके पात्र साकारलं होतं. ज्यामुळे ती दया बेनसाठी योग्य आहे असं निर्मात्यांना वाटत आहे.

 

राखी विजनला प्रेक्षक स्वीकारतील का दयाबेन म्हणून

दया बेनचं पात्र दिशाने इतकं छान निभावलं होतं की तिच्या जागी दुसऱ्या कोणाला पाहणं प्रेक्षकांसाठी सोपं नसेल. मात्र राखी विजनचाही एक मोठा चाहता वर्ग आहे. तिने हमपांच मालिकेसोबतच देख भाई देख , बनेगी अपनी बात या मालिकेतून नव्वदच्या दशकात घरोघरी लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ती नागिनच्या चौथ्या सीझनमध्ये झळकली होती. अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये राखीने काम केलेलं आहे. त्यामुळे निर्मात्यांनी राखीला दयाबेनच्या भूमिकेसाठी फायनल केलं आहे. आता प्रेक्षक या नव्या दयाबेनला कितपत स्वीकारतात आणि पुन्हा तारक मेहता या मालिकेला तितकंच प्रेम देतात का हे येणाऱ्या काळात लवकरच समजणार आहे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

19 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT