अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’बाबत चाहत्यांना खूपच उत्सुकता लागली आहे. मुळातच कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये रखडल्यामुळे गेली तीन वर्ष चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचं टीझन नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. लवकरच म्हणजे पंधरा जूनला ब्रम्हास्त्रचा ट्रेलर प्रदर्शित होईल. चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत असला तरी त्याचे प्रमोशन जोरदार सुरू झालं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी निर्माता राजमौलीसह विशाखापट्टणमला गेले होते. या ठिकाणी चाहत्यांनी दोघांचे जंगी स्वागत करण्यात आले. रणबीर आणि अयानसोबत यावेळी चित्रपटाचे निर्माते एस.एस.राजमौलीदेखील होते.
कसं झालं रणबीरचं स्वागत
रणबीर, अयान आणि राजमौली विशाखापट्टणममध्ये दाखल होताच चाहत्यांनी मोठ्या संख्येमध्ये गर्दी करत एअर पोर्टवरच त्यांचे स्वागत केले. रणबीरवर चाहत्यांनी अक्षरशः फुलांचा वर्षाव केला. रणबीरच्या नावाची घोषणा करत चाहत्यांनी त्यांचे प्रेम व्यक्त केले. यावेळी रणवीरने पांढऱ्या रंगाचा कुरता पायजमा परिधान केला होता. रणबीर, राजमौली आणि अयान मुखर्जी एका ओपन कारमधून प्रवासाला निघाले. त्यांच्या कारमागे मोठ्या संख्येने चाहते चालत होते. या रोड शो दरम्यान एक भव्य दिव्य फुलांचा हार क्रेन द्वारे रणबीरला घालण्यात आला. चाहत्यांचे प्रेम पाहून रणबीरदेखील काही क्षणांसाठी भारावून गेला. त्याने चाहत्यांना लवकरच ब्रम्हास्त्रबाबत अपडेट देणार असल्याचं जाहीर केलं.
‘ब्रम्हास्त्र’चा टीझर
रणबीरच्या विशाखापट्टणम दौऱ्यानंतर लगेच धर्मा प्रॉडक्शनने ब्रम्हास्त्रचं टीझर प्रदर्शित केलं. काही मिनीटांमध्येच या टीझरला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. जर टीझर इतका धमाकेदार आहे तर, विचार करा ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित केल्यावर चाहते काय करतील. या ट्रेलरमधून रणबीर, आलिया, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय यांचे लुक प्रेक्षकांसमोर आले आहेत. ब्रम्हास्त्र एक असा भव्य दिव्य चित्रपट असेल जो राजमौलीच्या बाहूबलीला टक्कर देऊ शकतो. यासाठी यामध्ये खास विएफक्स आणि एक्शनचे जबरदस्त कॉम्बिनेशन वापरण्यात आलेले आहे. मौनी यामध्ये एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आता चाहत्यांना पंधरा जूनला प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरचे वेध लागले आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक