बॉलीवूडचे अनेक कलाकार सध्या आईबाबा होण्याचा आनंद घेत आहेत. करिना कपूर आणि सैफ अली खानचा दुसरा मुलगा जेह सध्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आईबाबा झाल्यानंतर आता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणकडून आता चाहत्यांना अपेक्षा आहेत. नुकतंच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण रणवीरच्या आईच्या बर्थडे पार्टीसाठी एकत्र दिसले होते. मात्र त्यावेळी दीपिका गरोदर असल्याचं मुळीच जाणवलं नव्हतं. मात्र त्यानंतर परिणिती चोप्राच्या चॅट बॉक्समधील व्हायरल मेसेजमुळे चाहते चांगलेच गोंधळात पडले आहेत. कारण या मेसेजमध्ये परिणितीने चक्क रणविरलाच “तू बाबा झालास का” असा प्रश्न विचारला आहे.
अभिनेता शाहीर शेखच्या पत्नीचे झाले बेबीशॉवर, सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल
काय आहे हा व्हायरल मेसेज
रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या लग्नाला नोव्हेंबरमध्ये तीन वर्षे पूर्ण होतील. त्यांनी आता बाळाचा निर्णय खरंच घेतला आहे का ते माहीत नाही मात्र चाहत्यांना ‘रणवीर बाबा’चं बाळ पाहण्याची खूपच घाई झालेली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाला आहे. परिणिती चोप्राने स्वतः रणवीरकडे या प्रश्नाचं उत्तर मागितल्यामुळे चाहते चांगलेच हैराण झाले आणि हा मेसेज बघता बघता व्हायरल झाला. परिणिती चोप्राच्या चॅट बॉक्समध्ये रणवीरबाबत प्रश्न विचारल्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. आता या प्रश्नाचं उत्तर फक्त रणवीर आणि दीपिकाच देऊ शकतात.
महाएपिसोडनंतर प्रेक्षकांचा संताप, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ बंद करण्याची मागणी
व्हायरल मेसेजमुळे चाहते गोंधळात
कलाकार बऱ्याचदा चाहत्यांसोबत थेट संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर खास चॅट करतात. ज्यामध्ये ते स्वतः चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. अभिनेत्री परिणिती चोप्राही असंच चॅट करत होती. तिच्याबाबत विचारलेल्या अनेक प्रश्नांची तिने चाहत्यांना उत्तरे दिली. एवढ्यात एका चाहत्याने असा प्रश्न विचारला की ती स्वतःच संभ्रमात पडली. या चाहत्यांने परिणितीला प्रश्न विचारला की, रणविर सिंह बाबा झाला का ? या मेसेजला मजेशीर उत्तर देण्यासाठी परिणितीने हा प्रश्न थेट रणवीर सिंहला टॅग केला. ज्यामुळे आता रणवीर सिंह बाबा झाला का या प्रश्नाचे उत्तर थेट रणवीरलाच द्यावे लागेल. मात्र अजून रणवीरकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. याचा अंदाज चाहते लावत आहेत. कदाचित रणवीर आणि दीपिका खरंच बाळाची तयारी करत असतील ज्यामुळे या प्रश्नाला उत्तर देण्यास ते सध्या तयार नाहीत. असो काही असलं तरी रणवीर आणि दीपिकाचं बाळ हा सोशल मीडियावरील एक खास चर्चेचा विषय नक्कीच असेल. कारण 14 नोव्हेंबर 2018 ला हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. रणवीर आणि दीपिकाचा लग्नसोहळा चाहत्यांसाठी खूप खास ठरला होता. आता तसाच आनंद चाहत्यांना रणवीर दीपिका आईबाबा झाल्यावर घ्यायचा आहे.
‘रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात दिसणार अभिनेत्री मोनालिसा बागल