ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
republic-day-2022-special-look-fashion-ideas-in-marathi

प्रजासत्ताक दिनी असे दिसा स्टायलिश

प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा देशभरात एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतो. 1950 मध्ये याच दिवशी संविदान लागू करण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधानापैकी एक समजण्यात येते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील नागरिकांना मिळालेले अधिकार आणि त्यांचे कर्तव्य, नीति मार्गदर्शन तत्व अशा गोष्टी देशातील नागरिकांना समानतेने आणि स्वतंत्रपणे जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून देते. हा दिवस साजरा करण्यासाठी आपण राहात असलेल्या ठिकाणी झेंडावंदन करतो आणि वेगवेगळे कार्यक्रम आखतो. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी जायचं असेल आणि स्टायलिश दिसायचं असेल तर काही खास स्टाईल टिप्स फॉलो कराव्या लागतात. प्रजासत्ताक दिन 2022 मध्ये तुम्हालाही दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा या टिप्स आणि कार्यक्रमाला हजर राहून द्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

तिरंगापासून घ्या प्रेरणा 

Republic day fashion ideas – Instagram

आपल्या तिरंग्याचे तीन रंग हे वेगवेगळा संदेश देतात. केशरी, पांढरा आणि हिरवा या रंगापासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या कपड्यांची स्टाईल करू शकता. केशरी रंग हा त्यागाची भावना दर्शवितो तर सफेद अर्थात पांढरा रंग हा शांती आणि समरसतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग हा देशातील समृद्धीचे प्रतीक आहे. देशातील आनंदी भावना व्यक्त करताना या तिन्ही रंगाचे कॉम्बिनेशन असणारी साडी अथवा ड्रेस तुम्ही या दिवशी नक्कीच परिधान करू शकता. तुम्ही ज्या कपड्यांमध्ये आरामदायी फील कराल असे कपडे या दिवशी घाला आणि प्रजासत्ताक दिन साजरा करा. यासह तुम्ही तिरंगी बांगड्या अथवा तिरंगी कानातलेदेखील घालून स्टाईलला चार चाँद लाऊ शकता. 

एथनिक ड्रेस घाला

रोज आपण वेगवेगळ्या स्टाईल्सचे ड्रेस घालतो. पण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय परंपरा आणि सन्मान दर्शविताना अनेकदा एथनिक लुक अथवा पारंपरिक पद्धतीचे कपडे घालून आपण स्टाईल करू शकतो. विशेषतः खादी कपड्यांमध्ये आपल्याला हा दिवस साजरा करायला अधिक आवडतो. सध्या खादी कपड्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे खादीचा सलवार सूट अथवा खादीचा कुरता परिधान करून त्यावर ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा वापर केल्यास तुम्ही अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसता. तुम्हाला ऑफिस अथवा सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही खादीचे कपडे घालून अधिक स्टायलिश दिसू शकता. 

ट्राय करा फ्युजन ड्रेस 

Fusion style for republic day 2022 – Instagram

तुम्हाला जर संपूर्ण एथनिक ड्रेसचा लुक नको असेल तर तुम्ही फ्युजन ड्रेस ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही तिरंग्यातील तुमच्या आवडता कोणताही रंग घालू शकता. जंपसूट असो अथवा ऑफ शोल्डर असो कोणतीही स्टाईल तुम्ही करू शकता. जंपसूट असेल तर अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतो. यावर तुम्ही चोकर अथवा लांब कानातले घालून तुमचा लुक अधिक स्टायलिश करू शकता. याशिवाय तुम्ही घातलेल्या कपड्यांवर स्कार्फ अथवा दुपट्टा गेऊन अधिक स्टायलिश दिसू शकता. ऑफशोल्डर कुरता असेल तर यावर स्कार्फची स्टाईल करून तुमचा लुक तुम्ही पूर्ण करू शकता. 

ADVERTISEMENT

भारतीय कपड्यांना द्या महत्त्व 

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या देशाविषयी आपण भावना व्यक्त करत असतो. त्यामुळे खादीशिवाय टसर, कॉटन अशा भारतीय कपड्यांना प्राधान्य द्या. याशिवाय ड्रेसेससह तुम्ही दुपट्टा अथवा श्रग पेअर करू शकता. जे तुमच्या सौंदर्यामध्ये अधिक भर टाकतील. 

यापैकी कोणतीही स्टाईल तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नक्की ट्राय करू शकता. यावेळी केवळ साडी अथवा ड्रेस न घालता अधिक स्टाईलिश दिसण्यासाठी या टिप्स नक्की ट्राय करा आणि मिळवा सुंदर लुक!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT