रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही मराठमोळी जोडी सर्वांनाच आपलीशी वाटते. त्यांचे फॅन फॉलोईंगदेखील खूप मोठे आहे. रितेश आणि जेनेलिया दोघेही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. मात्र आता या दोघांनीही आपल्या आयुष्याबाबत असा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच अधिक वाढ होणार आहे. रितेश आणि जेनेलियाने डॉक्टर्स डे च्या दिवशी आपला हा निर्णय सर्व चाहत्यांना सांगून पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत.
#WomenisPower – निर्माता विकास गुप्ताने केली पहिली #pride पोस्ट
दोघेही करणार अवयव दान
रितेश आणि जेनेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी अवयवदान करणार असल्याचे सांगितले आहे. आपण अवयवदान करणार असल्याची आज प्रतिज्ञा घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं असून आपल्या चाहत्यांनाही त्यांनी यासाठी विचार करण्यास सांगितलं आहे. अवयव दान हे सर्वात मोठं दान असून त्यामुळे अनेक जीव वाचू शकतात. याचं महत्त्व गेले कित्येक वर्ष डॉक्टरही सांगत आहेत. त्यामुळे डॉक्टर्स डे च्या दिवशी हा मोठा निर्णय या दोघांनी घेऊन सध्याच्या या कोरोनाच्या काळात अतिशय योग्य निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरातून येत आहे. मनोरंजन क्षेत्रातील अनेक जणांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत रितेश आणि जेनेलियाचे कौतुक केले आहे. रितेशने आपण गेल्या कित्येक वर्षापासून यावर विचार करत असल्याचे सांगून शेवटी आता योग्य निर्णय घेत असल्याचे म्हटलं आहे. रितेश आणि जेनेलियाच्या या निर्णयामुळे आता अनेक जण पुढे येतील अशीही प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटताना दिसून येत आहे. यावर अभिषेक बच्चन, फराहा खान कुंदर, सुनील शेट्टी, रितेशचा लहान भाऊ धीरज देशमुख, आदिनाथ कोठारे, जितेंद्र जोशी अशा अनेक रितेशच्या मित्रमैत्रिणींनी त्यांचं कौतुक करत आणि अभिनंदन करत प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आणि कौतुकास्पद असल्याचेच सर्वांनी म्हटलं आहे.
होम डिलिव्हरी झालेल्या भाज्या पाहून अभिनेत्री जुही चावला संभ्रमात
रितेश नेहमीच सामाजिक कार्यात पुढे
रितेश देशमुख हा खरं तर राजकारणी घराण्यातून असल्याने आणि विलासराव देशमुखांचा मुलगा असल्याने अनेकदा सामाजिक कार्यातही पुढे दिसून आला आहे. पूर्णतः राजकारणामध्ये जरी रितेशने स्वतःला वाहून घेतलं नसलं तरीही अनेकदा आपल्या भावांबरोबर ठिकठिकाणी मदत करताना रितेश दिसून येतो. तसंच स्वतःच्या लातूर गावातल्या लोकांनाही रितेशने मदत केल्याचे नेहमी ऐकिवात येत असते. तर जेनेलियादेखील रितेशला तितकीच साथ देते. हे दोघेही नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याने त्यांच्या पोस्टमधून त्यांनी केलेली मदत अथवा इतर गोष्टीही त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहचत असतात. मात्र हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय दोघांनाही घेतला असून आता त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोघांचंही मनापासून कौतुक करण्यात सध्या त्यांचा चाहतावर्ग गुंतला असल्याचेही सोशल मीडियावर दिसून येत आहे. रितेश आणि जेनेलिया ही मराठमोळी जोडी नेहमीच आपल्या वागणुकीने सर्वांची मन जिंकून घेत आली आहे. इतकंच नाही तर आपल्या मुलांनाही त्यांनी त्याचप्रमाणे शिकवणूक दिली आहे. कोणालाही भेटताना नमस्कार करण्याचा संस्कार रितेश आणि जेनेलियाने आपल्या मुलांनाही घालून दिला आहे. त्यामुळे त्यांची मुलंही तितकीच प्रसिद्ध आहेत.