कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सध्या देशाची अत्यंत हालाखाची परिस्थिती आहे. रोज नवे नवे मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी दिसत आहेत आणि फोटोही बघायला मिळत आहेत. लोकांना दोन वेळचं खायलाही मिळत नाहीये. अनेक मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून खिशात पैसा नाही आणि खायला अन्नही नाही अशी अवस्था झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत आहे. त्यात बॉलीवूड स्टार्सही मागे नाहीत. पण आता मराठमोळ्या रितेशनेही असा एक फोटो शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे. रितेश नेहमीच सामाजिक कार्यातही पुढे असतो. मजुरांची ही अवस्था पाहून रितेशने अतिशय भावनिक पोस्ट केली आहे.
दीपिकाने कच्च्या कैरीचा फोटो केला शेअर, गरोदर असल्याचा चाहत्यांचा अंदाज
मजुरांना गावी जाण्यासाठी रेल्वेची मोफत सेवा द्या – रितेश
We as a country should bear the cost of migrants going back to their homes. Train services should be free. They (Labourers) are already burdened with no pay & no place to stay compounded with the fear of #covid19 infection. pic.twitter.com/lKK5KfKz7u
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 4, 2020
लॉकडाऊन संपेल आणि आपण आपल्या गावाला जाऊ या आशेवर अनेक क्षेत्रातील कामगार सध्या आहेत. पण लॉकडाऊन संपण्याची काहीच चिन्हं नसल्याने त्यांचीही अस्वस्थता वाढू लागली आहे. अनेक कामगार आता दूरचा प्रवास पायी करत चालले आहेत. अशा कामगारांना किमान गावी जाण्यासाठी रेल्वेने मोफत सेवा द्यावी अशी मागणी आता अभिनेता रितेश देशमुखने केली आहे. याविषयी त्याने ट्विट करत अगदी हृदयद्रावक असा फोटो त्याने पोस्ट केला आहे. आपल्या वृद्ध आईला कमरेवर उचलून घेतलेला मजून पायी प्रवास करत असल्याचा हा फोटो रितेशने पोस्ट केला आहे. त्यावर त्याने म्हटले आहे की, ‘देशामधील स्थलांतरित लोकांचा घरी परत जाण्याचा खर्च तरी किमान आपण उचलायला हवा. रेल्वेची सेवा त्यांना मोफत दिली पाहिजे. आधीच हे मजूर पगाराशिवाय आहेत, त्यात त्यांना राहण्यासाठी घर नाही आणि कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोकाही त्यांना अधिक आहे’. हा फोटो पाहून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. नुकतीच दोन दिवसांपूर्वी पहिली रेल्वे सोडण्यात आली. मात्र यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट आकारण्यात आले होते.
अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारुने शेअर केले हॉट फोटो
मजुरांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रातील मजूर अडकून पडले. रोजंदारीवर काम करणारे हे मजूर पैसे कुठून आणणार आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न दिवसेंदिवस वाढू लागला. सर्वच बंद असल्याने त्यांना आपल्या घरी परतणं योग्य वाटू लागलं. पण त्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि वाहतूक सुरू नाही. अशावेळी हतबल होऊन पायी प्रवास करणं त्यांना योग्य वाटू लागलं आणि असे अनेक फोटोही आपण व्हायरल होताना बघत आहोत. ज्यांना जितकं जमतं आहे ते मदत करत आहेत पण शासनानेही त्यांना मोफत रेल्वेसेवा द्यावी अशी मागणी आता रितेशने केली आहे. त्यांच्या खिशात पैसेच नाहीत तर ते प्रवास कसे करतील असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यांच्या जगण्यासाठी आपण हातभार लावण्यासाठी इतके करायला हवे असंही रितेशचे म्हणणे आहे.
मोठ्या पडद्यावर पुन्हा होणार इरफान खानची भेट
रितेशही करतोय मदत
रितेश देशमुख हा राजकारणी घरातील असला तरीही त्याने नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे. त्याची संवेदनशीलता नेहमीच दिसून येते. त्याचप्रमाणे आताही लॉकडाऊनमध्ये रितेश आणि त्याचे भाऊ आपल्या परीने जितकी मदत करता येईल ती करत आहेत. तसंच इतरांनीही हातभार लावावा यासाठीही प्रयत्न करत आहेत.