दिग्दर्शक आणि निर्माता रोहीत शेट्टी अभिनेता रणवीर सिंहच्या ‘दी बिग पिक्चर’ या गेम शोमध्ये सहभागी झाला होता. या शोच्या दिवाळी स्पेशल कार्यक्रमात रोहीत आणि रणवीरने मिळून त्यांच्या आगामी चित्रपट सूर्यवंशीचे प्रमोशन केले. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका आहे. मात्र रोहीतच्या सिंघम आणि सिम्बामधील अजय देवगण आणि रणवीर सिंह कॅमियो करताना दिसणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल झाला आहे. ज्यात चक्क रोहीत शेट्टी रणवीर सिंहला धमकी देताना दिसत आहे.
‘ओ माय गॉड 2’ मध्ये अक्षय कुमार साकारणार भगवान शंकर, फस्ट लुक केला शेअर
रोहीतने का दिली रणवीरला अशी धमकी
‘दी बिग पिक्चर’ या शोचा रणवीर सिंह सूत्रसंचालक आहे. रोहीतने या गेम शोमध्ये भाग घेतल्यामुळे त्याला काही प्रश्न विचारत त्याने शोला सुरूवात केली. मात्र प्रश्नांची उत्तरे देताना रोहीत रणवीरला म्हणू लागला की अरे जर मी या प्रश्नांची उत्तरे नाही देऊ शकलो तर माझी प्रतिष्ठा पणाला लागेल. जर मला या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर माझी बदनामी होईल. रणवीर देखील त्याच्या बोलण्यामध्ये साथ देत म्हणू लागला हे तर खरं आहे त्यामुळे तुला योग्य उत्तर आता द्यावंच लागेल. रोहीत रणवीरला म्हणाला तू तर मला मदत करण्याऐवजी माझ्यावर जास्त प्रेशर टाकत आहेस. खरंतर तू माझा मित्र आहेस त्यामुळे मला यासाठी मदत करायला हवीस. रणवीर त्यावर म्हणाला मला असं करण्याची परवानगी नाही. हे ऐकून रोहीत मस्करीच्या मूडमध्ये आला आणि तो रणवीरला म्हणू लागली की, ठीक आहे मग मी तूझा चित्रपटामधला रोलच कापून टाकतो,अजून सूर्यवंशी प्रदर्शित झालेला नाही. विचार कर आणि बोल.. असं इशारा करत त्याने रणवीरला सांगितलं. यावर रणवीर त्याला नको नको रे असं करू अशी विनवणी करू लागतो.
भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘अजिंक्य’ होणार नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित
सूर्यवंशी कधी होणार प्रदर्शित
रोहीत शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी येत्या पाच नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. मागील दोन वर्षांपासून हा चित्रपट कोरोनामुळे रखडला होता. त्यामुळे चाहत्यांना आता येत्या दिवाळीला चांगलीच मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. हा एक कॉप ड्रामा असून यामध्ये रोहीतच्या आधीच्या सिंघम, सिम्बा चित्रपटांचे नायक अजय देवगण आणि रणवीर सिंह यांची झलक एका हटके स्टाईलने पाहायला मिळणार आहे.
शनाया ऊर्फ रसिका सुनीलने केले प्रीवेडिंग शूट, लवकरच अडकणार लग्नबंधनात