ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा लवकरच करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा लवकरच करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

एखाद्या सेलिब्रेटीचा मुलगा अथवा मुलगी मोठी झाली की ते कशात करिअर करणार याकडे चाहत्यांचं लक्ष असतं. कलाकाराच्या मुलाने अभिनयात करिअर करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. स्टार कीड्स मोठे होताच त्यांच्या बॉलीवूड डेब्यूवर अनेकांच्या नजरा खिळून असतात. मात्र खेळाडूच्या मुलांने नेहमी स्पोर्ट्समध्ये करिअर करावं अशी क्रीडा प्रेमींची अपेक्षा असते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा मात्र याला अपवाद आहे. कारण सचिनची लाडकी लेक सारा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा आहे. साराच्या लुक्स आणि स्टाईलचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वीच साराचा स्पेशल चाहता वर्ग तयार आहे. आता ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

साराला अभिनयात आहे रस

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर एक लोकप्रिय स्टार कीड म्हणून ओळखली जाते. सध्या तिच्या इन्स्टा अकाऊंटवर 1.9 मिलीयन फॉलोव्हर्स आहेत. सारा तिचे वैयक्तिक जीवन, फिटनेस, सौंदर्य, वेकेशन असे अपडेट या माध्यमातून देत असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साराला आधीपासूनच अभिनयात करिअर करायचं होतं. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यात तिला सर्वात जास्त रस आहे. एवढंच नाही तर ती आता लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा आहे. ज्यासाठी ती सध्या अभिनयाचे धडे गिरवत आहे. साराने लंडन युनिव्हर्सिटीमधून मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे. पण असं असलं तरी साराला करिअर मात्र बॉलीवूडमध्येच करायचं आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सारा सर्व कौशल्य सध्या आत्मसात करत आहे. सहाजिकच वडील सचिन तेंडुलकरप्रमाणे सारादेखील जगात स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटवण्यात यशस्वी होईल अशी चाहत्यांना आशा वाटत आहे.

साराच्या करिअरसाठी सचिनचा पाठिंबा

कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो आईवडिलांचा पाठिंबा…साराचा अभिनयातील कल आणि बॉलीवूडमध्ये येण्याच्या निर्णयाबाबत तिला तिच्या आईवडिलांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. या आधीदेखील सारा शाहिद कपूरसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू करत असल्याची चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी सचिनने ही अफवा असल्याचं सांगत या चर्चेला पूर्णविराम लावला होता. कारण तेव्हा सचिनला साराने तिचं शिक्षण आधी पूर्ण करावं असं वाटत होतं. आता साराने तिचं शिक्षण पूर्ण केलं असून ती अभिनयाचं शिक्षणही घेत आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा साराच्या बॉलीवूड डेब्यूची चर्चा सुरू झाली आहे. सारा काही ब्रॅंडसोबत जोडली गेली असल्यामुळे ती जाहिरातींच्या माध्यमातूनही प्रेक्षकांसमोर लवकरच येण्याची शक्यता आहे. साराची स्टाईल आणि फॅशन सेंस अनेकांना आवडतो. त्यामुळे फॅशन क्षेत्रातही नावलौकिक मिळवू शकते. सारा बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार हे ऐकताच अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहे. सहाजिकच चाहत्यांचे सारा नेमक्या कोणत्या चित्रपटातून आणि कोणत्या भूमिकेतून बॉलीवूड पदार्पण करतेय याची उत्सुकता लागली आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT