मेरे करण- अर्जुन आयेंगे… हा डायलॉग सगळ्यांना नक्कीच माहीत असेल. चित्रपटात हे करण- अर्जुन येतात. पण प्रत्यक्षात मात्र करण- अर्जुन साकारणाऱ्या सलमान आणि शाहरुखमध्ये चांगलाच दुरावा आला होता. ते एकमेकांशी बोलत देखील नव्हते. पण आता त्यांच्यातला दुरावा मिटला आहे. हा दुरावा मिटण्याचे कारण होते एक इफ्तार पार्टी.. ही इफ्तार पार्टी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची.. याच इफ्तार पार्टीत एकमेकांना गळाभेट करुन शाहरुख आणि सलमानने त्यांच्यातील दुरावा मिटवून एकमेकांना मिठी मारली होती आणि त्यांचा मिलाप झाला होता. यावर्षी देखील ही पार्टी आयोजित करण्यात आली.
‘कसौटी जिंदगी की’मध्ये झाली मिस्टर बजाजची एंट्री
बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला बॉलीवूडची मांदियाळी
5 जून रमजान ईदचा दिवस आहे. संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधव उद्या रमजान साजरी करणार आहेत. पण त्या आधी अनेक ठिकाणी इफ्तार पार्टी रंगल्या आहेत. त्यात बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी फारच खास असते. कारण या पार्टीला सगळे बॉलीवूड लोटते. रविवारी नवी दिल्लीत ही इफ्तार पार्टी झाली. या पार्टीला अरबाज खान, जॉर्जिया अँड्रियांनी, लुलिया वन्तूर, सोहेल खान, सलीम खान, कतरीना कैफ, शाहरुख खान, अनुप सोनी, सुनीर ग्रोव्हर, रवीना टंडन आदी उपस्थित होते.या सगळ्यांनी ही इफ्तार पार्टीत चार चाँद आणले असेच म्हणायला हवे.
आरजू गोवित्रीकरला नवऱ्याकडून मारहाण, कोर्टाने नवऱ्याला काढले घराबाहेर
नाही झाली करण- अर्जुनची भेट
पण यंदाच्या पार्टीमध्ये करण- अर्जुनची भेट मात्र झाली नाही. कारण ज्यावेळी शाहरुख पार्टीला पोहोचला त्याआधीच सलमान तेथून निघाला होता. त्यामुळे या दोघांची भेट होऊ शकली नाही. पण या दोघांमध्ये आता सगळं नीट असून ते मागील सगळा वाद विसरले आहेत.त्यामुळे या दोघांची भेट न होणे हा निव्वळ योगायोग होता.
प्रियंका-निकचं बेडरुम सिक्रेट तुम्हाला माहीत आहे का?
म्हणून आला होता दुरावा
सलमान आणि शाहरुखच्या भांडणाचे कारण ठरले होते कतरीनाचा वाढदिवस. साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. या पार्टीमध्ये या दोघांची शाब्दीक बाचाबाची झाली.त्यांनतर दोघांनी एकमेकांवर हात उगारला होता. मग काय त्यानंतर त्या दोघांनी एकमेकांचे तोंड देखील पाहिले नाही. त्यांच्या या दुश्मनीच्या चर्चा सगळ्या बॉलीवूडमध्ये होत्या. पण 2013 साली त्यांनी बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत एकमेकांची गळाभेट घेऊन भांडण संपवले होते. त्यानंतर या दोघांनी एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ द्यायला सुरुवात केली. टयुबलाईट या चित्रपटात शाहरुखने तर झीरो या चित्रपटात सलमानने कॅमिओ केला होता. त्यामुळे आता या दोघांमधील दुरावा मिटला आहे आणि हा दुरावा मिटण्याचे निमित्त हीच इफ्तार पार्टी आहे.
उद्या होणार सलमानचा ‘भारत’ रिलीज
उद्या रमजान ईदचे औचित्य साधत सलमान खानचा भारत हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता त्याच्या फॅन्समध्ये आहे. म्हणूनच अनेक थिएटर हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच गल्ला जमवेल असे सध्यातरी दिसत आहे.
(सौजन्य- Instagram)