अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या नव्या चित्रपटाकडून अख्ख्या हिंदी चित्रपटसृष्टीला खूप अपेक्षा होत्या. हा बिग बजेट चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीचे मागच्या दोन वर्षांतील झालेले नुकसान भरून काढेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू करू शकला नाही. या वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटापेक्षाही सम्राट पृथ्वीराजचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन कमी झाले. या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूपच कमी कलेक्शन केले आहे आणि चित्रपटाच्या बजेटचा विचार करता, त्याचा सुरुवातीचा दिवस खूपच निराशाजनक मानला जात आहे. त्याचवेळी कमल हासनच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी उत्तम कलेक्शन केल्यामुळे तमिळ चित्रपटसृष्टीत आनंदाची लाट उसळली आहे. या दोन्ही चित्रपटांसह प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘मेजर’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्वात कमी कलेक्शन केले होते.
पहिल्याच दिवशी 14 ते 15 कोटींचे ओपनिंग होण्याची होती अपेक्षा
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद, संजय दत्त आणि मानव विज स्टारर ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट सुमारे 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला असून तो एकट्या भारतात सुमारे पाच हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट हिंदीशिवाय तमिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पहिल्या दिवशी किमान 14 ते 15 कोटींची ओपनिंग करेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु सुरुवातीच्या आकडेवारीनुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने देशभरात केवळ 23.30 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या दिवशी, चित्रपटाने सर्व भाषांमध्ये देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 16.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानुसार आतापर्यंत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 39.50 कोटींवर गेले आहे.
विक्रमने केली सर्वाधिक कमाई
सम्राट पृथ्वीराज व मेजर या चित्रपटांबरोबरच 3 जून रोजी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक लोकेश कनगराजच्या ‘विक्रम’ या चित्रपटाने या दिवशी प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांमध्ये सर्वाधिक कलेक्शन केले आहे. कमल हासन, विजय सेतुपती आणि फहद फासील स्टारर या चित्रपटाने यापूर्वी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये इतर दोन चित्रपटांना मागे टाकले होते आणि आकडेवारीवरून असे दिसून येते की चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. ‘विक्रम’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सर्व भाषांसह बॉक्स ऑफिसवर जवळपास 34 कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी एकूण तिकीट विक्री सुमारे 40 कोटी रुपये झाली. हा चित्रपट त्याची मूळ भाषा तामिळ व्यतिरिक्त हिंदी आणि तेलगूमध्येही प्रदर्शित झाला आहे.
तिन्ही चित्रपटांमध्ये तगडी स्पर्धा
अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज आणि कमल हसनच्या विक्रममध्ये जबरदस्त स्पर्धा आहे. त्याच बरोबर आदिवी शेषचा चित्रपट ‘मेजर’ देखील चांगली कमाई करत आहे. बॉक्सऑफिसवर तगडी स्पर्धा असल्याने या तीन चित्रपटांच्या कलेक्शनवर परिणाम झाला आहे. विक्रमसमोर अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर फारशी चालली नाही असेच दिसून येते. कमल हसनच्या विक्रम या चित्रपटाला देशातच नाही तर परदेशातही भरभरून प्रेम मिळत आहे. दोन दिवसांत विक्रमने देशात 60.75 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने देशभरातील सर्व भाषांमध्ये 31 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 91.75 कोटींची कमाई केली आहे. तर मेजर हा चित्रपट कमाईच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 14.30 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने देशभरात सुमारे 7 कोटींची कमाई केली आहे. देशभरात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 21.30 कोटी रुपये झाले आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक