ADVERTISEMENT
home / भविष्य
कसा असेल #NickYanka चा संसार, सांगत आहेत प्रसिद्ध अॅस्ट्रो न्यूमरोलॉजीस्ट संजय बी जुमानी

कसा असेल #NickYanka चा संसार, सांगत आहेत प्रसिद्ध अॅस्ट्रो न्यूमरोलॉजीस्ट संजय बी जुमानी

 

बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सूरू आहे. लग्न म्हंटल्यावर पत्रिका, गुण आणि इतर गोष्टी आल्याच. आता जसं ऐश्वर्या राय-बच्चन, सोनम के अहुजा आणि प्रीती झिंटा यांनी लग्नानंतर सेलिब्रिटी अॅस्ट्रो न्यूमरोलॉजीस्ट संजय बी जुमानी यांच्या सल्ल्यानूसार नाव बदललं होतं. तसंच नवविवाहीत प्रियांका चोप्राही करणार का? याबद्दल अधिक माहिती प्रसिद्ध न्यूमरोलॉजीस्ट संजय जुमानी यांनी POPxo Marathi ला दिली.

13 वर्षापूर्वीचं संजय जुमानींनी केलं होतं प्रियांकाच्या लग्नाचं भाकीत

3-nickyanka-airport-looks-feelings

ADVERTISEMENT

‘मी, प्रियांकाच्या लग्नाबद्दल 13 वर्षापूर्वीचं फिल्मफेअर मासिकात भाकीत केलं होतं की, तिचं लग्न वयाच्या 36 व्या वर्षी होईल. माझ्याकडे या जगभरात ठळक बातम्यांमध्ये झळकणाऱ्या नवविवाहित जोडप्यासाठी महत्त्वाचा सल्ला आहे.’

काय आहे प्रियांकाचा भाग्यांक?

Sanjay-B-Jumaani-02-fi

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ची जन्मतारीख (18+7+1982=9) आहे. माझ्या भाकिताप्रमाणे तिने 36 (9) व्या वर्षीचं लग्न केलं. 9 हा भाग्यांक असणाऱ्या स्त्रिया या नेहमी यशाच्या शिखरावर असतात. तसंच त्यांना कोणाच्याही प्रभावाखाली राहायला आवडत नाही. या व्यक्ती एखाद्या योद्ध्याप्रमाणे शक्तीशाली असतात. प्रियांकाबद्दल अजून सांगताना ते म्हणाले की, ‘माझं हेही भाकीत आहे की, ती 45 व्या वर्षी राजकारणात उतरेल.’

ADVERTISEMENT

prinick-mehandi-fi

वयाच्या 18 व्या (9) वर्षी पीसीने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. एवढंच नाहीतर फॅशन आणि दोस्तानासारखे सुपरहिट चित्रपटसुद्धा तिने वयाच्या 27 व्या (9) वर्षी दिले. ज्यामुळे तिची कारकिर्द एका वेगळ्याच उंचीवर पोहचली.

भाग्यांक आणि जोडीदार

nick 2

ADVERTISEMENT

9 भाग्यांकामुळेच काही काळासाठी तिचे अक्की अर्थात अक्षय कुमारशी सूत जुळले होते. अक्षयची रास कन्या आहे आणि हीच रास निक जोनास (16th Sept) चीही आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री ऑन आणि ऑफ अशा प्रकारची असेल. प्रियांका आणि निक या दोघांच्याही राशीचिन्ह  जल आणि पृथ्वी आहेत. त्यामुळे त्यांची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ आहे. पृथ्वी आणि पाण्यासारखेच ते एकत्र राहतील. या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. जसं निक हे 2 अक्षरी नाव आहे, तसंच प्रियांका चोप्रा आणि तिच निकनेम पीसी सुद्धा 2 अक्षरी आहे. त्यांचं लग्नसुद्धा 2 डिसेंबरला झालं आहे.

नवविवाहित #NickYanka ला सल्ला

Nick-Priyanka-FI

‘संसार म्हटलं की, भांड्याला भांड हे लागणारंच’. याबाबत ही संजय जुमानी यांनी दोघांना सल्ला दिला आहे. माझा निकला सल्ला आहे की, निकने प्रियांकाच्या प्रभावी आणि बेधडक बोलणं तसंच आवेगपूर्ण स्वभावाबाबत सजग असावं. कोणताही तणाव टाळण्यासाठी मी दोघांनाही सल्ला देईन की, निकने योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन करावे, तर प्रियांकाने योगा आणि व्यायाम करावा. यामुळे दोघांनाही समाधान मिळेल.

ADVERTISEMENT

प्रियांकाने ‘जोनास’ हे नवीन आडनाव वापरल्यास लाभदायी आहे का?

Gif सौजन्य : Giphy 

जर प्रियांकाने प्रियांका चोप्रा जोनास असं नाव लावण्यास सुरूवात केली आणि प्रियांका चोप्रा जोनास असं नाव लावलं. तर हे तिच्यासाठी नक्कीच फायदेशीर आणि प्रगतीचं ठरेल. हा आकडा खूपच शुभ आणि फलदायी आहे. तिच्या नावाचा आकडा हा सूर्याचं प्रतीक असून स्वर्गाचा राजकुमार असं हे चिन्ह आहे. हा आकडा आनंद, यश, सन्मान आणि भविष्यकाळही यशदायी असल्याचं दर्शवतो. पण जर तिने प्रियांका चोप्रा हेचं नाव पुढे ही लावलं, तर तिचं वैवाहिक जीवन काही एवढं यशस्वी असणार नाही.

आता येत्या काळात देसी गर्ल प्रियांका चोप्रा आडनाव बदलते की तसंच ठेवते, हे लवकरच कळेल. 

ADVERTISEMENT
05 Dec 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT