फुफ्फुसांच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संजय दत्तच्या कुटुंबासह त्याच्या चाहत्यानांही धक्का बसला होता. 2020 साल हे बॉलिवूडसाठी चांगले नसल्याचे दिसत आहे. अनेक वाईट बातम्या या वर्षात आलेल्या आहेत. त्यात संजय दत्तच्या बातमीने अनेकांना धक्का दिला. संजयचे निदान झाल्यानंतर तो इलाजासाठी परदेशात जाणार असल्याची चर्चा होती. पण आता तो त्याचा इलाज परदेशात नाही तर मुंबईत राहूनच करणार असल्याचे त्याची पत्नी मान्यता हिने सांगितले आहे. संजय दत्तला इलाजासाठी अमेरिकेला जायचे होते. असे कळत होते. पण टाडा अंतर्गत त्याच्यावर झालेल्या कारवाईमुळे त्याला अमेरिकेला जाण्यास अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळेच त्याला हा निर्णय घ्यावा लागला असेल. शिवाय जगभरात सुरु असलेल्या महामारीमुळेही विशेष परवानगी काढणे शक्य नसल्याचे दिसत आहे.
एक महिन्यातच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने केले ब्रेकअप, कारण जाणून वाटेल आश्चर्य
मुंबईच्या या रुग्णालयात घेणार उपचार
संजय दत्त मंगळवारी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट झाला आहे. त्याने घरातून निघताना त्याच्या फॅन्सना आणि आप्तेष्टांना धन्यवाद म्हटले होते. शिवाय त्याने माझ्यासाठी प्रार्थना करा असे देखील सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार आणि पापाराझीच्या वायरल व्हिडिओनुसार त्याच्यासोबत त्याची बायको मान्यता आणि त्याच्या बहिणी प्रिया दत्त, नम्रता या दोघीही होत्या. आता संजय मुंबईत राहून उपचार घेणार आहे. तो लवकर बरा होवो अशी प्रार्थना त्याच्या फॅन्सनी केली आहे.
मान्यताने मानले आभार
संजय दत्तच्या उपचारासंदर्भात मान्यता दत्त हिने एक नोट लिहिली आहे. त्यामध्ये शुभचिंतकांचे आभार मानले आहे. ती म्हणाली की, संजयला त्याच्या आयुष्यात अनेकांकडून कायम प्रेम आणि विश्वास मिळाला आहे ज्याची आम्ही कल्पनाही करु शकत नाही. संजयचे आयुष्य कायमच चढ- उताराचे राहिले आहे. अनेक कठीण प्रसंगी त्याला हिंमत देण्याचे कामही अनेकांनी केले आहे. मी त्यांची नेहमीच आभारी राहीन
पुढे मान्यताने त्याच्या उपचाराबाबत सांगितले की, संजय दत्त मुंबईत राहूनच उपचार घेणार आहेत. त्याचे अन्य कुठेही जाण्याचा प्लान नाही. ज्यांना संजय कुठे उपचार घेणार याबद्दल माहिती हवी असेल तर सध्या संजय मुंबईतच राहून इलाज करणार आहेत. सध्याच्या कोविडच्या परिस्थिती मुंबई सोडून अन्य कुठेही जाण्याचा आमचा प्लॅन नाही. ही स्थिती निवळली की, मग या वर विचार करण्यात येईल. कोकिलाबेन हॉस्पिटलच्या सर्वोत्तम डॉक्टरांच्या उपचाराखाली संजय सध्या आहे. मी सगळ्यांकडे एकच विनंती करेन की, त्यांनी संजयच्या आजाराबाबत कोणताही गैरसमज पसरवू नये. सध्या डॉक्टर्सना त्यांचे काम करु द्यावे. संजयची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू.
सारा आणि कार्तिकमध्ये पु्न्हा दुरावा, सोशल मीडियावर केलं एकमेकांना अनफॉलो
कोविडची चाचणी करायला गेला आणि…
संजयला श्वसानाचा त्रास होत होता म्हणून तो लीलावती हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे त्याला कोविड 19 ची चाचणी करायला सांगितली. त्याची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली. पण अन्य काही चाचण्या केल्यानंतर 11 ऑगस्टला त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे कळले. त्याने ही माहिती फॅन्सला देत आता काही काळासाठी ब्रेक घेत असल्याचे सांगितले.
त्यामुळे आता मुंबईतच काही काळासाठी संजय दत्त इलाज घेणार आहे
बाहुबली आता बनणार आदिपुरुष, केली ग्रँड घोषणा