दिग्दर्शक संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपट ‘बैजू बावरा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी म्हणजेच बैजूच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांची नावे समोर आली होती. मात्र शेवटी भन्सालीच्या फेव्हरेट लिस्टमध्ये असलेल्या रणवीर सिंहलाच पसंती देण्यात आली. ज्यामुळे या चित्रपटात आणखी कोणाकोणाच्या मुख्य भूमिका असणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात महान संगीतकार तानसेन यांची मुख्य भूमिका असणार आहे. ज्या भूमिकेची ऑफर संजय लीला भन्सालीने अजय देवगणला दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे संजयच्या आगामी चित्रपटात आता अजय देवगण असणार का तानसेन असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
आलिया भट साकारणार करिअरमधील सर्वात छोटी भूमिका
संजयला अजयच का हवाय ‘तानसेन’च्या भूमिकेत
संजय लीला भन्सालीने तानसेनच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांचा या आधी विचार केला होता. मात्र त्याला या भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. ज्यामुळे त्याने आता तानसेनसाठी अजय देवगणच्या नावापुढे शिक्का मोर्तब केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजयला तानसेनची भूमिका जास्त पॉवरफुल आहे असं वाटत आहे. यासाठी चित्रपटातील प्रत्येक भूमिकेसाठी तो तोलुनमापून कास्टिंग करत आहे. काही असलं तरी या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि अजय देवगण या तिघांच्या भूमिका असणारच हे मात्र आता पक्कं झालं आहे.
Bigg Boss Marathi: दादूस झाले एलिमिनेट, आता होणार चुरशीची स्पर्धा
कधी करणार ‘बैजू बावरा’चे शूटिंग सुरू
संजय लीला भन्साली सध्या त्याच्या आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमध्ये बिझी आहे. याशिवाय त्याच्या हिरामंडीची स्टारकास्ट त्याने त्याने फायनल केलेली आहे. त्यामुळे एकीकडे हिरामंडीचे शूटिंग सुरू होईल तर गंगूबाई काठियावाडीचे प्रमोशन केले जाईल. संजयला गंगूबाई काठियावाडीमधून जास्त अपेक्षा आहेत. या चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू असून तो चित्रपटगृहात धुमाकूळ घालेल अशी आशा त्याला वाटत आहे. शिवाय रणवीरचा 83 लवकरच प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे त्यानंतरच संजय लीला भन्साली त्याच्या बैजू बावरा चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेल.