logo
Logo
User
home / बॉलीवूड
पहलगामचा ट्रेक करत सारा अली खान झाली ‘कश्मिर की कली’

पहलगामचा ट्रेक करत सारा अली खान झाली ‘कश्मिर की कली’

अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खानची आणखी एक आवड आहे ती म्हणजे ट्रॅव्हलिंग… शूटिंग अथवा इतर कामातून जसा वेळ मिळेल तशी ती वेकेशन एन्जॉय करताना दिसते. बऱ्याचदा दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये वेळ मिळाला की मालदिव्ज वेकेशनवर जाते. समुद्रकिनारी फिरण्यासोबतच तिला डोंगरदऱ्यांमध्ये फिरण्याचीही आवड आहे. तिचे ट्रॅव्हल व्हिडिओ आणि फोटोज चाहत्यांना खूप आवडतात. सध्या मुंबईतील कडक उन्हाळा टाळण्यासाठी साराल सध्या काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. काश्मीरमधील पहलगाम ट्रेकचे तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘कश्मीर की कली’ सारा अली खान

सारा अली खानची आजी शर्मिला टागोरची ओळख ‘कश्मीर की कली’ म्हणून प्रसिद्ध आहे. सारा अली खानने मात्र आता स्वतःच्याच फोटोवर कश्मीर की कली अशी कॅप्शन दिली आहे. तिने पहलगाम ट्रेकचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “कश्मीर की कली पुन्हा तुमच्या गल्लीत आली आहे, पण आता सध्या मी ट्रेकवर चालली आहे” सारा तिच्या अनोख्या स्टाईलमध्ये तिच्या फोटोजनां कॅप्शन देत असते. तिच्या कॅप्शन नेहमी यमक जुळलेल्या असतात.  तिने शेअर केलेल्या फोटोजमध्ये बर्फाने आच्छादलेले डोंगर दिसत आहेत. मरून रंगाचे एथलीजर आणि जॅकेट तिने परिधान केलं आहे. साराने केसांचा घट्ट पोनीटेल घातलेला असून ती या लुकमध्ये मस्त ट्रेकिंगचा आनंद लुटताना दिसत आहे. तिच्या या फोटोजवर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेटचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी कश्मीर की कली साराला माऊंटन गर्ल अशी उपमा दिली आहे.

साराचे आगामी चित्रपट

सारा लवकरच आदित्य धरने दिग्दर्शित केलेल्या दी ‘इम्मोर्टल अश्वत्थामा’मध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत असेल. हा चित्रपट महाभारतातील एक महान योद्धा अश्वत्थामावर आधारित आहे. चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच सारा आणि विकी ही जोडी झळकणार आहे. यासोबतच सारा लक्ष्मण उकेटाच्या एका आगामी चित्रपटात काम करत आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

 

11 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text