ADVERTISEMENT
home / मनोरंजन
sara-tendulkar-soon-to-be-diva-in-fashion-world-viral-photos-in-marathi

सारा तेंडुलकरच्या अदा करत आहेत नेटिझन्सना घायाळ, फोटो व्हायरल

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हे नाव नक्कीच नवे नाही. जगप्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) यांची मोठी मुलगी सारा हे सोशल मीडियावर सध्या कहर करताना दिसून येत आहे. आपल्या लोभस, सालस आणि तरीही अत्यंत ग्लॅमरस अशा फोटोजने सध्या साराने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सारा तेंडुलकरच्या या अदांमुळे अनेक जण तिच्या प्रेमात असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. सारा नेहमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अॅक्टिव्ह असते. नुकताच साराने आपल्या थायलंड ट्रीपमधील एक फोटो शेअर केला आहे आणि त्यानंतर नेटिझन्स अक्षरशः साराच्या अदांनी आणि सौंदर्याने घायाळ झाले आहेत. सारा लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करेल असे समजले जात आहे. कारण नुकतेच सौंदर्य प्रसाधनांच्या ब्रँडसाठी साराने मॉडेलिंग केल्याचेही दिसून आले आहे. त्याचेही व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहेत. 

केसरिया रंग 

सध्या केसरिया तेरा इश्क हे पिया (Kesaria Tera Ishq Hai Piya) हे गाणं खूपच व्हायरल होत आहे आणि साराचा हा केशरी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पाहिल्यानंतर तर फक्त आणि फक्त हेच गाणं डोक्यात आलं तर नक्कीच योग्य असेल. सारा दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि त्याशिवाय तिचा फॅशन सेन्सही उत्तम आहे. तसाच तिचा कॅमेऱ्यासमोर वावरही अत्यंत सहज आणि सुंदर आहे. त्यामुळे ती लवकरच चित्रपटातून दिसली तर नक्कीच कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. सध्या तिची पावलं त्यात दिशेने वळत असल्याचेही दिसून येत आहे. नुकतीच सारा थायलंडला ट्रीप करून आली आणि थायलंडवरील अनेक फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोंनी तर लक्ष वेधून घेतले आहेच पण त्याहीपेक्षा तिच्या या केशरी रंगाच्या ड्रेसमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून आल्याचे दिसून येत आहे. 

सौंदर्य प्रसाधनांची केली जाहिरात 

साराने नुकतीच मॉडलिंगला सुरूवात केली असल्याचे दिसून येत आहे. कारण तिने लागोपाठ दोन सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीसाठी काम केल्याचे सध्या व्हायरल होत आहे. यामधील तिचा कॅमेऱ्यासमोरील वावर हा वाखणण्याजोगा आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे प्रकाश पादुकोण (Prakash Padukone) यांची मुलगी असूनही दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे सारादेखील लवकरच सचिन तेंडुलकरची मुलगी ही ओळख पुसून आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. साराच्या सौंदर्याने नेटिझन्स आधीच घायाळ आहेत आणि आता जर तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला तर नक्कीच तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होईल अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत सचिन अथवा सारा यांनी कधीही पुष्टी दिलेली नाही. इतकंच नाही तर साराने कधीही आतापर्यंत कोणतीही मुलाखतही दिलेली नाही. पण अनेकांना तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती लवकरच या क्षेत्रात येईल अशी खात्री वाटत आहे आणि तिने अभिनय करावा अशी अनेकांची इच्छाही आहे हे कमेंट्सवरून कळून येत आहे. 

पण सध्या तरी सारा तिच्या विश्वास मशगुल असून तिला हवे ते फोटो अपलोड करत आहे आणि आपल्या चाहत्यांना तिला पाहण्याची अधिकाधिक संधीही देत आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

21 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT