तुम्ही कितीही महागडे कपडे घाला. जर तुम्हाला त्या कपड्यांच्या आत कोणते इनरवेअर घालायचे माहीत नसेल तर तुमच्या त्या महागड्या आणि स्टायलिश कपड्याला काहीच अर्थ नाही. विशेषत: तुम्ही ज्या पँट्स घालता त्याच्या आतमध्ये तुम्ही जर तुमची रेग्युलर पँटी घालत असाल तर तुम्हाला काही अडचणी येणारच. तुम्हाला तुमच्या स्टायलिस्ट बॉटमवेअवर घालता येईल अशा सीमलेस पँटी म्हणजे काय ते आता जाणून घेऊया आणि तुम्ही नेमक्या कोणत्या कपड्यांवर या घालू शकता ते जाणून घेऊया.
तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी
सीमलेस पँटी म्हणजे काय?
आता सीमलेस पँटी म्हणजे काय ते जाणून घेऊया. सीमलेस पँटीला कोणत्याही कडा नसात. होजिअरी आणि स्पेंडेंस मिक्स अशा मटेरिअलमध्ये या पँटी मिळतात. या पँटींना कोणत्याही कडा नसल्यामुळे त्यांचा आकार कोणत्याही कपड्यांमधून दिसत नाही.त्यामुळे तुमच्या अनेक कपड्यांवर तुम्हाला सीमलेस पँटी वापरण्याचा सल्ला दिला जातो.
ड्रेसचा गळा डीप झाला असेल तर कव्हरेजसाठी करा या सोप्या आयडिया
कोणत्या कपड्यांवर वापरायला हव्यात या पँटी
आता तुमच्या कपाटातील खास कपडे म्हणजे टाईट होजिअरी कपडे, जीम वेअर, पातळ पँट्स किंवा जम सूट असे कपडे असतील ज्यामध्ये तुमच्या पँटीचा आकार दिसू शकतो अशा सगळ्या कपड्यांवर तुम्ही या सीमलेस पँटी घालू शकता.
अशी करा सीमलेस पँटीची निवड
आता जर तुम्हाला सीमलेस पँटीची निवड करायची असेल आणि तुमच्यासाठी योग्य पँटी कोणती हे माहीत करुन घ्यायचे असेेल तर तुम्हाला दोन मटेरिअलमध्ये या सीमलेस पँटी मिळतात. एक कॉटन आणि होजिअरी मिक्स असते. तर दुसरी ही सिंथेटीक म्हणजेट स्पँडेक्स मिक्स असते. आता तुम्हाला जर या पैकी कोणती पँटी निवडायची असा प्रश्न असेल तर यामधील फरक जाणून घ्या.
सिथेंटीक पँटीज: तुमच्या टाईट आणि पातळ कपड्यांसाठी सिथेंटीक पँटीज या बेस्ट आहेत. तुम्हाला जर सिंथेटीक कपड्याबद्दल शंका असेल म्हणजे यामुळे तुम्हाला गरम होईल वगैरे तर तुम्ही या गोष्टी मनातून काढून टाका. याचे कारण असे की, यामध्ये स्पँडेक्स मटेरिअल असल्यामुळे त्यांच्यामध्ये गरम होत नाही. हवा खेळती राहते. मग तुम्ही कोणतेही कपडे घातले असतील तरी तुम्हाला गरम होत नाही. तुमच्या पातळ आणि टाईट कपड्यांसाठी अशा पँटीज या एकदम परफेक्ट आहेत. यामध्ये तुम्हाला रंगाच्याही भरपूर व्हरायटी मिळतील. इतकचं नाही तर हिपस्टर, बिकिनी, थाँग असे प्रकारही या मटेरिअलमध्ये मिळतात. आता तुम्हाला या पँटीज निवडताना प्लेन निवडायच्या आहेत. कारण त्याच तुमच्या कपड्यांसाठी योग्य आहेत.
होजिअरी कॉटन सीमसेल पँटीज: जर तुमची त्वचा नाजूक असेल आणि तुम्हाला कोणताही इतर कपडा वापरुन पाहायचा नसेल तर तुम्ही यामधील कॉटन सीमलेस पँटीजचा प्रकार निवडू शकता. या पँटीज वरील प्रकाराच्या पँटीजपेक्षा थोड्या जाड वाटतील. पण ज्यांना कॉटनशिवाय इतर कोणताही प्रकार वापरुन पाहायचा नसेल तर तुम्ही हा प्रकार ट्राय करा.
मग आता तुमच्या काही खास कपड्यांसाठी या सीमलेस पँटीज वापरुन पाहा. तुम्हाला या पँटीज नक्कीच आवडतील.
कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?