ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Shahid Kapoor shares fun glimpses of his European trip with Ishaan Khatter Kunal Kemmu

शाहिद कपूर ‘या’ अभिनेत्यांसोबत युरोपमध्ये करत आहे धमाल, शेअर केला मजेशीर व्हिडिओ

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या युरोप वेकेशनवर आहे. पण शाहिद यावेळी त्यांची पत्नी मीरा अथवा मुलांबरोबर वेकेशनवर गेलेला नसून त्याच्या बॉय गॅंगसोबत गेला आहे.एका प्रोजेक्टमधून ब्रेक मिळताच शाहिद त्याचा भाऊ ईशान खट्टर आणि अभिनेता कुणाल खेमूसोबत युरोप ट्रिपवर गेला आहे.  ईशानचे काही मित्रदेखील या ट्रिपमध्ये त्याच्यासोबत आहेत. युरोपमध्ये धमाल मस्ती करत असल्याचे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाहिद कपूर आणि गॅंगची धमाल मस्ती

शाहिदची ही बॉय गॅंग इटली आणि फ्रान्समध्ये वेकेशनवर आहे. शाहिदने स्वतः काही फोटोज आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करत त्यांचा हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये ते बाइक रायडिंग करताना दिसत आहेत. शाहिद कारने त्याच्या मित्रांना मागे टाकत या रायडिंगची मजा घेत आहे. यासोबतच शाहिदने कुणाल आणि ईशानचा थंडगार तलावामध्ये स्विमिंग करत कुडकुडत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच एका व्हिडिओमध्ये तर एका छोट्याशा गल्लीत दोन भिंतींमध्ये बॅलन्स करताना दिसत आहेत. मजामस्ती करताना गोंधळ घातल्यामुळे त्यांना एका महिलेला सॉरी आंटी असं म्हणावं लागलं. या तिघांचे हे मजेशीर व्हिडिओ सध्या चाहत्यांचे खूप मनोरंजन करत आहेत. ज्यामुळे या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कंमेट्सचा वर्षाव होताना दिसतोय.

शाहिदने कामातून ब्रेक घेत केलं वेकेशन प्लॅन

बॉलीवूड स्टार्स एखाद्या प्रोजेक्टसाठी रात्रदिवस मेहनत घेतात. मात्र प्रोजक्ट संपताच त्यांना वेध लागतात वेकेशनवर जाण्याचे. शाहिद कपूरनेही जर्सी चित्रपटानंतर असा मस्त वेकेशन प्लॅन केला होता. जर्सी चित्रपटात शाहिदसोबत त्याचे वडील पंकज कपूरदेखील होते. 22 एप्रिलला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 19.68 कोटींची कमाई केली होती. आता शाहिद लवकरच फर्जी या वेब सिरिजमध्ये झळकणार आहे. अमझॉन प्राईमवर ही वेबसिरिज प्रदर्शित होईल. त्यामुळे पुढील प्रोजेक्टसाठी पुन्हा चार्ज होण्यासाठी शाहिदने बॉय गॅंगसोबत ही युरोप ट्रिप केली असावी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक 

ADVERTISEMENT
24 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT