logo
Logo
User
home / बॉलीवूड
Sharmila Tagore makes a comeback to big screen after 11 years

अभिनेत्री शर्मिला टागोर तब्बल अकरा वर्षांनंतर करणार कमबॅक, या चित्रपटातून येणार प्रेक्षकांसमोर

सैफ अली खानची आई आणि करिना कपूरची सासू शर्मिला टागोर बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री आहे. एक काळ असा होता जेव्हा या ‘कश्मीर की कली’चे अनेक चाहते होते. साठ-सत्तरच्या दशकात तिने अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले. शर्मिला टागोर यांचा अमर प्रेम, अपूर संसार, अॅन इव्हनिंग इन पॅरीस, आ गले लग जा, कश्मीर की कली, चुपके चुपके, मौसम, सावन की घटा, सफर मधील अभिनय प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. लग्नानंतर मात्र पतौडी खानदानची बहू झाल्यामुळे आणि मुलांच्या संगोपनासाठी शर्मिलाने तिचं करिअर सोडून दिलं होतं. अधून मधून ती एखाद्या चित्रपटात काम करत असे. मात्र गेली अकरा वर्ष कोणत्याच चित्रपटात तिची झलक पाहायला मिळाली नव्हती. 2010 मध्ये ‘ब्रेक अप के बाद’ या चित्रपटात तिने शेवटचं काम केलं होतं. आता मात्र तैमूर आणि जेहची आजी शर्मिला टागोर बॉलीवूडला पुन्हा एकदा तिच्या अभिनयची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अकरा वर्षांनंतर शर्मिला बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. 

शर्मिला टागोरचं पुनरागमन

दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. अकरा वर्षानंतर गुलमोहर चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर येत आहे. शर्मिला टागोर या चित्रपटात बत्रा परिवाराची कुलमाता ही भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत मनोज वाजपेई, अमोल पालेकर, सूरज शर्मा आणि सिमरन ऋषि बग्गा यांच्या मुख्य भूमिका असतील. हा चित्रपट राहुल चित्तेलाने दिग्दर्शित केला आहे. गुलमोहरची शूटिंग पूर्ण झाली असून ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

काय आहे गुलमोहरची कथा

गुलमोहर एक कौटुंबिक चित्रपट आहे. ज्याची कथा मल्टी जनरेशन असलेल्या बत्रा कुटुंबाभोवती फिरत राहते. बत्रा कुटुंब त्यांचे पस्तीस वर्ष जुनं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहेत. अशा परिस्थिती भावुक झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील नाती आणखी मजबूत होताना यात दाखवली जाणार आहेत. नात्यांना एका धाग्यात बांधण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे का हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जेव्हा एकमेकांची रहस्य समजल्यामुळे मनात असुरक्षित भावना निर्माण होतात येतात तेव्हा नात्यांचा खरा कस लागतो. शर्मिला टागोर या चित्रपटात बत्रा कुटुंबाची मुख्य सदस्य म्हणजेच कुलमाताची भूमिका साकारत आहे. तिच्या मते या प्रोजेक्टचं शूटिंग सेटवरही कौटुंबिक आणि वातावरण निर्माण करणारं होतं. म्हणूनच तिने कथा ऐकताच या चित्रपटात काम करण्यात त्वरीत होकार कळवला होता. तिला या चित्रपटाची कथा मनाला अलगद स्पर्श कऱणारी वाटली. सहाजिकच या चित्रपटाला प्रेक्षकही तितकंच प्रेम देतील अशी तिला आशा आहे. अकरा वर्षांनी पुन्हा एकदा मोठया पडद्यावर शर्मिला टागोरला पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

10 May 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text