एखादा चेहरा सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या वागण्यावर सगळ्यांची नजर असते. त्यांनी चारचौघात सामाजिक भान राखले नाही तर अशा व्यक्ती या हमखास ट्रोल होतात. असेच काहीसे शहनाज गिलच्या बाबतीत झाले आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली शहनाज गिल आता काही कारणामुळे नेटीझन्सच्या रडारवर आली आहे. आता तिने केलेले एक कृत्य लोकांना इतके खटकले की, ट्रोल होऊ लागली आहे. सोशल मीडियावर ‘तुला लाज वाटायला हवी’ असे म्हणत तिला ट्रोल करण्यात आले आहे. शहनाज गिलने नेमकं असं काय केलं ते जाणून घेऊया. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट द्यायला विसरु नका
Hot and Sexy: भूषण प्रधानचे फोटो व्हायरल, कमेंट्सचा वर्षाव
तुला साधी ही गोष्ट येत नाही का?
शहनाज गिल ट्रोल होण्यासाठी तिचा एक व्हिडिओ कारणीभूत ठरला आहे. शहनाज गिलचा हा व्हिडिओ एका सोशल पेजवर शेअर झाला आहे. त्यामध्ये शहनाज ही शूटनंतर तशाच कपड्यात बाहेर येताना दिसते. पण तिच्या पायात हिल्स असल्यामुळे तिला साध्या चपला देण्यासाठी तिचा एक असिस्टंट येतो आणि तो तिच्या पायातील हिल्स काढत तिला दुसऱ्या चपला पायात घालतो. त्यानंतर शहनाज तेथून निघून जाते. असा हा व्हिडिओ आहे. शहनाज यामध्ये निळ्या रंगाच्या कपड्यात दिसत आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेक युजर्सनी तुझा अॅटिट्युट चांगला नाही असे म्हणत तिची कानउघडणी केली आहे. त्यामुळे आता सगळीकडे शहनाजच्या या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे.
Bigg Boss फेम निकी तांबोळीचे एका मागोमाग म्युझिक अल्बम रिलीज
साथ निभाना साथिया फेम ‘ही’ अभिनेत्री होणार दुसऱ्यांदा आई
शहनाजला पहिल्यांदाच मिळाल्या अशा कमेंट
बिग बॉसच्या घरात असताना शहनाज ही पंजाबची कतरीना कैफ म्हणून प्रसिद्ध होती. त्यामुळेच ती शेवटपर्यंत टिकली. तिचे विनोद आणि तिचा भोळेपणा हा खूप जणांना आवडला होता. त्यामुळे तिला कायमच चांगल्या कमेंट्स मिळतात. ती कायम तिच्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. पण आता या नव्या व्हिडिओमुळे शहनाजला अगदीच अशा नकारात्मक कमेंट मिळाल्या आहेत. ज्यामुळे अर्थातच शहनाजचे डायहार्ट फॅन फारच नाराज आहे.
शहनाजने केले वजन कमी
बिग बॉसच्या घरात असताना पंजाबी इंटरटेनर आणि सिंगर म्हणून शहनाज प्रसिद्ध होती. ती या आधी छान चब्बी चिक्स होती. पण तिने घराबाहेर आल्यानंतर ट्रेंड फॉलो करत स्वत:ला बारीक करुन घेतले आहे. त्यामुळे तिचा नवा अंदाज सगळ्यांना पाहायला मिळाला आहे. बारीक झाल्यानंतरही ती तितकीच सुंदर आणि छान दिसत आहे. त्यामुळे शहनाजच्या व्हिडिओ आणि फोटोवर अनेकांचे लक्ष असायचे पण आताच्या या नव्या व्हिडिओमुळे तिला नाहक ट्रोल व्हावे लागले आहे.
अनेकदा सेलिब्रिटी असे काही वागतात ज्यामुळे त्यांची प्रतिमा अगदी काहीच मिनिटात मलीन होते. शहनाजने याचा खुलासा अदयाप केलेला नाही. पण तरीदेखील खूप जणांनी तिची बाजू घेतली आहे. आता शहनाज यावर काही बोलेल का अशी वाट फॅन्सदेखील पाहात आहे.
जर तुम्ही शहनाजचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहा आणि तुमचे काय मत आहे ते देखील नक्की सांगा