गौतम बुद्ध यांना महात्मा बुद्ध, भगवान बुद्ध, सिद्धार्थ आणि शाक्यमुनी या नावानेही ओळखलं जातं. भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आजही मोठ्या प्रमाणावर मानले जातात. तसंच दरवर्षी भारतात बौद्धपौर्णिमा साजरी केली जाते. बौद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात. गौतम बुद्ध यांची शिकवण आणि त्याबाबतीतल्या छोट्या छोट्या कथा आजही आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवतात. या लेखात भगवान गौतम बुद्ध यांच्या काही कथा पाहूया.
बुद्ध, आंबे आणि मुलं
गौतम बुद्ध एका उपवनात विश्रांती घेत होते. तेव्हा तिथे एक मुलांचा समूह आला आणि त्यांनी झाडावर आंब्यांना दगड मारून पाडायला सुरूवात केली. त्यातीलच एक दगड गौतम बुद्धांच्या डोक्यालाही लागला आणि रक्त येऊ लागलं. बुद्धांच्या डोळ्यात अश्रू आले. मुलांनी ते पाहिलं आणि ती घाबरली. त्यांना वाटलं आता बुद्ध आपल्याला भल-बुरं सुनवतील. मुलांनी त्यांचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागू लागले. त्यातील एका मुलाने म्हटलं की, आमच्या कडून फार मोठी चूक झाली. आमच्यामुळे तुम्हाला दगड लागला आणि डोळ्यातून अश्रू आले. यावर बुद्ध म्हणाले की, मुलांनो मी यासाठी दुःखी आहे की, तुम्ही आंब्याच्या झाडाला दगड मारले तर त्याने तुम्हाला बदल्यात गोड आंबे दिले. पण मला मारल्यावर मात्र तुमच्या मनात भय निर्माण झालं.
परिश्रम आणि धैर्य
एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसोबत एका गावी उपदेश देण्यासाठी जात होते. त्या गावात पोचण्यापूर्वी त्यांना रस्त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे खोदलेले दिसले. त्यांच्या एका शिष्याने खड्डे पाहून प्रश्न उपस्थित केला की, अशाप्रकारे खड्डे खोदण्यामागे तात्पर्य काय आहे? तेव्हा बुद्ध म्हणाले की, पाण्याच्या शोधात कोणीतरी एवढे खड्डे खोदले आहेत. जर त्या व्यक्तीने योग्य ध्येयाने एकाच ठिकाणी खड्डा खोदला असता तर त्याला पाणी नक्कीच मिळाल असतं. पण त्याने थोड खड्डा खोदला आणि पाणी न मिळाल्यामुळे दुसरा खड्डा खोदायला सुरूवात केली. प्रत्येक व्यक्तीने परिश्रमासोबतच धैर्य ठेवणंही तितकचं महत्त्वाचं आहे.
अमृताची शेती
Buddhapornima Short Stories
एकदा भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी एक शेतकऱ्याच्या घरी गेले. त्यांना भिक्षा मागण्यासाठी आलेलं पाहून शेतकरी उपेक्षेने बोलला की, मी श्रमाने शेतात नांगर चालवतो आणि मग खातो. तुम्ही शेतात नांगर चालवा, बियाणं रूजवा आणि मग खा. यावर बुद्ध म्हणाले की, मी ही शेतीच करतो. तेव्हा आश्चर्याने शेतकरी म्हणाला की, गौतम मी तर तुम्हाला कथी नांगर चालवताना पाहिलं नाही किंवा बैलांसोबत शेतीकडे जाताना पाहिलं नाही. मग तुम्ही कसं म्हणू शकता की, तुम्ही शेती करता. तुम्ही कृपया मला तुमच्या शेतीसंबंधी समजवून सांगा. बुद्ध म्हणाले की, महाराज माझ्याकडे श्रद्धारूपी बीज, तपस्यारूपी पाऊस, जनतेच्या रूपात नांगर आहे. पापभीरूतेचा हा दंड आहे. विचाररूपी दोर आहे. तर स्मृती आणि जागरूकता रूपी फाळ आणि पेरणी आहे. वचन आणि कर्म संयत ठेवतो. मी माझी शेती वाईट गवतापासून मुक्त ठेवतो आणि आनंदाचं पीक घेण्यास प्रयत्नशील राहतो. समस्या पाहूनही मी मागे जात नाही. तेच मला थेट शांती धामपर्यंत नेत. अशाप्रकारे मी अमृताची शेती करतो.
मृत्यूनंतर काय?
एकदा बुद्धांना मलुक्यपुत्राने विचारलं की, देवा तुम्ही आजपर्यंत सांगितलं नाही की, मृत्यूनंतर काय होतं? त्याचं बोलणं ऐकून बुद्ध हसले. मग त्यांनी त्याला विचारलं की, आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. जर कोणी व्यक्ती जात असेल आणि अचानक कुठूनतरी एक विषारी बाण येऊन त्याला लागला तर त्याने काय करावं? पहिले शरीरात घुसलेला बाण काढणं योग्य आहे की, बाण कुठून आला आणि कोणी मारला ते? मलुक्यपुत्र म्हणाला की, सर्वात आधी शरीरात घुसलेला बाण काढला पाहिजे. अन्यथा विष संपूर्ण शरीरात पसरेल. बुद्धाने म्हटलं की, तू अगदी योग्य म्हणालास. आता मला हे सांग की, आधी या जीवनातील दुःखाचं निवारण करायचं की, मृत्यूनंतर काय याबाबत विचार करायचा. मलुक्यपुत्र समजून गेला आणि त्याच्या मनातील प्रश्नाचं उत्तरही मिळालं.
भगवान बुद्धांनी सांगितलं – सगळ्याचं हित करा
एका दिवशी एक व्यक्ती भगवान बुद्धाकडे गेला. तो खूप तणावाखाली होता. त्याच्या डोक्यात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होतं. जसं आत्मा म्हणजे काय? मृत्यूनंतर माणूस कुठे जातो, सृष्टीची रचना कोणी केली, स्वर्ग-नरकाचं सत्य नेमकं काय आणि ईश्वर आहे की नाही? त्याला या प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती. जेव्हा तो भगवान बुद्धांकडे पोचला तेव्हा त्याने पाहिलं की, अनेक जण त्यांच्या आसपास बसले आहेत. भगवान त्या सगळ्यांच्या प्रश्नांच समाधान अत्यंत सहजतेने करत आहेत. खूप वेळ हा उपक्रम सुरू होता. पण बुद्ध सगळ्यांना संतुष्ट करत होते. ती व्यक्ती त्यांचे असे हाल पाहून हैराण झाली. त्याने विचार केला की, भगवानांना दुनियादारीच्या प्रकरणात पडून काय फायदा आहे? त्यांनी भजन करावं आणि साधारण समस्या असणाऱ्या लोकांना दूर करावं. पण भगवान बुद्धांना पाहून तर असं वाटत होतं की, त्या लोकांचं दुःख जणू भगवानांचं दुःख आहे. शेवटी एका व्यक्तीने तो प्रश्न विचारलाच की, महाराज तुम्हाला संसाराच्या गोष्टींबाबत काय देणंघेणं? तेव्हा बुद्ध म्हणाले की, मी ज्ञानी नाही आणि मी एक माणूस आहे. तसंही ज्ञान काय कामाच, जेव्हा एखादा गर्विष्ठ आणि आत्मकेंद्री होऊ दुसऱ्यांच्या चिंतेला आपली मानू शकणार नाही. असं ज्ञान तर अज्ञानापेक्षाही वाईट आहे. बुद्धाचं बोलणं ऐकून आलेल्या व्यक्तीच्या मनातील शंका दूर झाली. त्या दिवसापासून त्याच्या वागण्याबोलण्यात फरक पडला.
कथेच सार हे आहे की, ज्ञान हे तेव्हाच सार्थकी लागतं, जेव्हा ते लोकांच्या कल्याणाशी संलग्न होतं.