सौंदर्य, उत्तम अभिनय आणि कमी वयात कमावलेले नाव या सगळ्या कारणामुळे श्वेता तिवारी ही चर्चेत असली तरी तिच्या आयुष्यातील खासगी गोष्टींना घेऊनही चर्चेत असते. तिच्या दुसऱ्या पतीसोबतचा वाद, त्यावरुन सोशल मीडियावर झालेला तमाशा या सगळ्या गोष्टींमुळे तिचा काही पिच्छा सोडत नाही. आता आणखी एका नव्या कारणामुळे श्वेता तिवारीची चर्चा होऊ लागली आहे. तिने तिचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये श्वेताने असे काही लिहिले आहे की, आता त्या कॅप्शनची चर्चा रंगली आहे. श्वेताने नेमकी कोणती कॅप्शन ठेवली आणि काय आहे त्यामागचे कारण चला जाणून घेऊया.
श्वेताने केला फोटो शेअर
श्वेता तिच्या सोशल अकाऊंटवर सतत ॲक्टिव्ह असते. ती फोटो शेअर करतच असते. तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचे निखळ हसणे दिसत आहे. पण या फोटोखाली कॅप्शन तिने लिहिली आहे.
ते: इतना क्या हस रही है
हम: तेरे बाप का क्या जाता है
असे लिहिल्यामुळे श्वेताला नक्की म्हणायचे तरी काय? असा प्रश्न स्वाभाविक आहे. पण हा टोमणा की, तिने तिला आनंदी बघून नको ते प्रश्न करणाऱ्याला हा टोमणा केला आहे हे समजणे जरा कठीणच आहे. श्वेता तिचा दुसरा पतीला सोडल्यामुळे खूपच जास्त ट्रोल झाली होती. त्यामुळे त्याचा याच्याशी काही संबंध आहे का ? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. तिच्या काही सेलिब्रिटी मित्रांनी या कॅप्शनवर गमतीशीर उत्तर दिली आहेत.
श्वेता या कारणामुळे झाली वेगळी
श्वेता तिवारीने अभिनव कोहलीसोबत काही वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले होते. काही वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. या लग्नात ती खूश होती. तिने अनेक मुलाखती देऊन अभिनव कोहली चांगला माणूस असल्याचे सांगितले होते. पण अचानक त्यांच्या लग्नात असे काही झाले की, तिने अचानक त्याला सोडले. अचानक तिच्या बातम्या सगळीकडे येऊ लागल्या. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिच्यासोबत चुकीचे वर्तन केल्यामुळे तिने अभिनव कोहलीला सोडण्याचा निर्णय घेतला होता. अभिनव कोहलीवर गंभीर आरोप लागल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. पण नंतर हे प्रकरण इतके वाढत गेले की, या दोघांची भांडण इन्स्टाग्रामवर सुरु झाली. सध्या हे प्रकरण थंड असले तरी देखील श्वेताच्या या रिलेशनशीपचा उल्लेख अनेकदा केला जातो.
फिटनेसकडे देते लक्ष
श्वेता तिवारी ही दोन मुलांची आई आहे. तिची मोठी मुलगी ही आता चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे. या दोघांना एकत्र उभे केले तर श्वेता ही नक्कीच तिची आई शोभणार नाही. आजही ती तिच्या वयाच्या इतर अभिनेत्रींना लाजवेल इतकी सुंदर आणि मेन्टेन आहे. तिचा फिटनेस हा कमालीचा आहे. इतकेच नाही तर तिला पुस्तक वाचनाची देखील आवड आहे. त्यामुळे ती उत्तर देताना तिची अभ्यासूवृत्तीही दिसून येते.
दरम्यान, श्वेता तिवारीच्या या कॅप्शनबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा