कॅनडामध्ये जबरदस्त परफॉर्म्सन्स दिलेल्या गुरु रंधावाला एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्याच्यावर कॅनडामध्ये जबरदस्त हल्ला झाला आहे.या हल्ल्यानंतर गुरु रंधावाने यापुढे कधीही कॅनडामध्ये काम न करण्याची शप्पथ घेतली आहे. त्याने हल्ल्यानंतरचा त्याचा फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे आणि झालेला सगळा प्रकार त्याच्या फॅन्सना सांगितला आहे.
#RIPactorVIJAY मागचे सत्य आले समोर… हेटर्सना केले ट्रोल
नेमकं प्रकरण काय?
गुरु रंधावा USA/ कॅनडा अशा टूरवर होता. त्याच्या चाहत्यांच्या प्रचंड मागणीनंतर या ठिकाणी त्याला बोलावण्यात आले होते. 28 जुलैला त्याचा Live concert कॅनडामधील vancouver या ठिकाणी होती. लोकांनी या concertसाठी फारच गर्दी केली होती. त्याच्या कार्यक्रमादरम्यान त्याला पाहण्यासाठी एक पंजाबी माणून सतत स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने अनेकदा स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण त्या त्यावेळी त्याला क्रू मेंबर्सकडून समजावणयात आले. अखेर ती पंजाबी व्यक्तीवर आली नाही. पण गुरुचे गाणे संपल्यानंतर तो स्टेजवरुन खाली उतरत असताना या पंजाबी माणसाने गुरुच्या चेहऱ्यावर जोरदार पंच दिला. तो मार इतका जोरात होता की, यामध्ये गुरुच्या डोक्याला तब्बल 4 टाके पडले.
Shocked by the incident happened to #GuruRandhawa in #america.
I condemn the incident and respect the artist pic.twitter.com/xbtkf4voQ0— VSwapnil2010 (@Swapnil56V) July 30, 2019
गुरु परतला मुंबईत
या सगळ्या प्रकरणानंतर गुरु देशात परतल्याची पोस्ट गुरुच्या टीमकडून इन्स्टाग्रामवर टाकण्यात आली असून त्यांनीच झालेला सगळा प्रकार सोशल मीडियावर सांगितला आहे. त्यामुळेच हा सगळा प्रकार अगदी योग्य पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याने देशात परतून मला सुरक्षित वाटल्याचे देखील म्हटले आहे.
सनी लिओनच्या चुकीने होतोय एका व्यक्तीला त्रास
@GuruOfficial live in vocanver ❤️ ❤️ #crazyhabibivsdecentmunda #gururandhawa ❤️ ❤️ ❤️ ❤️ pic.twitter.com/Gc6Ld0edGi
— Guruvi❤️guru_ki_fan_savi ❤️ (@SaviPatel5) July 29, 2019
पुन्हा करणार नाही कॅनडामध्ये शो
स्वत: पंजाबी असलेल्या गुरु रंधावाला पंजाबी व्यक्तीकडूनच अशी वागणूक मिळाल्याचे आश्चर्य आहे. जर माझे येणे आवडले नसेल तर यापुढे मी कॅनडाला कधीच कार्यक्रम करणार नसल्याचे देखील गुरु रंधावाने स्पष्ट केले आहे. त्याच्या एकूणच म्युझिकल टूरमध्ये कॅनडामधील कार्यक्रमाने गालबोट लावले आहे. त्यामुळेच तो पुन्हा या ठिकाणी कधीही कार्यक्रम करणार नसल्याचे म्हणाला आहे. शिवाय ज्या माणसाने हा हल्ला केला त्याला ‘सद्बुद्धी येऊ दे’ अशी ही प्रार्थना त्याने केली आहे.
गुरु रंधावाची गाणी प्रसिद्ध
गुरु रंधावाची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. हाय रेटेड गब्रु,बन जा तू मेरी राणी (तुम्हारी सुलू), सूट सूट, पटोला, या गाण्यांमुळेच त्याला लोक ओळखतात. त्याचा अंदाज वेगळा असल्यामुळे त्याच्या गाण्यांना लगेचच प्रसिद्धी मिळते. गुरुचे जगभरात चाहते आहे. त्याची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.
काय आहे राखी सावंतच्या गुपचूप लग्नामागचं रहस्य
Live show चे नेहमीच टेन्शन
अनेक कलाकार त्यांच्या फॅन्सना भेट देण्यासाठी त्यांच्याशी अधिक कनेक्ट होण्यासाठी Live show करत असतात. अशावेळी आलेल्या मॉबला सांभाळणं फारचं कठीण गोष्ट असते. सोनू निगम, राहुल वैद्य, श्रेया घोषाल,अभिजीत सावंत, कैलास खेर असे काही कलाकार कायम त्यांचे Live concert करत असतात. त्यामुळे असे प्रकार घडल्यानंतर प्रत्येक कलाकाराला टेन्शन येणे स्वाभाविक आहे. पण अशाप्रकारे एखाद्या कार्यक्रमात कलाकारांवर हल्ले होणे म्हणजे आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे कलाकारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अनेक परदेशी कलाकार आपल्याकडेही येत असतात. वर्षापूर्वी पॉपसिंगर जस्टीन बीबर मुंबईत आला होता. त्यावेली अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला होता.