गेल्या वर्षापासून अनेक सेलिब्रिटीच्या घरी बाळांचा जन्म झाला आहे. त्यात आता भर पडली आहे ती गायिका नीती मोहनची (neeti mohan). अभिनेता निहार पंड्या (Nihar Pandya) सोबत नीतीने विवाह केला असून 2 जूनला (बुधवारी) नीतीने आपण एका गोंडस मुलाला जन्म दिल्याची बातमी शेअर केली आहे. दोघांनीही आपण आई – वडील झाले असल्याचे सोशल मीडियावरून सांगितले आहे. आई आणि बाळ दोघेही उत्तम असल्याचे निहारने सांगितले आहे. त्यामुळे आता या दोघांच्याही चाहत्यांना बाळाला बघण्याचीही उत्सुकता लागली आहे.
निहारने व्यक्त केल्या भावना
निहार पांड्याने नीती मोहनसह एक रोमँटिक फोटो शेअर करत आपण बाबा झाल्याचा आनंद आणि भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझ्या सुंदर बायकोने मला ही संधी दिली आहे की, मी माझ्या लहानशा बाळाला त्या सर्व गोष्टी शिकवू शकेन ज्या माझ्या वडिलांनी मला शिकवल्या होत्या. माझ्या आयुष्यात ती फक्त आनंद घेऊन आली आहे. नीती आणि आमचं नवजात बाळ दोघेही एकदम हेल्दी आणि उत्तम आहेत. आज पाऊस आणि ढगांनी वेढलेल्या या दिवशी आमच्या घरात SON-rise झाला आहे. पूर्ण मोहन आणि पांड्या कुटुंबीय हात जोडून देवाचे, डॉक्टरांचे, कुटुंबातील व्यक्तींचे आणि सर्व शुभचिंतकांचे आभार मानत आहेत आणि तुमच्या या प्रेमाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत.’ तर नीतीनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.’आमचे कुटुंबीय, निहार आणि मी दोघेही आमच्या बाळाचे स्वागत करत आहोत. हा लहानशा जीवाला असं हातात घेणं यासारखं दुसरं मोठं सुख नाही. अजूनही सतत हे सुख अनुभवत आहे. आम्हाला अत्यानंद झाला असून तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.’
सकारात्मक विचार हाच एकमेव मार्ग – अभिनेता डॉक्टर आशिष गोखले
दोघांवरही झाला सेलिब्रिटीच्या शुभेच्छांचा वर्षाव
या पोस्टनंतर अनेक सेलिब्रिटींना दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नीतीची बहीण शक्ती मोहनने म्हटले, ‘मी खूपच आनंदी आहे. नव्या आई वडिलांना संपूर्ण कुटुंबाकडून शुभेच्छा. आता मी मावशी झाले आहे आणि आता तुझ्या लहान बाळाला बिघडविण्यासाठीही तयार आहे. सर्व मावशींनी आता पार्टीसाठी तयार राहावे.’ नकुल मेहताही शुभेच्छा दिल्या आहेत. सुगंधा मिश्रा, विशाल दादलानी, हर्षदीप कौर या सर्वांनीच अगदी मनापासून नीती आणि निहार दोघांनाही बाळाच्या आगमनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Bigg Boss च्या नव्या सीझनमध्ये रिया चक्रवर्ती येणार असल्याची चर्चा
2019 मध्ये नीती आणि निहारने बांधली लग्नगाठ
नीती मोहन आणि निहारने दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली तर यावर्षी त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवशी आपण आई – वडील होणार असल्याचे दोघांनी पोस्ट शेअर करून सांगितले होते. दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी यापेक्षा मोठा आनंद काहीच असू शकत नाही अशा भावना व्यक्त करत दोघांनी याबाबत आपल्या चाहत्यांना सांगितले होते. तर यावर्षी श्रेया घोषाल, हर्षदीप कौर या दोन्ही गायिकांनाही मुलगा झाला आहे. त्यामध्ये आता नीतीचीही भर पडली आहे. कोरोनाच्या (Coronavirus) या काळात यासारखी दुसरी आनंदाची बातमी ती काय असणार असं म्हणत नक्कीच तिचे चाहतेही आनंदी आहेत. आता नीती आणि निहार आपल्या बाळाचे नाव काय ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लवकरच याबाबत पोस्ट येते का याची वाट पाहावी लागेल.
कृष्णा अभिषेकला आली चीची मामाची आठवण, शेअर केला गोविंदासोबत फोटो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक