रविवार 3 जुलैला ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2022’ पुरस्कार सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सहाजिकच या कार्यक्रमासाठी बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सोहळ्यात रात्री उशीरा तो महत्त्वाचा क्षण आला जेव्हा यंदाच्या मिस इंडियाची घोषणा करण्यात आली. कर्नाटकामधील सिनी शेट्टीने मिस इडिया 2022 चा पुरस्कार जिंकला. सिनीने 31 फायनलिस्टमधून हा पुरस्कार स्वतःच्या नावावर केला.
असा रंगला सोहळा
सिनी शेट्टी, रूबल शेखावत आणि शिनाता चौहान या तिघींमध्ये शेवटी मिस इंडिया पुरस्कारासाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर शेवटच्या क्षणी हा पुरस्कार सिनी शेट्टीने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःच्या नावावर केला तर राजस्थानची रूबल शेखावत पहिली आणि उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी उपविजेता ठरली. सिनी शेट्टी मुळची कर्नाटकाची असून फक्त एकविस वर्षांची आहे. सिनीने वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यमचे शिक्षण घेतलेले आहे. चौदाव्या वर्षी तिने स्टेजवर परफॉर्मन्स करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर सिमी अभ्यासातही खूप हुशार आहे. तिने अकाउंट्स आणि फायनान्समध्ये पदवी घेतलेली आहे. सध्या ती सीएफए (चार्टर्ज फायनालिस्ट एनालिस्ट) करत असून सोबतच ती आता मिस इंडिया देखील झाली आहे. या आधी झालेल्या एका उपस्पर्धेत तिने मिस टॅलेंटचा पुरस्कारही मिळवलेला आहे.
या सेलिब्रेटींनी लावली उपस्थिती
मिस इंडिया वर्ल्ड 2022 साठी बॉलीवूडची नेहा धुपिया, मलायका अरोरा, डिनो मोरिआ, शामक दावर जजच्या भूमिकेत पॅनलवर होते. तर कार्यक्रमात अभिनेत्री क्रिती सेननचा एक सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सोबतच अनेक सेलिब्रेटी या रेड कारपेटवर आमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा पुरस्कार मोठया दिमाखात पार पडला. तीस देशातून सहभागी झालेल्या स्पर्धक आणि ज्युरींनी या कार्यक्रमात डिझायनर अभिषेक शर्माचं रिसॉर्ट विअर कलेक्शन परिधान केलं होतं. प्रत्येकीला शोसाठी खूप छान पद्धतीने तयार करण्यात आलं होतं. सहाजिकच हा सोहळा एक स्टार स्टडेड इव्हेंट होता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक