ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
कपड्यांशिवाय झोपायला आवडत असेल तर माहीत हव्यात 7 गोष्टी

कपड्यांशिवाय झोपायला आवडत असेल तर माहीत हव्यात 7 गोष्टी

एका संशोधनानुसार सिद्ध झालं आहे की, केवळ 30% लोक हे कपड्यांशिवाय झोपतात आणि बाकी लोक अंडरवेअर अथवा आरामदायी पायजमा घालण्याला पसंती दर्शवतात. पण तुम्हाला माहीत आहे का? ज्या व्यक्ती कपड्यांशिवाय झोपतात ते इतरांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते कपड्यांमुळे तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर निघत नाही. त्यामुळे झोपेत खूप त्रास सहन करावा लागतो पण जेव्हा तुम्ही कपड्यांशिवाय झोपता तेव्हा शरीराचं तापमान कमी होतं. त्यामुळे कपड्यांशिवाय झोपण्याचे खूप फायदे आहेत.

1 – चांगली आणि गाढ झोप

बऱ्याच लोकांना अनिद्रेची समस्या असते. चांगली झोप यावी यासाठी त्यांचा प्रयत्नदेखील चालू असतो. त्यासाठी काही लोक आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात तर काही लोक औषधांचा आधार घेतात. पण तुम्हाला खोटं वाटेल जर तुम्हाला चांगली आणि गाढ झोप हवी असेल तर तुम्ही हा पर्याय एकदा नक्की करून पाहायला हवा. कपडे न घालता झोपल्यास, इतर काहीही करायची गरज नाही.

2 – वजन कमी करण्यासाठी होते मदत

weight-loss

तुम्ही विचार करत असाल की, कपड्यांशिवाय झोपून कसं काय वजन कमी होतं? किंवा असं झोपून तुम्ही बारीक व्हाल तर तसं नाही. पण तुमचा योग्य आहार आणि नियमित व्यायामासह तुम्ही योग्य झोप घेतलीत तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. एका संशोधनानुसार, कमी तापमानात झोपल्यामुळे मेटाबॉलिजम वाढतं जे मधुमेह रोखण्यास उपयुक्त आहे.

ADVERTISEMENT

वाचा – रात्री झोपेत घोरण्यावर उपाय

3 – फंगल इन्फेक्शनपासून बचाव

झोपण्याच्या वेळी महिलांचे रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गन झाकून राहिल्यामुळे त्वचेच्या आसपास फंगल इन्फेक्शन अथवा बॅक्टेरिया होण्याची जास्त शक्यता असते. कपड्यांशिवाय झोपल्यामुळे या अंगांना थंड हवा मिळते. त्यामुळे हे अंग सुकायला मदत मिळते. परिणामी ओव्हरहिटिंगचा त्रास कमी होतो.

4 – निरोगी त्वचा

कपड्यांशिवाय झोपणं आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. आपल्या त्वचेला यामुळे थंडावा मिळतो. तसंच यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहातं. त्याशिवाय कमी तापमानात झोपणं आपल्या त्वचेच्या छिद्रांची काळजी घेतं आणि हे अँटीएजिंगचं कामही करतं. त्यामुळे आपली त्वचा चमकदार होते.

5 – केस सुंदर दिसण्यासाठी मदत होते

hair

ADVERTISEMENT

घाम तुमच्या केसांना खूपच नुकसान पोहचवतो. घाम सुकल्यामुळे तुमच्या केसांमध्ये मीठ जमा होतं ज्यामुळे तुमच्या स्कॅल्पला आणि केसांना नुकसान पोहचवतं. तुम्ही कपड्यांशिवाय झोपल्यास, एकदम थंड तापमानात झोपता त्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणात घाम येतो, ज्यामुळे केस सुंदर आणि मजबूत राहण्यास मदत होते.

6 – आत्मविश्वास वाढवतो

यशस्वी आयुष्यासाठी आत्मविश्वास हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कपड्यांशिवाय झोपल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल कोणतीही लाज राहात नाही. त्यामुळे तुम्ही दैनंदिन जीवनात जे कपडे वापरता तेदेखील आत्मविश्वासाने घालू शकता.

7 – रोमांच, रोमान्सने भरलेल्या रात्री

partners

एका संशोधनानुसार, जी जोडी रात्री कपड्यांशिवाय एकत्र जोपते ते दुसऱ्यांच्या तुलनेमध्ये जास्त आनंदी असतात. वास्तविक कपड्यांशिवाय झोपल्यामुळे, आपल्या जोडीदाराबरोबर अगदी त्वचेचा जवळचा संबंध येत असतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सीटॉसिन हार्मोन निर्माण होतो. परिणामी तुम्ही जास्त आनंदी राहाता आणि तुमचा नाईट लाईफ रोमान्स रोमांचदायी होतो.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा –

शांत झोप येण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

तुम्हालाही होतोय का अपुऱ्या झोपेचा त्रास

ADVERTISEMENT

#WorldSleepDay : ‘या’ कारणामुळे महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोपेची असते गरज

18 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT