ADVERTISEMENT
home / आरोग्य
Ghorane Upay Marathi

रात्री झोपेत घोरण्यावर उपाय – घोरणे बंद करण्यासाठी उपाय

रात्री ठराविक पद्धतीने झोपल्याने घोरण्याचा तुम्हाला त्रास होतो का, मग काळजी करू नका. कारण ही समस्या तुमच्या प्रमाणे अनेकांना सतावत असते. मात्र तुमच्या अशा घोरण्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अथवा तुमच्या जोडीदाराची झोपमोड होऊ शकते. त्यामुळे सहाजिकच तुम्हाला तुमच्या घोरण्याच्या सवयीचा राग येतो अथवा चिडचिड होऊ लागते. कधी कधी या सवयीमुळे परक्या ठिकाणी झोपण्याची तुम्हाला अक्षरशः तुम्हाला लाज वाटू शकते. अती मेहनत अथवा दगदग झाल्यामुळे किंवा नाक चोंदण्यामुळेही तुम्ही घोरू शकता. म्हणूनच घोरण्याच्या समस्येकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. घोरण्यामगची कारणे काहिही असली तरी यासाठी तुम्हाला अनेक सोपे उपाय घरीच करता येतात. यासाठी जाणून घ्या घोरणे बंद करण्यासाठी उपाय (Ghorane Upay Marathi)

Home Remedies To Get Rid Of Snoring In Marathi

Home Remedies To Get Rid Of Snoring In Marathi

वाफ घ्या (Inhale Steam)

त्वचेची काळजी घेण्यासाठी अथवा सर्दीपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा स्टीम म्हणजे वाफ घेतली असेल. सध्या कोरोना संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाच्या घरी स्टीम घेण्याचे साहित्य असतेच. सर्दी खोकल्यावरील घरगुती उपाय म्हणून हा उत्तम पर्याय आहे. घोरणे बंद करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी वाफ घेणे. वाफ घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो. श्वसनमार्गात कफामुळे निर्माण झालेला अडथळा वाफ घेण्या मुळे कमी होतो. त्याचा चांगला परिणाम तुमच्या घशा आणि नाकाच्या कार्यावर होतो आणि तुमचे झोपेत घोरणे बंद होते.

ADVERTISEMENT

तूप (Ghee)

नाक चोंदण्यामुळे झोपेत तुम्ही नाकावाटे श्वास घेण्याऐवजी तोंडावाटे श्वास घेता आणि सोडता. ज्यामुळे तुमच्या नाक आणि तोंडातून घोरण्याचा आवाज येऊ लागता. हा घोरण्याचा त्रास कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे नाकात तूप सोडणे. यासाठी रात्री झोपताना नाकपुड्यांमध्ये शुद्ध तूपाचे काही थेंब सोडा. नियमित नाकपुड्यांमध्ये साजूक तूप सोडल्यामुळे हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल. तूप खाणे आरोग्यासाठी हितकारक आहेच शिवाय तुपाचा असा औषधाप्रमाणेही वापर करता येतो. यासाठी तूप खाण्याचे फायदे अवश्य जाणून घ्या.

Ghee To Get Rid Of Snoring In Marathi

instagram

वेलची पावडर (Cardamom Powder)

तुम्ही अनेक प्रयत्न करूनही तुमचा घोरण्याचा त्रास कमी झाला नसेल तर वेलचीचा फायदा नक्की होईल. वेलचीचा हा उपाय जरूर करून पहा. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधातून वेलची पावडर मिसळून घ्या. जर तुम्हाला दूध पिणे आवडत नसेल कोमट पाण्यातून तुम्ही वेलची पावडर घेऊ शकता. हा उपाय रोज केल्यामुळे काही दिवसांनी तुमचा घोरण्याचा त्रास नक्कीच कमी होईल. वेलची खाण्याचे फायदे अनेक आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. शांत झोप लागण्यासाठी तुमची घोरणे बंद व्हायला हवे.

ADVERTISEMENT

निलगिरी तेल (Nilgiri Oil)

जर तुम्हाला सतत सर्दीचा त्रास होत असेल आणि त्यामुळे तुम्ही घोरत असाल. तर झोपेत घोरणे बंद करण्यासाठी उपाय करून तुम्ही तुमची सर्दी आणि घोरण्याचा त्रास दोन्ही बरी करू शकता. निलगिरीचे  तेल उग्रवासाचे आणि निर्जंतूक करणारे असते. ज्यामुळे तुमचे सर्दीचे इनफेक्शन लवकर बरे होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात निलगिरीचे काही थेंब टाका आणि या पाण्याची वाफ घ्या. वाफ  चेहऱ्यावर घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. श्वसनमार्ग मोकळा झाल्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्याही कमी होईल.

भरपूर पाणी प्या (Drink More Water)

शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी दररोज आठ ग्लास पाण्याची शरीराला गरज असते. मात्र एवढंच नाही तर नियमित पुरेसे पाणी पिण्यामुळे तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो. हे ऐकून तुम्हाला कदाचित  आश्चर्य वाटेल. मात्र लक्षात ठेवा जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा तुमच्या नाक आणि श्वसन मालिकेतील ओलसरपणा कमी होतो. श्वसनमार्गाचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी हा ओलसरपणा गरजेचा असतो. श्वसनमार्ग अती कोरडा झाल्यामुळे  तुम्हाला घोरण्याचा त्रास होऊ लागतो. यासाठीच हा त्रास कमी करण्यासाठी मुबलक पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहिल. त्याचप्रमाणे जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे

मध (Honey)

मध हे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. मधाचे फायदे अनेकलआहेत. मधाचे हळदीसोबत चाटण घेतल्यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या आरोग्य समस्या कमी होतात.  कोमट पाणी अथवा दुधातून मध घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो. यासाठीच जर तुम्हाला घोरण्याचा त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी दुधातून मध अवश्य घ्या. ज्यामुळे तुमच्या श्वसनमार्गातील अडथळे कमी होतील आणि तुमच्या घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल.

हळदीचे दूध (Turmeric Milk)

अनेक आरोग्य समस्यांवर हळद गुणकारी आहे. रात्री झोपताना हळदीचे दूध पिण्याने आरोग्याला अनेक चांगले फायदे होतात. त्यामुळे आजारी पडल्यावर अथवा शांत झोप लागण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र एवढंच नाही या उपायाने तुम्ही तुमचे घोरणे देखील थांबवू शकता. नियमित झोपताना हळदीचे दूध पिण्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्हाला निवांत झोप लागते. श्वसनमार्गातील समस्या दूर झाल्यामुळे तुमचे घोरणे आपोआप कमी होत जाते.

ADVERTISEMENT

Instagram

पुदिना तेल (Mint Oil)

पुदिन्याचे फायदे आपल्यापैकी बरेच जणांना माहीत असतीलच. पुदिना तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात टाका आणि त्या पाण्याने गुळण्या करा. सकाळी आणि रात्री या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो. कारण जर तुमच्या श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे तुम्ही घोरत असाल तर या उपायाने ती सूज कमी होऊ शकते. सूज कमी झाल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल आणि तुमचा घोरण्याचा त्रासही कमी होईल. घरच्या घरी घोरणे बंद करण्याचा उपाय करण्यासाठी ही एक सोपी युक्ती आहे.

वजन कमी करा (Lose Some Weight)

ज्या लोकांचे वजन जास्त असते त्यांना घोरण्याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. याचं कारण अगदी सोपं आहे कारण अती वजनामुळे अशा लोकांच्या शरीरात जास्त चरबी जमा होते. घसा आणि नाकाकडील भागात जमा झालेले फॅट्स तुमच्या श्वसनमार्गात अडथळे निर्माण  करतात. ज्यामुळे झोपताना तुमच्या श्वसनाचा मार्ग अरूंद होतो आणि तुम्ही घोरू लागता. झोपेत घोरणे बंद करण्यासाठी थोडे वजन कमी करा. यासाठी तुमच्या डाएटवर योग्य लक्ष द्या, नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. 

ADVERTISEMENT

झोपण्याची पोझिशन बदला (Change Your Sleeping Position)

ज्या लोकांना पाठीवर झोपण्याची सवय असते अशी माणसं खूप मोठ्या प्रमाणावर घोरतात. कारण पाठीवर झोपल्यामुळे तुमच्या श्वसनमार्गात अडथळे येतात. ज्याचा परिणाम तुम्ही मोठ मोठ्याने घोरू लागता. जर तुमच्या घोरण्यामुळे घरातील इतरांची झोपमोड होत असेल तर तुमच्या झोपण्याच्या पोझिशनमध्ये बदल करून पाहा. कुशीवर झोपणं हे आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं. त्यामुळे डाव्या अथवा उजव्या कुशीवर झोपा. झोपण्याची पद्धत लगेच बदलणं सोपं नसलं तरी सरावाने ते नक्कीच शक्य आहे.

जीभ आणि घशाच्या स्नायूंचे व्यायाम (Work Out Your Tongue And Throat Muscles)

तुम्ही तेव्हाच घोरता जेव्हा तुमची जीभ आणि घशाचे स्नायू रिलॅक्स होतात. त्यामुळे जीभ आणि घशाच्या स्नायूंचे व्यायाम करून तुम्ही तुमचे घोरणे बंद करू शकता. यासाठी जीभ आणि घशाच्या स्नायूंवर योग्य ताण येईल असे व्यायाम नियमित करा. गाणं हा नाक,जीभ आणि घशाच्या स्नायूंना व्यायाम देणारा योग्य उपक्रम आहे. याचप्रमाणे तज्ञ्जांकडून जीभ आणि घशाचे इतर व्यायामदेखील शिकून घ्या आणि त्याचा सराव करा. घोरणे बंद करण्यासाठी उपाय केल्याने नक्कीच चांगला फायदा होईल. 

 

पुरेशी झोप घ्या (Get Enough Sleep)

थकवा अथवा अती कष्टामुळेही तुम्ही झोपेत घोरण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला पुरेसा आराम मिळणे खूप गरजेचं आहे. चांगल्या आरोग्यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ तास झोपण्याची गरज असते. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर अशक्तपणा आणि थकव्यामुळे तुमच्या श्वसनमार्गाच्या कार्यात अडथळे  येतात आणि जेवढा वेळ तुम्ही झोपता तेवढा वेळ तुम्ही घोरू लागता. यासाठीच शांत आणि निवांत झोप मिळेल असे घरगुती उपाय करा. लवकर झोपा आणि वेळेवर उठा म्हणजे तुमचे जीवनचक्र सुरळीत सुरू राहील आणि हळू हळू घोरण्याची सवय कमी होईल. यासाठी जाणून घ्या शांत झोप लागण्याचे उपाय 

ADVERTISEMENT

झोपेत घोरणे बंद करण्यासाठी उपाय याबाबत प्रश्न (FAQ’s)

1. घोरणे आरोग्य बिघडल्याचे एक लक्षण आहे का ?

झोपेत घोरण्यामागची कारणे अनेक असू शकतात. जसं की, अपुरी झोप, अशक्तपणा, थकवा, घशाचे विकार, सर्दी, मधुमेह, अती वजन, उच्च रक्तदाब. त्यामुळे तुम्ही का घोरत आहात हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार योग्य ते उपचार करून तुम्ही घोरणे बंद करू शकता.

2. घोरणे बंद करण्यासाठी काय खावे ?

घोरणे बंद करण्यासाठी काय खावे यापेक्षा कधी काय खावे हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी रात्री फार उशीरा जेवू नका आणि घोरणे बंद करण्याचे घरगुती उपाय करा.

3. कोणता व्यायाम केल्याने घोरणे बंद होते ?

घोरणे बंद करण्यासाठी जीभ आणि घशाच्या स्नायूंना आराम मिळेल असे व्यायाम करावेत. गाणं हा जीभ आणि घशाच्या स्नायूंना आराम देणारा चांगला व्यायाम आहे.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

 

22 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT