ADVERTISEMENT
home / मनोरंजन
smart-jodi-finale-winner-ankita-lokhande-and-vicky-jain-get-trolled-for-their-big-win-in-marathi

Smart Jodi अंकिता आणि विकी का होत आहेत ट्रोल

रियालिटी शो म्हटलं वाद आणि रियालिटी शो हे समीकरणच आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मार्ट जोडी (Smart Jodi) या रियालिटी शो ने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र शो च्या शेवटच्या भागात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) या जोडीने बाजी मारली. पण यावरून आता ही जोडी ट्रोल होत आहे. ज्यांनी ज्यांनी हा शो पूर्ण पाहिला आहे, ते नक्कीच या गोष्टीशी सहमत होऊ शकतील आणि ज्यांनी हा शो पाहिला नाहीये, त्यांच्यासाठी हा लेख नक्कीच आधार ठरेल. स्मार्ट जोडीमध्ये नक्की कोणाला ट्रॉफी मिळायला हवी होती अथवा नक्की गोष्टी कुठे चुकल्या याबाबत आम्ही आमचा दृष्टीकोन इथे तुम्हाला सांगत आहोत. बघा तुम्हालाही पटतंय का…

इतर जोड्यांकडे नेहमीच झाले दुर्लक्ष 

‘स्मार्ट जोडी’ कार्यक्रमामध्ये एकूण 10 जोड्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भाग्यश्री – हिमालय (Bhagyashree – Himalaya), अर्जुन – नेहा (Arjun Bijlani – Neha Swami), गौरव तनेजा – रितू राठी (Gaurav Taneja – Ritu Rathee), बलराज सान्याल – दिप्ती तुली (Balraj Sanyal – Deepti Tuli) यासारख्या तगड्या जोड्या होत्या, ज्यांनी अंकिता आणि विकीबरोबर सहभाग घेतला होता. मात्र पहिल्यापासूनच या जोड्यांना खूप वेळा दुय्यम वागणूक मिळाल्याचे दिसून आले. अनेकदा सोशल मीडियावरही याबाबत चर्चा झालेली दिसून आली. प्रत्येक वेळी इतर जोड्यांना कमी फुटेज मिळत असल्याचेच मत नेटिझन्सही झाले होते. त्यामुळे शेवटी शेवटी हा शो स्क्रिप्टेड आहे आणि अंकिता – विकीच जिंकणार असा अंदाज बांधायलाही सुरूवात झाली होती. तर अर्जुन – नेहा आणि बलराज – दिप्ती यापैकी कोणीही जिंकले असते तरीही ते योग्य होते कारण त्यांनी पहिल्यापासून खूपच मेहनत केली होती असा सूर सोशल मीडियावर दिसून येतो आहे. 

अंकिता आणि विकीच्या वागणुकीतून दुखावले प्रेक्षक 

आपण म्हणजे कोणीतरी वेगळे अशी अंकिता आणि विकीचा वागणूकही अनेक प्रेक्षकांना खटकल्याचे दिसून येत आहे. फिनालेमध्येदेखील शेवटचा टास्क चालू असताना विकीने उच्चारलेली काही वाक्य ही खटकण्यासारखी होती. इतर सहभागी झालेले कलाकार बलराजला प्रोत्साहन देत असताना त्याला प्रोत्साहन देऊ नका अथवा बलराज तू 25 लाखांचं बक्षीस घे, पण ट्रॉफी मला दे अशासारखी वाक्य ही विकीला पैशाचा माज आल्यासारखीच वाटत होती. दरम्यान ट्रॉफी घेताना अंकिताने आपण आळशी असून आजच केवळ शेवटचा टास्क मनापासून खेळल्याचे स्वतःच मान्य केले होते. त्यामुळे या दोघांनाही ट्रॉफी देणं योग्य नाही असंच सध्या चाहत्यांमध्ये म्हणणं असून अर्जुन – नेहा अथवा बलराज – दिप्ती या जोडीवर अन्याय झाल्याचे म्हणणे आहे. 

इतर सहकलाकारांकडेही दुर्लक्ष

अनेकदा या रियालिटी शो चे भाग बघत असताना अंकिता आणि विकी हे अर्जुन आणि नेहा सोडून इतर सहकलाकारांकडेही दुर्लक्ष करतानाच दिसून येत होते. त्यामध्यै गौरव – रितू, नील – ऐश्वर्या, मोनालिसा – विक्रांत या जोड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अनेकदा आपल्या आवडत्या जोड्यांकडे विकी – अंकिता दुर्लक्ष करत आहेत, हे चाहत्यांनाही सहन झाले नाही. त्यामुळे अनेकदा ही जोडी या कारणासाठी ट्रोल करण्यात येत होती आणि आता जिंकल्यानंतर तर अनेकांना चॅनेलला याच जोडीला जिंकवायचं होतं असाही आरोप अनेकांनी केला आहे. 

ADVERTISEMENT

विकी आणि अंकिता मात्र आनंदात 

या सगळ्या ट्रोलिंगनंतरही विकी आणि अंकित मात्र आपल्या जिंकण्याचा आनंद अजूनही व्यक्त करत आहेत. आपल्या सोशल मीडियावर रोज काही ना काही पोस्ट करत ही ट्रॉफी आपल्यासाठी किती महत्त्वाची होती हेच सांगत आहेत, तर आपणच ही ट्रॉफी मिळविण्यासाठी पात्र होतो असं दोघांचंही म्हणणं आहे. रितेश आणि जेनिलिया देशमुख (Riteish Deshmukh – Genelia Deshmukh) यांच्या उपस्थितीत स्मार्ट जोडीचे पहिले विजेते म्हणून विकी आणि अंकिताला घोषित करण्यात आले आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT