ADVERTISEMENT
home / मनोरंजन
the broken news sonali bendre

‘द ब्रोकन न्यूज’ मधून सोनाली बेंद्रे करणार डिजिटल डेब्यू

1994 मध्ये पदार्पण केल्यापासून हिंदी चित्रपट प्रेक्षकांना भुरळ घालणारी सोनाली बेंद्रे लवकरच आणखी एक पदार्पण करणार आहे. यावेळी ती  OTT वर पदार्पण करणार आहे. सोनाली आता Zee5 ची नवीन मालिका, The Broken News मध्ये दिसणार आहे. सोनालीने बुधवारी शोचा टीझर शेअर करत तिच्या पहिल्या ओटीटी प्रोजेक्टची घोषणा केली. अवघ्या ४० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये आवाज भारतीची पत्रकार अमिना कुरेशीच्या भूमिकेत सोनाली बेंद्रे झळकणार आहे. व्हिडिओची सुरुवात स्क्रीनवर “हायजॅक्ड” आणि “ब्रेकिंग न्यूज” या शब्दांनी होते. त्यानंतर अभिनेता जयदीप अहलावत जोश 24/7 च्या दीपंकर सनयालच्या भूमिकेत दिसतो आणि “मसालेदार आणि सनसनाटी” बातम्यांद्वारे प्रेक्षकांचे लक्ष “हायजॅक” करण्यासाठी सज्ज होतो. त्यानंतर अमिना म्हणून सोनाली बेंद्रे येते, जी तथ्यांशी छेडछाड न करता प्रामाणिक बातम्या देण्याचे वचन देते. “सच दिखाना हमारी जिम्मदारी है (सत्य दाखवणे ही आमची जबाबदारी आहे),” अमिना व्हिडिओमध्ये ठामपणे सांगते. आवाज भारतीच्या राधा भार्गवच्या भूमिकेत श्रिया पिळगावकर हे त्रिकूट पूर्ण करते. “सनसनी या सच (सनसनाटी किंवा सत्य)?” असा प्रश्न ती विचारते.

 OTT पदार्पण करताना आनंद होतोय – सोनाली बेंद्रे 

तिच्या आगामी मालिकेचे टीझर शेअर करताना सोनाली बेंद्रे म्हणाली, “मला अजूनही विश्वास बसत नाहीये की हे प्रत्यक्षात घडत आहे.. सेटवर परत येणे, सर्जनशील प्रक्रियेकडे परत येणे, माझे सहकलाकार आणि दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधणे… एक पात्र पडद्यावर जिवंत करणे हे सगळे मला खूप छान वाटते आहे. Zee5 सह माझे OTT पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे, आम्ही एकत्र खूप काही केले आहे आणि ही संपूर्ण टीम म्हणजे एखाद्या कुटुंबासारखीच झाली आहे.” या प्रोजेक्टविषयी बोलताना सोनाली बेंद्रे पुढे म्हणाली की , “मला या शोची संकल्पना अगदी सुरुवातीपासूनच आवडली आणि ती पूर्ण झाली याचा मला अभिमान आहे…तुम्हा सर्वांना ही मालिका कधी बघायला मिळेल याची मी आतुरतेने वाट बघत आहे.”

सोनालीला दिल्या इंडस्ट्रीतील सहकलाकारांनी शुभेच्छा 

सोनालीने हे टिझर पोस्ट करताच तिच्या या पोस्टवर प्रेक्षक व सहकलाकारांनी छान प्रतिक्रिया दिल्या. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अभिषेक बच्चन म्हणाला, “ऑल द बेस्ट, भाब्स.” तर सोनालीची को-स्टार श्रिया पिळगावकर म्हणाली, “गणपती बाप्पा मोरया.” तसेच दिग्दर्शक-लेखिका ताहिरा कश्यपने टिप्पणी केली: “वूहू”! 

‘द ब्रोकन न्यूज’ हे ब्रिटीश मालिका प्रेसचे हिंदी रूपांतर 

सोनालीची आगामी मालिका ‘द ब्रोकन न्यूज’  हे 2018 ची लोकप्रिय ब्रिटीश मालिका प्रेसचे हिंदी रूपांतर आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, या शोमध्ये दोन प्रतिस्पर्धी न्यूज चॅनेलच्या प्रवासाचा मागोवा घेण्यात आला आहे. आवाज भारती हे पत्रकारितेच्या नैतिकतेवर  विश्वास ठेवते, तर जोश 24/7 न्यूज सनसनाटी आणि आक्रमक पत्रकारितेवर विश्वास ठेवते. दोन चॅनेल्स त्यांच्या “बातमीच्या शोधात” कसे एकमेकांशी स्पर्धा करतात हे या शोमध्ये दाखवले आहे.

ADVERTISEMENT

द ब्रोकन न्यूजचे दिग्दर्शन विनय वायकुल करणार आहे, ज्यांनी यापूर्वी नेटफ्लिक्स क्राईम थ्रिलर अरण्यकचे दिग्दर्शन केले आहे. व्हिडिओमध्ये दिसलेल्या तीन प्रमुख कलाकारांच्या व्यतिरिक्त, शोमध्ये इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना आणि किरण कुमार देखील दिसणार आहेत.

सोनाली बेंद्रे शेवटची 2013 च्या बॉलीवूड चित्रपट वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारामध्ये कॅमिओमध्ये दिसली होती. तिने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील काम केले आहे आणि छोट्या पडद्यावर तिने अजीब दास्तान है ये मधून पदार्पण केले. 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिने अभिनयातून थोडासा ब्रेक घेतला होता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

19 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT