ADVERTISEMENT
home / मनोरंजन
south-indian-actress-nayanthara-and-vignesh-shivan-wedding-pics-looks-more-beautiful-in-marathi

अभिनेत्री नयनतारा विवाहबंधनात, थक्क करणारा लुक

साऊथ इंडियन चित्रपटांची लेडी सुपरस्टार अशी ओळख असणारी अर्थात दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) हिने दिग्दर्शक असणाऱ्या विग्नेश शिवन याच्याशी लग्न केले आहे. आपल्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये नयनतारा आणि विग्नेश गुरूवार, 9 जून रोजी दोघेही विवाहबंधनात अडकले (Nayanthara-Vignesh Wedding). तर दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत आपला आनंदही व्यक्त केला आहे. लग्नाचा पहिला फोटो विग्नेशने शेअर करत म्हटले की, ‘10 च्या स्केलमध्ये ती नयन आहे आणि मी एक आहे. देवाच्या कृपेने आणि आमच्या आई-वडिलांच्या, मित्रमंडळींच्या आशिर्वादाने नयनताराशी मी विवाहबद्ध झालो आहे.’ तर विग्नेशनंतर नयनतारानेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत लिहिले की, ‘या जगात देवाच्या कृपेने आणि आमच्या आई-वडिलांच्या आणि मित्रमंडळीच्या आशीर्वादाने नवी सुरूवात करत आहोत, 09.06.2022’ (Nayanthara and Vignesh Shivan Wedding)

लाल साडीमध्ये नयनताराचे खुलले सौंदर्य 

नयनताराने आपला लग्नातला लुकदेखील शेअर केला आहे. नयनताराने नेसलेल्या लाल साडीमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत केवळ, ‘मिसेस’ असं नयनताराने म्हटलं आहे आणि कोणाचंही लक्ष वेधून घेणारा हा फोटो आहे. नयनताराने लग्नात दाक्षिणात्य पद्धतीची पारंपरिक अशी पांढरी कसवू साडी आणि सोन्याचे दागिने न घालता एक संपूर्ण वेगळाच लुक केला आहे. नयनताराने लाल रंगाची सुंदर साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट असे पाचूचे दागिने घालून वेगळाच लुक केला आहे. साधारण प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या लग्नातील लुकवर प्रभावित असा हा लुक दिसून येत आहे. मात्र नयनताराचे सौंदर्य या लुकमध्ये अप्रतिम उठून दिसत आहे. अनेकांना नयनताराचा हा लुक प्रियांच्या लग्नातील लुकची आठवण करून देत आहे. मात्र तरीही तिच्या लुकमध्येही एक वेगळेपणा दिसून येत आहे. 

नयनताराचा संपूर्ण लुक 

नयनताराच्या संपूर्ण लुकबद्दल सांगायचे झाले तर लग्नात तिने लाल धाग्यांची एम्ब्रॉईडेड अशी लाल साडी नेसली होती. ज्यासह तिने संपूर्ण स्लीव्हजचा ब्लाऊज वापरला. लग्नाचा लुक पूर्ण करण्यासाठी नयनताराने कुंदन आणि पाचूने सजलेले असे दागिने, पाचूचा चोकर आणि मध्यम लांबीचा असे लेअर्ड डायमंड नेकलेस घातलेला दिसून येत आहे. दरम्यान विग्नेशने लग्नात नयनताराच्या अगदी कॉन्ट्रान्स्टमध्ये आयवरी रंगाचा डिझाईनर सिल्क कुर्ता आणि धोती घातले आहे. महाबलीपुरम येथे या दोघांचा विवाह पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. दोघेही अत्यंत आनंदी दिसत असून अनेक सेलिब्रिटींसह त्यांच्या चाहत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरूख खान (Shahrukh Khan), रजनीकांत (Rajnikant), समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अशा अनेक सेलिब्रिटींनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. नयनतारा लवकरच ‘जवान’ या चित्रपटातून शाहरूख खानसह बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

नयनतारा ही दाक्षिणात्या चित्रपटातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून लवकरच ती हिंदी चित्रपटातूनही दिसणार आहे. तर प्रभुदेवासह नयनताराचे आधी नाव जोडण्यात आले होते. मात्र काही काळानंतर या दोघांचे नाते तुटले आणि त्यानंतर बरेच वर्ष नयनतारा आणि विग्नेश नात्यात होते. अखेर दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असून लग्न केले आहे. दोघांनाही भावी वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

09 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT