ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
या आहेत बॉलीवूडमधील स्टायलिश बहिणी, संपूर्ण जग करतं स्टाईल फॉलो

या आहेत बॉलीवूडमधील स्टायलिश बहिणी, संपूर्ण जग करतं स्टाईल फॉलो

बॉलीवूड आणि स्टाईल, फॅशन हे समीकरण ठरलेलंच आहे. मात्र बॉलीवूडमध्ये गेले काही वर्ष अशा काही बहिणी आहेत ज्यांनी आपले स्टाईल आयकॉन म्हणून वेगळे स्थान निर्माण तर केलेच आहे मात्र ते स्थान टिकवूनही ठेवले आहे. त्यामध्ये काही जणींची भर पडली आहे तर काही जणी गेले कित्येक वर्ष हे स्टाईल स्टेटमेंट गाजवत आहेत. अशा कोणत्या बहिणींच्या जोड्या आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हाला यापैकी कोणती जोडी आवडते ते तुम्ही आम्हाला सांगा. तशा तर बॉलीवूडमध्ये अशा अनेक बहिणींच्या जोड्या आहेत पण नेहमी टॉपवर असणाऱ्या अशा पाच जोड्यांंबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्या आहेत या बहिणींच्या जोड्या आपण पाहूया. 

1. करिष्मा कपूर आणि करिना कपूर खान

करिष्मा कपूर आणि करिना कपूर खान ही बहिणीची जोडी तर स्टाईल आणि अभिनय या दोन्हीच्या बाबतीत गेले दोन दशकं बॉलीवूडवर राज्य करत आली आहे. करिष्मा आपल्या अभिनयासह आपल्या स्टाईलसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. वयाच्या पन्नाशीच्या जवळ आलेली करिष्मा आजही तितकीच सुंदर आणि स्टाईल आयकॉन आहे. तर करिना कपूर खानची गोष्टच वेगळी आहे. ती जी फॅशन करेल ती स्टाईल बनते. अगदी तिच्या गरोदरपणातही तिने आपली स्टाईल जपली होती. करिना कधीही कोणत्याही ठिकाणी गेली तरीही तिची फॅशन ही स्टाईल म्हणूनच पाहिली जाते. करिष्मा आणि करिना दोघींनीही नेहमीच आपलं सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ केले आहे. इतक्या वर्षांनंतरही या दोघींचीही जादू कायम आहे. करिष्मा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती नेहमीच पोस्ट शेअर करत असते. 

इंडो-चायना गलवान तणावावर अजय देवगण बनवणार चित्रपट

2. सोनम कपूर आणि रिहा कपूर

बॉलीवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळख कमावलेली सोनम कपूर तर तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. तिची स्टाईल आणि फॅशन ही तिची बहीण रिहा कपूर सांभाळते. या दोन्ही बहिणी स्टायलिश असून नेहमीच यांच्या स्टाईल फॉलो केल्या जातात. कोणत्या कार्यक्रमासाी  सोनम काय कपडे  घालणार याकडे नेहमीच मीडियाचंच नाही तर संपूर्ण बॉलीवूडचं लक्ष लागून राहिलेलं असतं. सोनम प्रत्येक स्टाईल खूपच चांगली कॅरी करते. त्याचं संपूर्ण श्रेय हे  तिची बहीण रिहा कपूला जातं. सोनमचे कपडे स्टाईल करण्याचं काम नेहमीच रिहा करते. अगदी  कोणत्याही कार्यक्रमात सोनमची स्टाईल ही रिहानेच केलेली दिसून येते. या दोन्ही बहिणी नेहमीच स्टाईल उत्तररित्या कॅरी करताना दिसतात.  

ADVERTISEMENT

3. मलायका अरोरा आणि अमृता अरोरा

मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या दोन्ही बहिणी गेल्या दोन दशकांपासून बॉलीवूडमध्ये आहेत. चित्रपटांमध्ये आयटम साँगमध्ये  आपला जलवा दाखवणारी मलायका अरोरा ही नेहमीच आपल्या स्टाईलने तिच्या चाहत्यांना घायाळ करते. अगदी तिचा जिम लुक असो अथवा कोणत्याही कार्यक्रमासाठी परिधान केलेले कपडे असोत. मलायका आणि अमृता या दोघीही प्रत्येक स्टाईल अप्रतिमरित्या कॅरी करताना दिसतात. मग ते आधुनिक कपडे असोत अथवा पारंपरिक कपडे असोत. मलायका अरोराचे तर आजही अनेक चाहते आहेत. वयाच्या 45 व्या वर्षीही मलायकाने आपली फिगर उत्कृष्ट राखली असून आजही तरूण  तिच्याकडे आकर्षिक होताना दिसतात. 

सुशांतच्या आत्महत्येच्या 20 दिवसांनंतरही ‘या’ अभिनेत्रीला होतोय त्रास

4. शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी

लाखों दिलों की ‘धडकन’ म्हणून प्रसिद्ध असणारी शिल्पा शेट्टी आणि तिची बहीण शमिता शेट्टी या दोघीही गेले कित्येक वर्ष बॉलीवूडवर राज्य करत आहेत. शिल्पाच्या तुलनेत शमिताला प्रसिद्धी मिळाली नसली तरीही शमिताही स्टाईलच्या बाबतीत शिल्पापेक्षा कमी नाही. शिल्पा मात्र अनेकांची स्टाईल आयकॉन आहे हे नक्की. शिल्पाला सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्याशिवाय शिल्पाने आजही स्वतःला ज्या तऱ्हेने योगा आणि व्यायामाने मेंनटेन केले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. शिल्पाच्या योगाच्या सीडी अगदी मनापासून फॉलो करणारे लोकही आहेत. तिचे स्टाईल स्टेटमेंट इतके फॉलो केले जाते की ती जी फॅशन करेल ती स्टाईल होते.

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत पुन्हा बदलली शनाया, रसिका येणार का परत

ADVERTISEMENT

5. कंगना राणौत आणि रंगोली चांडेल

आपल्या स्वतःच्या हिमतीवर बॉलीवूडची ‘क्वीन’ झालेल्या कंगना राणौतचं स्टाईल स्टेटमेंटही तितकंच छान आहे. हिमाचलमधून आलेल्या कंगनाने आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आणि तिच्या बरोबरीने तिचं काम सांभाळणारी तिची बहीण रंगोली चांडेलनेही आपल्या बोलण्याने एक वेगळी ओळख निर्माण केली. हे जरी खरं असलं तरीही या दोघींनीही आपलं स्टाईल स्टेटमेंट जपलं आहे. आजही कोणत्याही कार्यक्रमाला पारंपरिक साडी असो अथवा आधुनिक कपडे असोत या दोघीही तितक्याच उत्तमरितीने स्टाईल कॅरी करतात यात वाद नाही. 

06 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT