आपल्यापैकी अनेकांना धुळीची ऍलर्जी असते. धुळीचे काही कण जरी नाकात गेले तर धुळीची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींना त्रास सुरु होतो. एकापाठोपाठ एक अशा भरपूर शिंका येतात, नाकातून पाणी वाहू लागते, नाक चोंदते, श्वास घ्यायला त्रास होतो, सर्दी होते, घसा खवखवू लागतो, डोळ्यांतून पाणी येऊ लागते आणि डोळे चुरचुरतात, लाल होतात आणि सुजतात. अगदी थोड्याश्या धुळीच्या संपर्कात आले तरी या व्यक्तींना भयंकर त्रास होतो आणि अँटीहिस्टमाईन औषधे घेतल्याशिवाय आराम मिळत नाही. धुळीची ऍलर्जी ही एक प्रतिक्रिया आहे जी शरीरात उद्भवते जेव्हा धुळीचे कण श्वसनमार्गावर पोहोचतात. या ऍलर्जीमुळे नाक वाहणे, शिंका येणे, ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. धुळीची ऍलर्जी असणे हे कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण आहे. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक सहसा धुळीच्या कणांच्या संपर्कात आले तरी त्यांना त्याचा फार त्रास होत नाही. जर तुम्हाला नियमितपणे धुळीची ऍलर्जी होत असेल तर ते कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीचे लक्षण असू शकते.कधी कधी ऍलर्जीमुळे अंगावर पित्त उठते. पित्तावर घरगुती उपाय करता येतात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. हे सुपरफूड्स सिझनल ऍलर्जीचा त्रास कमी करण्यात फायदेशीर ठरतात.
सुपरफूड्स जे धुळीच्या ऍलर्जीची लक्षणे दूर करू शकतात किंवा कमी करू शकतात
हळद: हळद औषधी आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात शिवाय हळद तिच्या रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नियमित गरम दुधात हळद घालून पिणे फायदेशीर आहे.
आले: सर्दी पडसे झाले असेल तर आपल्याकडे पूर्वीपासूनच आल्याचा रस औषध म्हणून देण्याची परंपरा आहे. आले प्रचंड औषधी आहे. त्याने कफ कमी होतो तसेच अन्नपचनासाठी देखील आले फायदेशीर आहे. आल्यामध्ये शरीर बरे करण्याचे गुणधर्म आहेत. धुळीच्या ऍलर्जीमुळे शरीरात रक्तसंचय आणि जळजळ होते, जे कमी करण्यास आले फायदेशीर आहे.
लसूण:आल्याप्रमाणेच लसूण देखील भारत आणि इतर आशियाई देशांमध्ये सुपरफूड समजले जाते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत. म्हणूनच अनेक पदार्थांमध्ये आलं व लसूण आवर्जून वापरले जाते.
कांदा : कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचा पदार्थ असतो. हा घटक शरीरात हिस्टामाइनचे उत्पादन कमी करण्यास मदत करतो. हिस्टामाइन हे एक रसायन आहे जे शरीर ऍलर्जीच्या प्रतिसादात तयार करते, ज्यामुळे सूज, रक्तसंचय आणि इतर लक्षणे उद्भवतात.
टोमॅटो: टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, ज्यामुळे त्यांना चमकदार लाल रंग मिळतो. लाइकोपीन हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जो आपल्या पेशींचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्यात मदत करते.
सुका मेवा : ड्राय फ्रुट्स हे खूप पौष्टिक असतात. या पौष्टीक सुक्यामेव्यामध्ये बदाम, काजू आणि अक्रोड यांचा समावेश होतो. ते केवळ प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर सूज व जळजळ कमी करण्यास देखील मदत करतात.
ग्रीन टी: ग्रीन टी त्याच्या मेटाबॉलिजम आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हे नाकाची जळजळ दूर करण्यास देखील मदत करते.
दालचिनी: जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल व ऍलर्जीची लक्षणे कमी करायची असतील तर मधाप्रमाणे दालचिनी ही तुमच्या आहारात समाविष्ट करावी.
मध: मध हे आणखी एक उत्तम सुपरफूड आहे ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. त्याचे दाह-विरोधी गुणधर्म ऍलर्जीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
अन्न हे ऍलर्जीवर उपचार करत नाही. परंतु त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. ते तुमचे संपूर्ण शरीर चांगले ठेवतात.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक