कमल हासनचा ‘विक्रम’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होताच अगदी कमी वेळात त्याने दीडशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. कमल हानसच्या विक्रममध्ये साऊथ अभिनेता सूर्याचा पाच मिनिटांचा रोल आहे. कमल हासनच्या आग्रहाखातर सूर्याने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. मात्र या पाच मिनिटांसाठी अभिनेता सूर्याने किती मानधन घेतलं हे ऐकाल तर थक्क व्हाल.
विक्रममध्ये सूर्याचा कॅमिओ
सूर्या (Suriya) आज साऊथचा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचं चित्रपटातील मानधन हे आजच्या घडीला कोटींच्या घरात आहे. मग सूर्याने विक्रम चित्रपटात फक्त पाच मिनिटांची भूमिका का केली असेल असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. सूर्याने या चित्रपटात काम करण्यामागे त्याचं एक खास कारण आहे. विशेष म्हणजे सूर्याने या चित्रपटासाठी एका रुपयांचंही मानधन घेतलेलं नाही. जाणून घ्या यामागे काय आहे कारण…
कमल हासनसासाठी सूर्याने केला विक्रममध्ये कॅमिओ
विक्रम चित्रपटात सूर्या रोलेक्सच्या भूमिकेत झळकला आहे. पाच मिनिटांच्या या भूमिकेसाठी सूर्या कमल हासनला सहज नाही म्हणू शकला असता. कारण आज तो मुख्य भूमिकेसाठी कोटींच्या घरात मानधन घेतो. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालतात. पण सूर्याने कमल हासनसाठी ही भूमिका स्वीकारली होती. सूर्या कमल हासनला स्वतःचा गुरू मानतो. शिवाय तो लहानपणापासून कमल हासन यांचा चाहता आहे. कमल हासन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार हाच आनंद त्याच्यासाठी खूप मोठा होता. ज्यामुळे त्याने या चित्रपटासाठी कमल हासन यांच्याकडून कोणतंही मानधन स्वीकारलं नाही. नुकतंच सूर्याने एक ट्वीट केलेलं आहे. ज्यात त्याने लिहिलं आहे की,” कमल हासन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मला मिळाली. ही तुमच्या आयुष्यातील एक मोठ स्वप्न पूर्ण होण्यासारखी घटना आहे” सूर्याच्या या ट्वीटवरूनच त्याला कमल हासन यांच्याबद्दल वाटणारा आदर आणि प्रेम व्यक्त होतं.
‘विक्रम’चा धुमधडाका सुरूच
कमल हासन, विजय सेतुपति आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला विक्रम सिनेमाघरात तीन जूनला प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. विक्रम चित्रपटाचं दिग्दर्शन कनगराज यांनी केलं आहे. कमल फिल्म इंटरनॅशनद्वारे हा चित्रपट प्रोड्यूस करण्यात आला आहे. या चित्रपटाचे संवाद रतना कुमार आणि लोकेश यांनी लिहीले आहेत. या चित्रपटात कालिदास जयराम, नारायण, अर्जुन दास यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक