अभिनेत्री सुरवीन चावलाला काहीच महिन्यांपूर्वी कन्यारत्न झालं. फेब्रुवारीमध्ये तिने तिच्या बाळाला जन्म दिला. तिच्या जन्माच्या काहीच महिन्यानंतर ती आता कामावर परतली आहे. पण तिच्यासोबत तिच्या मुलीनेही डेब्यू केला आहे. काय तुम्हाला ऐकून धक्का बसला असेल ना? अवघ्या 5 महिन्यांची सुरवीनची परी डेब्यू कसा काय करु शकेल. पण हे खरे आहे. सुरवीन सोबतच तिने डेब्यू केले आहे.
या माध्यमातून केला डेब्यू
आता डेब्यू म्हणाल तर आई सुरवीनप्रमाणेच अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावणार असे वाटत आहे. कारण सुरवीनची झिवा सुरवीनसोबत एका जाहिरातीत दिसली आहे. विशेष म्हणजे यात अवघ्या 5 महिन्यांच्या झिवाचा चेहरा दाखवण्यात आला आहे. सुरवीनने स्टार किड असूनही तिचा चेहरा रिवेल केला याचे आश्चर्य आहे. पण छोट्या झिवाने सगळ्यांचे मन जिंकले आहे. त्यामुळे तुम्ही या छोट्या आणि लाडक्या झिवाची ही जाहिरात नक्कीच पाहायला हवी.
डिजीटल डेब्यूसाठी दिव्यांका त्रिपाठीचा HOT Makeover
बेबी प्रोडक्टच्या जाहिरातीतून केला डेब्यू
आता ही जाहिरात कोणती अशी तुम्हाला उत्सुकता असेल तर झिवा एका बेबी प्रोडक्टच्या जाहिरातीत दिसली आहे. जॉनसनसाठी ही जाहिरात करण्यात आली असून या जाहिरातीमध्ये झिवाटा चेहरा अगदी व्यवस्थित दिसत आहे. स्वत:सुरवीनने ही जाहिरात तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहे. तिने ही पोस्ट शेअर केल्यानंतर झिवाच्या डेब्यूच्या जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.
झिवा बनतेय आकर्षण
स्टार्सच्या मुलांकडे सगळ्यांचे लक्ष असते. तैमुरनंतर स्टार किडचा एक ट्रेंडच झाला आहे. तैमुरची प्रसिद्धी पाहता आता सगळ्याच स्टार किडकडे फार लक्षपूर्वक पाहिले जाते. सुरवीनच्या फॅन्सनी झिवाला कमेंटच्या रुपात भरभरुन प्रेम दिले आहे. झिवाचा चेहरा दाखवण्याची सुरवीनकडे तिच्या फॅन्सनी मागणी केली होती. पण आता सुरवीनने योग्य संधी साधत झिवाचा गोड चेहरा सगळ्यांना दाखवला आहे.
राधे बनून परतणार सलमान, दोन चित्रपटांचे करणार मॅशअप
सेक्रेड गेम्समध्ये दिसली सुरवीन
सुरवीन चावला नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये दिसली होती. पहिल्या भागात ती फक्त एका सीनपुरतीच दिसली होती. पण या नव्या भागामध्ये तिचे काम काय ते कळले होते. त्यामुळे ती एका सीनपुरती नाही तर तिची स्टोरी या दुसऱ्या भागात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सुरवीनची प्रसिद्ध आता आपोआपच वाढली आहे
लग्नही केले होते लपून
सुरवीन चावलाबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची तर सुरवीनने 2015साली लग्न केले. तिने इटलीमध्ये जाऊन लग्न केलं. पण तिने याबद्दल कोणालाच काही सांगितले नाही. तिने तिच्या लग्नाची बातमी 2017 साली ट्विटरवरुन दिली. अक्षय ठक्करसोबत तिने लग्न केले असून 2019 एप्रिलमध्ये तिने झिवाला जन्म दिला. तिने तिच्या आयुष्यातील ही आनंदवार्ता सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली.
रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा फोटो होतोय व्हायरल, यातलं तथ्य नक्की काय
आता पुढे काय?
सुरवीन सध्याच पुन्हा परतल्यामुळे ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे या बद्दलची कोणतीच माहिती अद्याप नाही. पण ती पुन्हा एकदा चांगल्या प्रोजेक्टमध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान झिवाने ही पहिली जाहिरात केल्यानंतर या पुढे सुरवीनसारखीच ती देखील उत्तम अभिनेत्री म्हणून समोर येणार अशी चर्चा होऊ लागली आहे. पण सध्या या चर्चेपेक्षा झिवाची ही जाहिरात पाहा. कारण तुम्हाला ही छोटी झिवा नक्कीच प्रेमात पाडेल.