स्तनाचा कॅन्सर अर्थात ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आजकाल अनेक महिलांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. आपली बदलती लाईफस्टाईल आणि जगायच्या पद्धतीमुळे स्तनाच्या कॅन्सरमध्ये वाढ झाल्याचे आढळून येत आहे. पण ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे (Breast Cancer Symptoms In Marathi) नक्की काय आहेत अथवा ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनाचा कॅन्सर म्हणजे नक्की काय? (Breast Cancer In Marathi) ब्रेस्ट कॅन्सरविषयी महत्त्वाची माहिती (Breast Cancer Information In Marathi) या लेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. स्तनाच्या कॅन्सरमध्ये स्तनांमधील नसा अनियंत्रित पद्धतीने वाढतात. बरेचदा लोब्युल्स आणि दुग्ध नलिकांमध्ये संक्रमण होते आणि शरीराच्या अन्य भागामध्ये हे संक्रमण पसरते. त्याआधी आपण ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे (Symptoms Of Breast Cancer In Marathi) जाणून घेऊया.
Symptoms Of Breast Cancer In Marathi | ब्रेस्ट कॅन्सर ची लक्षणे
1. स्तनामध्ये निर्माण झालेल्या गाठी
ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत सर्वात मोठे आणि सर्वसाधारण लक्षण म्हणजे स्तनामध्ये जाणवणारी गाठ (Symptoms Of Breast Cancer Stage 1 In Marathi). स्तनांमध्ये तुम्हाला गाठ जाणवत असेल तर वेळीच त्याची तपासणी करण्यात यायला हवी. गाठ कितीही लहान असली तरी त्वरीत तुम्हाला मनात शंका आल्यानंतर डॉक्टरांना भेटायला हवे. हे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण आहे.
2. स्तनाच्या भागामध्ये सूज
स्तनाच्या संपूर्ण भागामध्ये सूज येते. स्तनाच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची सूज हे नक्कीच तुमच्या समस्येचे कारण आहे. वास्तविक गर्भावस्थेमध्ये स्तनांना सूज येते. पण स्तनाच्या त्वचेमध्ये जळजळ अथवा डिंपलिंगसारखी लक्षणे जाणवायला लागली तर तुम्हाला त्याबाबत अधिक जागरूक व्हायला हवे. यावेळी स्तनांची त्वचा ही लाल होते. केवळ स्वतः निरीक्षण करून थांबू नका, तर वेळीच तुम्ही डॉक्टरांचा याबाबत सल्ला घ्या. तुम्हाला स्तनांना सूज सतत जाणवत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरचे हे लक्षण असू शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.
3. स्तनांच्या त्वचेमध्ये होतो बदल
स्तनाच्या त्वचेमध्ये जर बदल होत असेल तर तेदेखील कॅन्सरचे एक लक्षण आहे हे लक्षात घ्या. अजिबात याकडे दुर्लक्ष करू नका
- स्तनाच्या त्वचेमध्ये जळजळ होणे
- त्वचेला अधिक सूज येणे आणि त्वचा जाडी होणे
- स्तनाच्या नसा सुजणे अथवा डिंपलिंग
- त्वचा खेचली जाणे आणि त्वचेमध्ये बदल होणे
- स्तनांच्या आकारात होतो बदल
4. निप्पल्समध्ये बदल
निप्पल्स साधारणतः गर्भावस्थेदरम्यान बदलतात. निप्पल्सचा रंग काळा पडणे हे यादरम्यान सामान्य आहे. पण निप्पल्समधून जर अचानक स्राव होत असेल तर याकडे दुर्लक्ष करून चाळणार नाही. तसंच निप्पल्स आतल्या बाजूला दबले जाणे हेदेखील ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. जर तुमच्या निप्पल्समध्ये सतत दुखत असेल तर तुम्ही वेळीच याची तपासणी करून घ्या. कारण स्तनांच्या कॅन्सरमध्ये निप्पल्समध्ये अधिक त्रास होतो असे दिसून आले आहे. याशिवाय निप्पल्सवर लहान लहान दाणे आल्यासारखे वाटतात आणि निप्पल्स उलटे होतात.
5. अंडरआर्म्समध्ये गाठ
स्तनांचा कर्करोग असेल तर बऱ्याच महिलांना अंडरआर्ममध्येही गाठ होते. ही गाठ ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित असण्याची शक्यता असते. कारण स्तनांच्या नसा या अंडरआर्म्सपर्यंत पोहचलेल्या असतात. तसंच कॅन्सर हा हाताच्या खाली असणाऱ्या लिम्फ नोड्समध्येही पसरतो. त्यामुळे तुमचे तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलाकडे (Breast Cancer Chi Lakshane In Marathi) नेहमी व्यवस्थित लक्ष असायला हवे. कामाच्या नादात तुम्ही तुमच्या तब्बेतीची अजिबात हेळसांड करू नका.
Breast Cancer Reason In Marathi | ब्रेस्ट कॅन्सर होण्याची कारणे
ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये अधिक होतो हे आता सर्वांनाच माहीत आहे. मात्र याची नक्की काय कारणे आहेत तेदेखील आपण पाहूया.
मासिक पाळीमधील बदल
महिलांनी या गोष्टीकडे अधिक लक्ष द्यायला हवे की, मासिक पाळी अथवा पिरियड्समध्ये तुम्हाला काही फरक जाणवत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांना संपर्क साधावा. उदा. 12 व्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली अथवा 30 वर्षाच्या कालवाधीत तुम्ही गर्भवती असाल त्यादरम्यान अथवा वयाच्या 55 वर्षी तुम्हाला मेनोपॉज आला अथवा तुमच्या मासिक पाळीचा कालावधी हा 26 दिवसांपेक्षा कमी असेल अथवा 29 दिवसांपेक्षा अधिक असेल तर ब्रेस्ट कॅन्सरचे कारण ठरू शकते.
नशेच्या पदार्थांचे व्यसन
दारू, सिगरेट अथवा ड्रग्जचे सेवन महिलांनी अधिक केल्यास, ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो आणि त्यामुळेच सध्या कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. कोणत्याही प्रकारचा नशा अधिक केल्यास, शरीरामध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढण्याची शक्यता (Breast Cancer Causes In Marathi) अधिक असते. त्यामुळे नशेच्या पदार्थांचे सेवन हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते.
अनुवंशिकता
कुटुंबामध्ये कोणालाही ब्रेस्ट कॅन्सर आधी झाला असेल तर अनुवंशिकतेने पुढच्या पिढीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते. एखाद्या जवळच्या नातेवाईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर सदर घरामध्ये कोणत्याही महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तपासणीच्या मदतीने याबाबत तुम्ही जाणून घेऊ शकता. तसंच तुमच्या घरात अनुवंशिकता असेल तर एका ठराविक कालावधीत तुम्ही तुमची तपासणी करून घ्यायला हवी. इतकंच नाही जर कुटुंबामध्ये कोणालाही ब्रेस्ट कॅन्सर नसेल पण अन्य कोणत्याही कॅन्सरला सामोरे जात असतील तर कुटुंबातील अन्य सदस्यांनी सावध राहायला हवे.
Breast Cancer Gharguti Upay In Marathi | ब्रेस्ट कॅन्सरसाठी घरगुती उपाय
हल्ली महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. स्तनांमध्ये एक विशिष्ट प्रकारची गाठ येते. केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांनाही हा कॅन्सर होऊ शकतो. हा कॅन्सर होण्यापासून आपण रोखू शकत नाही पण कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आपण नक्कीच करू शकतो.
- तुम्हाला अल्कोहोल घेण्याची सवय असेल तर वेळीच अल्कोहोलचे सेवन कमी करा. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो
- नेहमी योग्य आणि पोषक आहार घ्या. जेवणामध्ये नैसर्गिक फळं, पालेभाज्यांचा समावेश करा. तसंच सलाड नियमित खा. यामुळे कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी मदत मिळते
- तसंच ब्रेस्ट कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी शरीरासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत योग्य ठरते. नियमित व्यायाम केल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टळतो
- स्तनपान करणाऱ्या महिलांमध्येही ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण कमी दिसून येते. त्यामुळे तुम्ही गर्भवती असाल तर आपल्या बाळाला स्तनपान नक्की करू द्या. किमान सहा महिने बाळाला स्तनातून दूध द्या
- धुम्रपान करणे हे योग्य नाही हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही आजकाल याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक वाढतो. धुम्रपान करत असाल तर वेळीच ही सवय सोडून द्या. ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे
- गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन अधिक प्रमाणात करू नका. एका विशिष्ट वयानंतर तुम्ही जर गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करत असाल तर त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्ही याचे वेळीच सेवन बंद करा
तपासणी कधी करायला हवी? | When To Do Test For This?
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार साधारण 20 आणि 30 व्या वर्षानंतर साधारण तीन ते चार वर्षांनी स्तनांची चाचणी करून घ्यायला हवी. तर महिलांनी चाळिशीनंतर नियमित दरवर्षी आपल्या स्तनांची चाचणी करून घ्यायला हवी. साधारण 20 व्या वर्षी स्तनांची तपासणी स्वतःलादेखील करता येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने स्तनांची तपासणी करून घ्यायला हवी. वेळीच महिलांना याबाबत माहिती झाल्यास, पुढील उपचार करणे सोपे होते. त्यामुळे तुमच्या कुटुंबात जर कोणाला कॅन्सर असेल तर तुम्ही सावधानता बाळगा आणि वेळीच 20 व्या वर्षानंतर तपासणी वेळोवेळी करून घ्या.
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
1. मला ब्रेस्ट कॅन्सर आहे हे मी कसे स्वीकारू?
मुळात वेळोवेळी तपासणी करायला हवी. तुम्हाला जर ब्रेस्ट कॅन्सर झालाच तर तो बरा होतो याबाबत सकारात्मक राहा. रोज व्यवस्थित औषधे घेणे, व्यायाम करणे आणि योगाभ्यास करून मनाला सावरणे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक राहिल्यास, तुम्ही ही गोष्ट पटकन स्वीकारू शकता.
2. ब्रेस्ट बायोप्सी करताना त्रास होतो का?
तुम्हाला ब्रेस्ट बायोप्सी प्रक्रिया करताना कदाचित आरामदायी वाटणार नाही. ही प्रक्रिया होण्यासाठी साधारण 15-20 मिनिट्स लागतात. थकवा, स्तन घट्ट होणे हे अत्यंत सामान्य त्रास आहेत. पण अन्य कोणताही अति त्रास यादरम्यान होत नाही
3. ब्रेस्ट कॅन्सर बरा होतो का?
हो. वेळीच निदान झाल्यास, योग्य औषधोपचाराने ब्रेस्ट कॅन्सर बरा होतो. कधी कधी यादरम्यान सर्जरी करून गाठी काढाव्या लागतात. ब्रेस्ट कॅन्सरदरम्यान शारीरिक त्रास असला तरीही हा कॅन्सर बरा होऊ शकता.