कोरोनाव्हायरसच्या संसर्गाबद्दल अधिक माहिती मिळत असतानाच, बाळ व लहान मुलांमधील कोविड-19 बद्दल पालकांना व गार्डियन्सना कोणती गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे हे या लेखातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही डॉ. अब्दुल बशीर खान, कन्सल्टंट पीडियाट्रिक्स, मसीना हॉस्पिटल यांच्याशी याविषयी चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबतीत काही महत्त्वाची माहिती दिली आहे. लहान मुलांना कोरोनाव्हायरस होऊ शकतो का? होय, अधिक केसेस माईल्ड किंवा कोणतेही लक्षण नसणारे असतात. तथापि, काही गंभीर रोग प्रकटीकरण किंवा कॉम्प्लिकेशन आणि मृत्यूचे केसेस देखील असू शकतात. नवीन जन्मलेल्या बाळांना कोविड-19 होऊ शकतो का? असे दिसून आले आहे की कोरोनाव्हायरस ने संक्रमित स्त्रिया आपल्या नवीन जन्मलेल्या बाळांना व्हायरस पास करू शकतात. त्यामुळे याची आधी लक्षणे काय आहेत ते पाहूया.
लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल
लहान मुलांमधील कोविड-19 (Covid 19) ची लक्षणे
Freepik
सर्वसाधारणपणे लक्षणे प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत माईल्ड असतात आणि काही संक्रमित मुलांमध्ये कदाचित आजारी असण्याची कोणतीही चिन्हे नसूही शकतात.
• ताप- माईल्ड किंवा हाय, थंडी वाजण्या किंवा न वाजण्यासहित
• कफ आणि नाकाने श्वास घेण्यास त्रास
• घसा खवखवणे
• अंगदुखी
• चव किंवा वास गमावणे
• श्वास घेताना त्रास होणे
• डायरिया
• डोके दुखणे
• मळमळ किंवा उल्टी होणे
• गंभीर थकवा व विकनेस वाटणे
लहान मुलांमध्ये निमोनिया मूलभूत चिन्हे असू शकतात. कधी कधी चिन्हे दिसूनही येत नाहीत. गंभीर आजार काही मुलांमध्ये आढळतो आणि जर मुलांना या रोगानचे निदान झाले असेल तर त्यांच्या पालकांनी दक्षता बाळगायला हवी.
• श्वास घेण्यात त्रास होणे किंवा श्वास पकडणे
• फीड्स नीटपणे न घेणे
• कन्फ़्युजन किंवा झोपेच्या अवस्थेत असणे
• ओठ व बोटांच्या टोकावर निळसर रंग दिसणे
कोरोनाचा लहान मुलांमधील वाढता संसर्ग टाळण्याचा बालरोगतज्ज्ञांचा इशारा
कोरोनाव्हायरस रोगाने मुलांची प्रभावित होण्याची संभाव्यता काय आहे?
आत्तापर्यंत 15-20% भारतीय लहान मुलांची लोकसंख्या संक्रमित होत आहे आणि १५ वर्षापेक्षा कमी असणाऱ्या अधिक लहान मुलं दुसऱ्या व तिसऱ्या लाटेने संक्रमित होणार असल्याची शक्यतेची भविष्यवाणी केली जात आहे.
मुलांमध्ये गंभीर कोविड-१९ जोखीम:
• वय 2 वर्षाच्या अंतर्गत असणे
• कुपोषित आणि इम्युनो कॉम्प्रोमाईज
• प्रीमेच्युर बाळ
• कॉम्प्रोमाईस्ड फुफ्फुसची स्थिती – जसे अस्थमा, पल्मोनरी ट्यूबरक्युलोसिस, कॉंजेनिटल पल्मोनरी स्ट्रक्चरल प्रॉब्लम्स
• हृदयविकार
• जुवेनाईल डायबिटीज
• ल्युकेमियास
लहान मुलांमध्ये मल्टिसिस्टम इनफ्लेमेटरी सिंड्रोम (MIS-C)
कोविड 19 च्या मुख्य कॉम्प्लिकेशन पैकी एक एज ग्रुप – नवीन जन्मलेल्या मुलांपासून ते 15 वर्ष पर्यंत पाहण्यात आला आहे:
• 24 तासांपेक्षा अधिक उच्च ताप असण्याबरोबर टॉक्सिक लुक असणे
• शरीरावर लाल रॅश
• लाल, फाटलेले ओठ
• लाल डोळे
• सुजलेले हात किंवा पाय
• उलट्या आणि डायरीया होणे
• पोट दुखणे
कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडीज
कोरोनाव्हायरसच्या संक्रमणापासून आपल्या लहान मुलांचे संरक्षण कसे करावे:
मुलांना कोरोनाव्हायरस ने संक्रमित होण्यापासून वाचविण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना अशा लोकांपासून लांब ठेवणे जी व्हायरसने आजारी असतील( किंवा आजारी असू शकतात), ज्यात कुटुंबातील सदस्यांचादेखील समावेश आहे.
• मुलांनी आपल्या घराबाहेरील लोकांपासून किमान 6 फूट लांब राहावे
• जर ते कोणताही क्लास अटेंड करत असतील तरीही सोशल डिस्टन्स राखणे
• गर्दीच्या ठिकाणी न जाणे. मुलांना जास्त लांब न घेऊन जाणे
• जेव्हा ते बाहेर असतील तेव्हा त्यांना पूर्ण वेळ मास्क घालायला लावा
• सार्वजनिक क्षेत्रांमध्ये दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना फेस शिल्ड घालणे, कारण काही वेळा त्यांना मास्क घातल्याने कठीण व गुदमरल्यासारखे वाटू शकते
• हँड हायजीन- नियमित हात धुत राहणे सर्वोत्कृष्ट आहे आणि मोठ्या मुलांनी बाहेर हँड सॅनिटायझर वापरावे
• आपल्या मुलांना इतर व्हॅकसिन प्रतिबंधक रोग, मुख्यतः फ्लू व्हॅक्सिन आणि न्यूमोकोकलने वॅक्सीनेट करा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक