ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
तापसी पन्नू का म्हणतेय तिचा आगामी चित्रपट ‘दोबारा’ बायकॉट करा, जाणून घ्या सत्य

तापसी पन्नू का म्हणतेय तिचा आगामी चित्रपट ‘दोबारा’ बायकॉट करा, जाणून घ्या सत्य

तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप लवकरच आगामी चित्रपट ‘दोबारा’मधून प्रेक्षकांसमोर येत आहेत. चित्रपट थ्रिलर आणि ससपेन्स असल्यामुळे चाहत्यांना त्याची नक्कीच उत्सुकता लागली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर अनुराग आणि तापसी दोघांही स्वतःच्या चित्रपटाबद्दल मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत तापसीने जाहीर केलं की प्रेक्षकांनी हा चित्रपट बॉयकॉट करावा. येत्या 19 ऑगस्टला दोबारा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र तापसी आणि अनुराग या चित्रपटाचे प्रमोशन करताना प्रेक्षकांना चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी का करत आहेत असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

तापसीला का वाटतंय ‘दोबारा’ बॉयकॉट व्हावा

सोशल मीडियावर सध्या अक्षय कुमार आणि आमिर खानचे चित्रपट बॉयकॉट होत आहेत. आमिरचा लाल सिंह चड्ढा आणि अक्षयचा रक्षाबंधन सध्या विषयामुळे खूप चर्चेत आहेत. त्यामुळे सध्या चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सुरू आहे असं वाटत आहे. तापसीच्या मते जर हा ट्रेंड असेल तर तिच्या आगामी चित्रपटालाही या लीगमध्ये सहभागी व्हावं लागेल. म्हणूनच तापसी प्रेक्षकांना तिचाही चित्रपट बॉयकॉट करण्यास सांगत आहे.

सोशल मीडियावर सुरू आहे एकच चर्चा

लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधन येत्या 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. मात्र प्रदर्शित होण्याआधीच सोशल मीडियावर हे दोन्ही चित्रपट बॉयकॉट करण्यात यावे म्हणून मागणी वाढत आहे. आमिर खानचं भारत देशाबाबत केलेलं एक जुनं वक्तव्य यासाठी कारणीभूत आहे तर रक्षाबंधन पाकीस्तानी चित्रपटाची कॉपी आहे म्हणून ट्रोल होत आहे. मात्र असं असलं तरी दोन्ही चित्रपटांचे अॅडवान्स बुकिंग जोरदार सुरू आहे. शिवाय सोशल मीडियावरही याच दोन चित्रपटांची चर्चा आहे. म्हणूनच कदाचित ट्रेंडमध्ये राहण्याचा मोह तापसी आणि अनुराग कश्यपला पण आवरता आला नाही. दोबारा एक रहस्यमयी, गूढ, वेळेची अदलाबदली आणि थरारक असा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm आले आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
08 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT
good points logo

good points text