logo
Logo
User
home / DIY फॅशन
take-inspiration-from-pooja-sawants-look-while-making-jewelry-for-the-wedding

लग्नासाठी दागिने बनवताना घ्या पूजा सावंतच्या लुकवरून प्रेरणा

पूजा सावंत (Pooja Sawant) हे नाव महाराष्ट्राला नक्कीच नवे नाही. पूजा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तर याशिवाय भारतातील एक आघाडीचा ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्सची क्षेत्रीय ब्रँड अम्बॅसॅडर पूजा सावंत आहे. लग्नासाठी सर्वात आधी आपण खरेदी करायला घेतो ते म्हणजे दागिने. पूजा सावंतने आपल्या सोशल मीडिायवर अनेक लुक्स पोस्ट केले आहेत. दागिने परिधान केलेले पूजा सावंतचे पाच सर्वात शानदार लुक्स आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ज्यावरून तुम्हाला प्रेरणा घेऊन आपल्या लग्नासाठी नक्कीच दागिने करता येतील. पूजा सावंत तिच्या चतुरस्त्र अभिनयासाठी, विविधांगी भूमिकांसाठी नावाजली जाते. 2016 मध्ये माद्रिद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी तिला नामांकन देखील मिळाले होते. तर तिच्या अदा, फॅशन आणि तिच्या स्टाईलसाठीही तिला अनेक जण फॉलो करतात. 

पूजाचे खास लुक्स 

अभिनयाच्या बरोबरीनेच उत्तम नृत्यकौशल्ये देखील अंगी असल्यामुळे पूजा सावंतने मोठ्या व छोट्या पडद्यावर देखील लक्षणीय भूमिका रंगवल्या आहेत. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. स्टाईल आणि शान यांची खूप चांगली जाण असल्यामुळे सोशल मीडियावर पूजा सावंतच्या अनेक फोटो व व्हिडीओंना भरपूर लाईक्स व कमेंट्स मिळत असतात. 2010 मध्ये सचित पाटील यांच्या ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून पदार्पण केलेल्या पूजाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. पूजाचे हे खास लुक्स तुम्हाला लग्नासाठी नक्कीच प्रेरित करतील. 

1) सोनेरी किनार असलेली मोरपंखी रंगाची बनारसी साडी, त्यावर शानदार हरम हार, सुंदर चोकर सेट आणि त्याला मॅचिंग कानातले परिधान केलेल्या पूजा सावंतच्या या शानदार राजसी लूकमध्ये पिवळ्या सोन्यापासून बनवलेले हेवी कडे आणि अंगठ्या अधिक भर घालत आहेत.

Pooja Sawant – Instagram

2) पूजा सावंतचे पाहताक्षणी मन काबीज करून घेईल असे हास्य आणि सोन्याची साधी पण सुबक चेन, त्यामध्ये हिऱ्याचे हार्ट आकाराचे पेंडंट यांचा सुरेख मिलाप असलेली ही छबी कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात कायमचे घर करेल हे नक्की.

3) गुलाबी रंगाची रेशमी साडी, त्यावर सुंदरसा चोकर, हिरव्या व गुलाबी रंगांच्या मौल्यवान खड्यांनी सजलेला, देवी लक्ष्मीची प्रतिमा विराजमान असलेला खास कारीगरांनी हातांनी घडवलेला नाजूक डिझाईनचा लांब हार व हातातील कडे हे कल्याण ज्वेलर्सच्या वेडिंग कलेक्शनमधील खास दागिने परिधान केलेली पूजा सावंत मूर्तिमंत सौंदर्याची खाण भासत आहे.

Instagram

4) दगडी चाळ या चित्रपटातील अदाकारीने जिने अवघ्या प्रेक्षकवर्गाची मने जिंकली अशी चतुरस्त्र अभिनेत्री पूजा सावंत या फोटोमध्ये बॉटल्ड ग्रीन रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसते आहे. त्यावर तिने अतिशय उठावदार टेम्पल ज्वेलरी सेट घातलेला आहे. या सेटमध्ये मौल्यवान खडे जडवण्यात आले आहेत त्यासोबत अस्सल डिझाईनचा कमरबंध आहे, याच्या डिझाईन मधील अतिशय नाजूक कलाकुसर डोळे खिळवून ठेवणारी आहे. अभिजात शैली व शान दर्शवणारा हा अनोखा दागिना रचना आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट आहे. नेकपीसला साजेसे लटकते कानातले, अंगठी व एका हातात बांगड्या तर हातात कडे अशा एकापेक्षा एक सरस ऍक्सेसरीजनी पूजा सावंतचे सौंदर्य बहारदार दिसत आहे. 

Instagram

5) पूजा सावंतने याठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन लुक परिधान केला आहे. पेशवाई नथ आणि त्याला साजेसा नथीचा नखरा, गुलाबी फुलांची नक्षी असलेला सुबक चोकर, त्यापुढे छोट्या सोन्याच्या मण्यांनी सजलेला लेयर्ड नेकपीस व हिंदू परंपरेनुसार काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र असा हा अस्सल पारंपरिक साज पूजा सावंतला खूप खुलून दिसत आहे. हातातला हिरवा चुडा त्यासोबत पिवळ्या सोन्याचे कडे घालून पूजा सावंतने आपला महाराष्ट्रीयन लूक परिपूर्ण केला आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text