घरात लग्नकार्य किंवा पूजा असेल आणि तुमच्या पिरेड्सच्या तारखा जवळपास असतील तर हमखास या दिवसात पिरेड्स पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. तुमच्यापैकी अनेकांनी बाजारात मिळणाऱ्या या गोळ्या घेतल्या असतील(नसतीलही)किंवा तुम्ही आता घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. तुम्ही पिरेड्स चुकवण्यासाठी जी गोळी घेता त्याचे दुष्परिणाम तुम्ही कधी माहीत करुन घेतले आहेत का? काय म्हणता नाही! मग तुम्हाला या काही गोष्टी माहीत असायलाच हव्यात.
Table of Contents
पिरेड्समध्ये तुम्हालाही होतो का त्रास मग तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात
म्हणून तर तुम्ही घेत नाहीत ना गोळ्या?
आजही आपल्याकडे पूजा, मंगलकार्य या दरम्यान पिरेड्स आले की, अशुभ मानले जाते. त्यामुळे जर घरात मंगलकार्य असेल तर मुलीच्या पिरेड्सच्या तारखेचा आधी विचार केला जातो. जर एखाद्या मंगलकार्यासाठी पिरेड्स अडथळा ठरत असेल तर मुलींना काही गोळ्या घेण्यासाठी सांगितले जाते. अनेकदा डॉक्टरांचा सल्ला न घेता अनेकजण एकमेकींचे पाहून या गोळ्यांचे सेवन करतात आणि त्यानंतर त्याचे होणारे परिणाम हे भयावह असतात. जे तुम्हाला गोळ्या घेण्याआधी माहीत हवेत.
पिरेड्स चुकवण्याच्या गोळ्या घेतल्यामुळे होऊ शकतो हा त्रास (Side effects of periods delay tablets)
-
ब्लीडिंगचे दिवस वाढतात
पिरेड्सच्या गोळ्या तुम्ही जितके दिवस घेता तितके दिवस तुम्हाला पिरेड्स येत नाही. तुम्ही ज्या दिवशी त्या गोळ्या घेणे थांबवता त्या दिवसापासून त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला पिरेड्स यायला सुरुवात होते. आता तुम्ही तुमच्या नैसर्गिक प्रक्रियेला आव्हान करताय म्हटल्यावर त्याचा काहीना काही त्रास नक्कीच होणार नाही का? दिवस पुढे ढकलल्यामुळे तुम्हाला पिरेड्स आल्यानंतर जास्त दिवसांसाठी ब्लीडिंग होऊ शकते.
उदा. तुम्हाला जर इतरवेळी 3 ते 4 दिवस पिरेड्स येत असतील तर तुम्हाला गोळ्यांचे सेवन केल्यानंतर 5 ते 6 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस रक्तस्राव होऊ शकतो. काहींना या दिवसात होणाऱ्या अतिरक्तस्रावामुळे ताप, कणकण, अंगदुखी असे देखील त्रास होतात.
-
पिरेड्स होतात अनियमित
एकदा गोळ्या घेऊन पिरेड्सची तारीख चुकवल्यानंतर तुम्हाला दर 28 दिवसांनी येणाऱ्या पिरेड्सची तारीख बदलू शकते. एकदा गोळी घेतल्यानंतर ते वारंवार होते. तुमच्या पिरेड्सच्या तारखांमध्ये अनियमितता होऊ लागते. एकदा पिरेड्स अनियमित झाले की, ते पुन्हा नियमित करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो.
उदा. तुम्हाला या महिन्याच्या 1 तारखेला पिरेड्स आले. जर तुम्ही गोळ्यांचे सेवन केले असेल तर तुमच्या पुढील येणाऱ्या पिरेड्सची तारीख बदलू शकते ती पुढे जाऊ शकते किंवा ती खूप आधी तरी येऊ शकते किंवा तिला फार उशीरही होऊ शकतो. जर तिला येण्यास उशीर झाला तर त्याचा अधिक त्रास तुम्हाला होतो. या काळात तुम्हाला पोटदुखी होऊ शकते.
-
सतत चिडचिड होणे
पिरेड्स आल्यानंतरच महिलांची होणारी चिडचिड आपल्याला माहीत आहे. या काळात काहींना सतत राग येतो. काहींना सतत काही तरी खावेसे वाटते. काही क्षणार्धात काही गोष्टींचे वाईट वाटते यालाच आपण Mood swing असे म्हणतो. तुमच्या पिरेड्सच्या तारखा चुकल्यानंतर तुमची चिडचिड अधिकच वाढते. हे Mood swing अधिक त्रासदायक होतात. जेव्हा तुमचे पिरेड्स चुकतात.
उदा. सतत एखाद्यावर चिडणे. कारण नसताना वाद घालणे किंवा स्वत:लाच त्रास करुन घेणे.
पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत करण्यासाठी करा हे उपाय
-
थकवा येणे
पिरेड्समध्ये महिलांच्या शरीरातील वाईट रक्त लघवीवाटे बाहेर पडत असते. गर्भाशय स्वच्छ ठेवण्याची ही प्रकिया महिलांसाठी अत्यंत महत्वाची असते. यामुळे थकवा येणे साहजिकच आहे.शिवाय या काळात होणारी पोटदुखी आणि अंगदुखीदेखील अनेकींना नकोशी होते. गोळ्यांच्या सेवनानंतर तुमचे पिरेड्स चुकवता येत असतील पण त्या काळात येणारा थकवा टाळता येत नाही. उलट तुम्हाला तुलनेने अधिक थकवा लागतो. तुम्हाला काम करण्याची इच्छा होत नाही. तुम्ही या दिवसात काम टाळण्याचा प्रयत्न करता.
उदा. या कालावधीत तुम्हाला बाहेर जावे असे अजिबात वाटत नाही. ज्या ठिकाणी शरीराने अधिक उपस्थित राहावे असे वाटत असेल अशा ठिकाणी तुम्ही जाण्याचे सतत टाळता.
-
हात पाय सुजणे
गोळ्यांच्या याच सेवानाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होत असतो. गोळ्यांच्या सेवनामुळे हात पाय सुजण्याच्या तक्रारी देखील अनेक महिलांना होतात. अनेकांना हा त्रास हमखास होतो. इतरवेळी होणाऱ्या पिरेड्स त्रासाच्या तुलनेत हा त्रास महिलांना अधिक होत असतो. हातापायांची सूज घालवण्यासाठी तुम्ही अधिक गोळयांचे सेवन करता जे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.
-
झोप कमी होणे
वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही एका नैसर्गिक गोष्टीला चॅलेंज करायला जाता म्हटल्यावर त्याचे दुष्परिणाम आलेच. त्यातीलच एक दुष्परिणाम आहे. झोप कमी येण्याचा… गोळ्यांच्या सेवनाचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. अनेकांना या दिवसात एक तर फार झोप येते किंवा त्यांना काहीच झोप येत नाही. त्यांना कायम काहीतरी चुकल्यासारखे वाटते. मनात सतत विचार येत राहतात. मन अस्थिर झाल्यामुळे त्यांना झोपण्यास अडथळे येतात.
-
पिंपल्स येणे
अनेकांना पिरेड्स येण्याआधी पिंपल्स येतात. अनेकांना पिंपल्स आले की, समजते आता आपल्याला पिरेड्स येणार आहेत. गोळ्यांच्या सेवनानंतर तुम्हाला लगेच पिंपल्स येत नाहीत. पण ज्यावेळी तुम्ही यांचे सेवन थांबवता त्यावेळी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. तुमच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा अधिक पिंपल्स येतात. जर तुम्ही जास्त गोळ्यांचे किंवा सतत क्षुल्लक कारणांसाठी गोळ्यांचे सेवन करत असाल तर याचा त्रास तुम्हाला जास्त होऊ लागतो.
बिकिनी वॅक्ससंदर्भात तुम्हाला ही माहिती नक्कीच हवी
-
अनावश्यक केस उगवणे
तुम्ही गोळ्या घेऊन तुमच्या हार्मोन्सना चॅलेंज करता त्यामुळे तुम्हाला अनावश्यक केस उगवण्याचा त्रास होऊ शकतो. हे अनावश्यक केस ओठांवर, ओठांखाली, हनुवटीवर, कानांवर, चेहऱ्यावर कुठेही उगवू शकतात.
अशा अनावश्यक केसांसाठी तुमच्याजवळ लेझरशिवाय काहीच पर्याय नसतो.
-
अंगावरुन सतत पांढरे जाणे
काहींना अंगावरुन पांढरे जाण्याचा त्रास कायमच असतो. त्यामुळे त्यांना कायमच थकवा जाणवतो. पण गोळ्यांच्या सेवनानंतर शरीरावरुन पांढरे जाण्याचा अधिक त्रास होतो.
-
छाती जड होणे
स्तन जड होण्याचा त्रास अनेकांना होतो.अनेकांना स्तन आणि स्तनाग्रांकडे फार दुखते. हा त्रास तुम्हाला पिरेड्स येण्यापूर्वी होतो.पण एकदा पिरेड्स चुकले की, मग ते येईपर्यंत हा त्रास अनेक महिलांना होत राहतो. त्यामुळे या दिवसात ब्रा घालण्याची इच्छाही होत नाही.
हे ही असू द्या लक्षात
- आता हे असे काही दुष्परिणाम आहेत जे तुम्हाला गोळयांच्या सेवनानंतर लगेचच जाणवू शकतात. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे याच्या अतिसेवनाचा परिणाम तुमच्या गर्भाशयावरही होऊ शकतो.
- त्यामुळे तुम्हाला अत्यंत आवश्यक कारणासाठी या गोळ्या घ्यायच्या असतील तर सगळ्यात आधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणचाही सल्ला घेऊन गोळ्या घेण्यापेक्षा तुम्ही सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- क्षुल्लक कारणांसाठी फक्त पॅड घेण्याचा कंटाळा म्हणूनही अनेक जण गोळ्या घेतात. अशा गोळ्या घेणे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक असते.
- भारतात अनेक ठिकाणी या गोळ्या मिळतात. त्यांचे योग्य सेवन करणे माहीत नसेल तर केवळ इंटरनेटवर गुगल करुन त्यांचे सेवन करु नका.
आजही अनेक ठिकाणी महिलांना बसवले जाते बाजूला
पिरेड्समध्ये आजही महिलांना अनेक ठिकाणी घरातील कामे करु दिली जात नाहीत. त्यांना बाजूला बसवले जाते. त्यामुळे मंगलकार्याचा विचार करुच शकत नाही. त्यामुळे अनेक जणींना अशा गोळ्या घेण्याचा सल्ला घरी दिला जातो. जर तुम्ही देखील असा सल्ला तुमच्या मुलींना,नातीला किंवा कोणत्याही मुलीला देत असाल तर तसे करु नक. पिरेड्स ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.तिला जेव्हा यायचे तेव्हा येऊ द्या.
तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:
PCOD Symptoms, Causes & Treatment In Marathi