मासिक पाळी हा प्रत्येक महिलेसाठी अत्यंत हायजिनिक आणि वेगळा विषय असतो. कारण मासिक पाळीचा अनुभव हा प्रत्येक महिलेचा वेगळा असतो. मात्र कमी जास्त प्रमाणात होणारा त्रास हे कॉमन आहे. विशेषतः मासिक पाळीच्या दिवसात वापरण्यात येणाऱ्या पॅडमुळे होणारा त्रास, येणारे रॅशेस आणि रात्री न लागणारी झोप हे अनुभव प्रत्येक महिलेला असतात. मासिक पाळीच्या दिवसात काय करावे आणि कसे वागावे अथवा पॅड्सचा कसा वापर करावा याच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांकडूनही हे सल्ले देण्यात येतात. तुम्ही नैसर्गिक आणि ऑर्गेनिक सॅनिटरी पॅडचा वापर केल्यास, त्याचा त्रास होणार नाही. एका शोधानुसार हे सिद्ध झाले आहे. यामध्ये रियुजेबल आणि वॉशेबल पॅड्सशिवाय कमर्शियल सॅनिटरी पॅड्सचादेखील उल्लेख आहे. वास्तविक बाजारातील पॅड्समध्ये नैसर्गिक घटक खूपच कमी असतात आणि यामध्ये अनेक पेस्टिसाईड्स आणि केमिकल्स असतात, ज्यामुळे रॅश येण्यासारखे आणि व्हजायना (vigina) कोरडी होण्यसारख्या अनेक प्रकारांना सामोरे जावे लागते. ज्यांना पहिल्यापासून या समस्या असतात त्यांच्यासाठी मासिक पाळीचे दिवस हे अधिक त्रासदायक ठरतात. त्यामुळे कसे पॅड्स वापरावेत जेणेकरून तुम्हाला याचा त्रास होणार नाही याची माहिती आम्ही देत आहोत.
1. ऑर्गेनिक आणि आरामदायी पॅड्सचा करा वापर
Shutterstock
तुम्ही अनेक पॅड्सचा आतापर्यंत नक्कीच वापर केला असणार. पण कॉटनचे पॅड्स हे सर्वात जास्त चांगले पॅड्स सिद्ध होतात. तुम्हाला रियुजेबल पॅड्स योग्य वाटत नसतील अथवा तुम्ही ऑर्गेनिक टॅम्पून्ससह कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही अशा वेळी कॉटनचे कव्हर्स (Cotton Pads) असणारे पॅड्स वापरा. यामुळे तुम्हाला मासिक पाळीच्या दिवसात रॅशेसचा आणि योनी सुकण्याचा त्रासही होणार नाही. तसंच तुमची त्वचा खेचली जात असेल तर त्याचाही त्रास तुम्हाला या दिवसात होणार नाही.
मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला
2. इंटिमेट वाईप्सचा करा वापर
मासिक पाळीदरम्यान तुम्ही इंटिमेट एरिया (योनिचा भाग जिथून अशुद्ध रक्त येते) स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर योनीची स्वच्छता योग्य होत राहिली तर बॅक्टेरियल वाढ होत नाही आणि त्यामुळे खाज येणे अथवा रॅश येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत नाही. अन्यथा अनेकांना मासिक पाळीच्या दिवसात या दोन्ही समस्यांशी झुंजावे लागते. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी इंटिमेट वाईप्सचा (सुगंधी अथवा केमिकल्स असणारे अजिबात वापरू नका) वापर करा. लक्षात ठेवा की, हे वाईप्स असे असावेत ज्याने योनीचा भाग कोरडा राहणार नाही.
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय
3. गरम पाणी प्या
Shutterstock
तसं तर गरम पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने कधीही चांगलेच. पण विशेषतः मासिक पाळीच्या दिवसात तुम्हाला याचा अधिक उपयोग होतो. पोटातील क्रॅम्प्स आणि पोट फुगणे यामुळे मासिक पाळीच्या दिवसात अधिक त्रास होतो. पण गरम पाणी प्यायल्याने शरीरामध्य वॉटर रिटेन्शन होत नाही आणि त्यामुळे ब्लोटिंग अर्थात पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. तसंच गरम पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या दिवसात येणारे पोटातील क्रॅम्प्स थांबण्यासही मदत मिळते. यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो आणि पॅड्स सतत बदलावे लागत नाहीत. गरम पाणी जरी प्यायलात तरी साधारण पाच ते सहा तासांनी नियमित पॅड्स बदलत राहावे. जास्तीत जास्त नैसर्गिक आणि कॉटनच्या पॅड्सचा वापर करावा. प्लास्टिक आणि अन्य पॅड्सचा वापर करू नये.
मासिक पाळी…समज कमी गैरसमज जास्त
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक