ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
raksha bandhan movie

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘रक्षा बंधन’ मधील गाणे प्रदर्शित 

सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘रक्षा बंधन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘रक्षा बंधन’चा ट्रेलर रिलीज केला आणि आता चित्रपटातील ‘तेरे साथ हूं मैं’ हे गाणेही रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या सुंदर नात्याच्या कथेवर आधारित आहे. ज्यात एक भाऊ त्याच्या चार बहिणींच्या चांगल्या भविष्याची जबाबदारी घेतो. भावाला आपल्या बहिणींचे लग्न चांगल्या घराण्यात व्हावे असे वाटते. भावा-बहिणीच्या सुंदर व प्रेमळ नात्याची झलक चित्रपटाच्या गाण्यातही पाहायला मिळते आहे, तसेच या गाण्याचे बोलही हृदयाला भिडणारे आहेत.

हुंडापद्धतीवर भाष्य करणारा चित्रपट 

अक्षयचा ‘रक्षा बंधन’ चित्रपट भावा-बहिणीच्या सुंदर व पवित्र नात्याची झलक तर दाखवतोच शिवाय हुंडा या वाईट प्रथेवरही भाष्य करतो. या चित्रपटात अक्षय हा चार बहिणींचा भाऊ झाला आहे. तसेच त्याची प्रेमकथा देखील प्रेक्षकांना बघायला मिळेल., त्यामुळे तुम्हाला चित्रपटात गुदगुल्या करणाऱ्या हसऱ्या क्षणांसह काही इमोशनल सीन्स देखील पाहायला मिळतील. आनंद एल राय दिग्दर्शित अक्षय कुमार स्टारर ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अवस्था खूपच वाईट होती, तर त्याआधी आलेल्या बच्चन पांडेलाही बॉक्स ऑफिसवर खास यश मिळाले नव्हते. त्यामुळे आता अक्षयला रक्षाबंधन या चित्रपटाकडून खूप आशा आहेत, पण त्याच दिवशी आमिर खान आणि करीना कपूर खानचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत दोन मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांमध्ये जबरदस्त स्पर्धा बघायला मिळेल.

Raksha Bandhan Movie
Raksha Bandhan Movie

अक्षय व भूमी पुन्हा एकदा दिसणार एकत्र 

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची जोडी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. याआधी दोघेही ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसले होते आणि दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. आता हे दोघं पुन्हा एकत्र दिसणार असल्यानं या जोडीची जादू यावेळी बॉक्स ऑफिसवर चालेल का याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वीच रिलीज झालेल्या रक्षाबंधनच्या ट्रेलरला यूट्यूबवर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता ‘तेरे साथ हूँ मैं’ हे रक्षाबंधन मधील पहिले गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात भावा-बहिणीचे प्रेम आणि घट्ट असलेले नाते दाखवण्यात आले आहे. या गाण्यात अक्षय त्याच्या  बहिणीच्या लग्नात कन्यादान करताना दिसतो आहे. हे गाणे रिलीज झाल्याच्या काही तासांतच दहा लाखांच्या क्लबमध्ये सामील झाले आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट यावर्षी रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

प्रेक्षकांना भावले इमोशनल गाणे  

‘तेरे साथ हूं मैं’ या गाण्याच्या सुरुवातीला अक्षयच्या बहिणीच्या (सादिया खतीब) लग्नाचे विधी पार पाडले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. यादरम्यान अक्षय कुमार आपल्या बहिणीला हळद लावतोय. यानंतर तो आपल्या बहिणीला लग्नाच्या दिवशी तयार होण्यास मदत करतोय. आणि नंतर आपल्या बहिणीला उचलून लग्नाच्या मंडपात घेऊन जातोय. तो आपल्या बहिणीचे कन्यादान करत आहे आणि शेवटी बहिणीची सासरी पाठवणी करताना ढसाढसा रडतोय असे दाखवण्यात आले आहे. 

ADVERTISEMENT

तेरे साथ हूं मैं हे गाणे निहाल तौर यांनी गायले आहे व त्याला संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे. या गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. रिलीज झाल्यानंतर दोन तासांत या गाण्याला 16 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यात सातत्याने वाढ होत आहे. या चित्रपटात सादिया खतीब, सहजमीन कौर, दीपिका खन्ना आणि स्मृती श्रीकांत या अक्षय कुमारच्या बहिणींची भूमिका साकारत आहेत.

रक्षा बंधन 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

30 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT