मराठी सिनेसृष्टीत नवा ट्रेंड सुरू झालाय. आपल्या गोड बातमी किंवा कोणतीही नवीन घडामोड आपल्या Insta, Tweet किंवा FB वर शेअर करायची. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रसिद्ध जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना कन्यारत्न झाल्याची बातमी आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. त्या आधी उर्मिलाच्या डोहाळे जेवणाचे https://www.instagram.com/p/Bqv9zbcBz1Q/
फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उर्मिला आणि आदिनाथ दोघंही सोशल मीडियावर सक्रीय असल्याने त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण ते नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच उर्मिलाने तिचा आणि लेकीचा म्हणजेच ’जिजाचा’ फोटो ही सोशल मीडियावर शेअर केला होता.
प्रिया-उमेश ही लवकरच देणार गोड बातमी
मराठी सिनेसृष्टीतली आणखीन एक जोडी लवकरच गोड बातमी देणार आहे, असं दिसतंय. हो.. आम्ही उमेश कामत आणि प्रिया बापटबद्दलच बोलतोय. नुकतंच प्रियाने तिच्या इंस्टा अकाऊंटवरुन ‘एक गुड न्यूज आहे’ या मथळ्याखाली एक गोड फोटो पोस्ट केलाय. त्या फोटोत या दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव पाहून तरी हेच वाटतयं की, त्यांच्याकडे नक्कीच गोड बातमी आहे. आता ही नक्की गोड बातमी काय आहे?, यासाठी मात्र वाट पाहावी लागेल.
प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरी
सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रिया- उमेशने लग्न केलं. तिचा अल्लड आणि बालिश स्वभाव आहे तर उमेश काहीसा गंभीर स्वभावाचा. त्यात दोघांच्या वयातही बरंच अंतर आहे. विशेष म्हणजे उमेशने नाही तर खुद्द प्रियाने त्याला लग्नाची मागणी घातली होती. त्यामुळे या दोघांच्या लग्नामुळे त्यांचे फॅन्स खूप खूश झाले आणि त्याचबरोबर थोडेसे सरप्राइजसुध्दा.
वाचा – प्रेग्नंट महिलांसाठी खास गिफ्ट आयडियाज
होकार-नकाराची गंमत
2003 साली प्रिया आणि उमेशची भेट झाली होती. त्यानंतर तब्बल 3 वर्षांनी म्हणजेच ऑगस्ट 2006 साली प्रियाने उमेशला लग्नाची मागणी घातली होती. मात्र लग्नासाठी होकार असूनही उमेशने महिनाभर तिला काहीच उत्तर दिलं नव्हतं. अखेर प्रियाच्या वाढदिवशी त्याने प्रियाला लग्नासाठी होकार दिला. उमेश 2006 सालापर्यंत चित्रपटसृष्टीत तसा स्थिरावला नव्हता. त्यामुळे प्रियाच्या घरातून त्यांच्या लग्नाला नकार होता. मात्र दोघांना ही आई-बाबांच्या विरोधात जायचं नव्हतं. त्यामुळे चार ते पाच वर्षे त्यांनी वेळ घेतला आणि आई-बाबांची समजूत घातली. अखेर 2011 च्या ऑक्टोबरमध्ये त्यांचं शुभमंगल झालं.
‘रिअल आणि रील लाईफ’ जोडपं
उमेश आणि प्रिया यांचं हे ‘रिअल लाईफ’ जोडपं त्यांच्या चाहत्यांना जितकं आवडलं तितकचं ते ‘रील लाईफ’ मध्येही नेहमीच पसंती मिळवत आलं आहे. त्या दोघांचा ही ‘टाईम प्लीज’ हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला होता. खरं तर हा चित्रपट नवा गडी नवा राज्य या त्यांच्या नाटकावरुन बेतला आहे. या नाटकातही त्या दोघांनीच काम केलं होतं. लग्नाआधी त्यांनी त्यांनी शुभंकरोती या मालिकेत एकत्र काम केलं आहे. मात्र अनेक वर्षे त्यांचे फॅन्स त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाच्या किंवा नाटकाच्या प्रतिक्षेत आहेत. पण त्यानंतर या दोघांनीही बरेच वर्षे एकत्र काम केलं नाही. त्यामुळे चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
फोटो सौजन्य- Instagram