स्वतःची गाडी खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वतःची गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेता तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. स्व-कमाईने कार खरेदी करणं हा एक रोमांचक अनुभव असतो. तुम्ही तुमच्या नव्या गाडीत ड्रायव्हरच्या सीट बसलेले आहात आणि तुमच्या प्रियजनांसोबत लॉंग ड्राईव्हवर जात आहात ही गोष्टच किती सुखावह आहे. पण हे चित्र अनुभवण्यासाठी थोडासे कष्ट आणि खर्च करणं भाग आहे. यासाठीच जाणून घ्या पहिल्यांदा कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टी माहीत असायला हव्या.
फोर व्हिलर विकत घेण्यापूर्वी या गोष्टींचा करा विचार –
पहिल्यांदाच जर तुमची ड्रीम कार विकत घेत असाल तर या टिप्स जरूर वाचा.
गाडी घेण्यामागचा हेतू ठरवा-
कारमुळे जीवन अगदी सुसह्य आणि सोयीचे होते. शिवाय आजकालच्या जीवनशैलीत प्रत्येकाकडे फोर व्हिलर असणं अगदी महत्त्वाचं झालं आहे. मात्र तुमच्या गरजा ओळखूनच गाडी विकत घ्या. तुमच्या घराची पार्किंग, तुमचा नेहमीचा प्रवास, घरातील माणसं या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही गाडी विकत घेण्यापूर्वी करायला हवा. तुम्हाला गाडी नेहमीच्या प्रवासासाठी हवी की कधीतरी कुटुंबासोबर प्रवास करण्यासाठी हे पक्कं ठरवा. त्यानुसारच तुमच्या गाडीची निवड करा.
कारसाठी तुमचं बजेट ठरवा –
बऱ्याचदा असं होत की तुम्हाला जी गाडी हवी असते ती तुमच्या बजेटमध्ये नसते. असं असेल तर गरज नसताना उगाचच तुमच्या बजेटपेक्षा अती खर्चाची गाडी खरेदी करू नका. कारण गाडी घेतल्यावरदेखील असे अनेक खर्च असतात जे तुमच्या बजेटमध्ये असायला हवे. म्हणूनच गाडी घेण्यापूर्वी तुमचं बजेट ठरवा आणि त्या बजेटमध्येच गाडी घ्या.
काही दिवस रिसर्च, रिसर्च आणि फक्त रिसर्च करा –
एकदा तुमचे गाडी विकत घेण्याचे बजेट ठरले की त्वरीत सर्च करायला सुरवात करा. कारण कोणतीही गोष्ट विकत घेण्यापूर्वी त्याबाबत रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. कारण या बजेटमध्ये तुम्हाला अनेक गाड्यांचे पर्याय उपलब्ध असतात. मात्र त्यामधून नेमकी कोणती गाडी विकत घ्यायची हे ठरवण्यासाठी तुम्हाला रिसर्च करावं लागेल. कारण प्रत्येक गाडीचं मायलेज. मेंटनेन्सचा खर्च, रिपेअरचा खर्च, गाडीची अंर्तगत सजावट या गोष्टी वेगवेगळ्या असतात. या सर्व गोष्टी तुम्हाला आधीच माहीत असायला हव्या. त्याचप्रमाणे तुम्ही जी गाडी विकत घेण्याचा विचार करत आहात त्या गाडीचे सर्व्हिस सेंटर तुमच्या शहरात आहे का हे जरूर बघा. कारण गाडी घेतल्यावर तुम्हाला कमीत कमी वर्षातून एकदा तरी तिथं जावंच लागणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर सर्व्हिस सेंटर जवळ असणं महत्त्वाचं आहे.
एकापेक्षा अधिक डिलर्सची भेट घ्या –
गाडी घेण्यासाठी कोणत्याही एकाच डिलरकडे जावू नका. कारण निरनिराळ्या डिलर्सकडे जाण्यामुळे तुम्हाला एखादी चांगली डिल मिळू शकते. यासाठीच कोणत्याही डिलरला पटकन कमीटमेंट देऊ नका यासाठी थोडासा जास्त वेळ घ्या. सर्वांकडून कोटेशन घेऊन तुम्हाला चांगलं डिस्काऊंट देणाऱ्या डिलरकडून गाडी विकत घ्या. शिवाय गाडी घेताना ती पेट्रोलवर चालणारी असावी की डिझेलवर याचाही आधीच विचार करा. गाडीची ऑन दी रोड किंमत प्रत्येक शहर आणि डिलरनुसार बदलत असते.
तुमच्या जमाखर्चात संतुलन ठेवा –
गाडी घेण्यापूर्वी तुमची बचतीचा हिशोब ठेवा. जर तुम्हाला गाडी लोनवर विकत घ्यायची असेल तर ते वेळेवर घ्या. तुमचा ई.एम.आय कधी आणि कितीचा असेल हेही आधीच विचारात घ्या. लोन घेण्यापूर्वी तुमची बॅंक या कर्जावर किती इंट्रेस्ट रेट घेत आहे हे ही बघा.
कधीच गाडी खरेदी करण्याची घाई करू नका –
गाडी घेण्याचा विचार केल्यावर डाऊन पेंमेट करून कधी एकदा गाडी बुक करणार असं प्रत्येकाला झालेलं असतं. पण असं मुळीच करू नका. थोडं थांबा आणि नीट विचार करा. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील पहिली कार घेत आहात. हा अनुभव तुमच्यासाठी नक्कीच खास असणार आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक निर्णय घ्या.
स्वतःची कार असलेल्या लोकांना अनुभव विचारा –
तुम्हाला गाडी घेताना योग्य मार्गदर्शन फक्त तेच लोक देऊ शकतात. ज्यांच्याकडे स्वतःची गाडी आहे. म्हणूनच तुम्ही जी कार घेण्याचा विचार करत आहात तिच्याविषयी ती गाडी चालवणाऱ्या लोकांना विचारा. तुमचे शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी ज्यांच्याकडे ती कार असेल त्यांना याबाबत नक्की विचारा. ज्यामुळे तुम्हाला तुमचा निर्णय घेणं सोपं जाईल.
कारची रिसेल वॅल्यू काय असेल हे तपासा –
जर आज तुम्ही गाडी विकत घेण्याचा विचार करत आहात तर काही वर्षांनी तुम्ही तुमची कार अपग्रेड नक्कीच कराल. म्हणूनच आताच त्या कारची रिसेल व्हॅल्यू तपासून ठेवा. पाच ते दहा वर्षांनी तुम्ही जेव्हा नवीन गाडी विकत घ्याल तेव्हा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. बऱ्याचदा ज्या गाड्यांचे स्पेअर पार्ट सहज उपलब्ध होतात त्यांची रिसेल व्हॅलू जास्त असते.
टेस्ट ड्राईव्ह घ्या –
कोणत्याही गाडीवर पैसे खर्च करण्यापूर्वी ती गाडी चालवताना तुम्हाला कसं वाटतं ते महत्त्वाचं ठरतं. यासाठीच शोरूममध्ये गाडीची टेस्ट ड्राईव्ह दिली जाते. त्यामुळे गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला मुळीच विसरू नका.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
Viral Video : समुद्रकिनाऱ्यावर कार नेण्याआधी ‘हा’ व्हिडीओ नक्की पाहा