ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
परफ्यूम खरेदी करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

परफ्यूम खरेदी करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

कुठेही बाहेर जाताना आपल्याला शरीराला आलेला घामाचा वास नक्कीच आवडत नाही. शरीराला आलेला घामाचा वास, चिकटपणा आणि दुर्गंध दूर करण्यासाठी आंघोळ करण्याव्यतिरिक्त आपण परफ्यूमचाही वापर करतो. शरीरातून घामाचा दुर्गंध आला तर आपलं व्यक्तिमत्व खराब होतं आणि आपल्याला लाजही वाटतं. याशिवाय परफ्यूम लावल्यानंतर आपल्याला सुगंधामुळे अधिक चांगलं आणि ताजेतवाने वाटते. आपल्याला नेहमी चांगले वाटावे यासाठी आपण परफ्यूमचा वापर तर करतोच. पण परफ्यूम खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. परफ्यूम खरेदी करताना येणारा सुगंध आणि आपल्या शरीराला लावल्यानंतर येणारा सुगंध यामध्ये फरक असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याबद्दल सांगणार आहोत. 

व्यक्तिमत्व घ्या लक्षात

Shutterstock

जेव्हा तुम्ही परफ्यूम खरेदी करता तेव्हा आपलं व्यक्तिमत्व कसं आहे याकडे नक्की लक्ष द्या. नेहमी असंच परफ्यूम खरेदी करा जे तुमच्या व्यक्तिमत्वाला सूट करू शकेल. अर्थात आपलं जसं व्यक्तिमत्व आहे आणि लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणेच तुम्ही परफ्यूमची निवड करा. तुमचं व्यक्तिमत्व बोल्ड असेल तर तुम्ही स्ट्राँग परफ्यूम वापरा. पण तुमचे व्यक्तिमत्व शांत स्वभावाचे असेल तर तुम्ही लाईट सुगंधाचे परफ्यूम वापरा. तुमच्या आवडीनुसार परफ्यूम घेताना तुम्ही मुळात कसे आहात हेदेखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण बरेचदा तुम्ही शांत स्वभावाचे असाल आणि तुम्ही स्ट्राँग परफ्यूमचा वापर केला तर दिवसभर डोकं दुखत राहू शकतं.  त्यामुळे तुमच्या स्वभावानुसारच तुम्ही परफ्यूम निवडा. 

ADVERTISEMENT

परफ्यूम शरीरावर स्प्रे करून तपासा

Shutterstock

फारच कमी लोकांना माहीत असतं की, परफ्यूमचा सुगंध जसा ब्लॉटर पेपरवर येतो तसा शरीरावर लावल्यानंतर येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आपण चुकीचं परफ्यूम तर निवडलं नाही ना असा प्रश्न पडू शकतो. त्वचेवरील असणारे नैसर्गिक बॅक्टेरिया जेव्हा परफ्यूमसह मिक्स होतात तेव्हा त्याचा सुगंध बदलतो. त्यामुळे ब्लॉटर पेपरवर परफ्यूमचा सुगंध तपासण्याऐवजी तुम्ही तुमच्या शरीरावर त्याचा स्प्रे मारून सुगंध तपासून घ्या. त्यामुळे त्याचा खरा सुगंध तुम्हाला कळेल आणि नंतर कन्फ्यूजनही होणार नाही. तसंच परफ्यूम मारल्या मारल्या लगेच सुगंध घेऊ नका. त्यामुळे नक्की कसा सुगंध आहे हे कळत नाही आणि लगेच सुगंध घेतल्यास, डोकंही दुखतं. 

केवडा – फक्त सुगंधच नाही तर आजारांवरही आहे परिणामकारक – Benefits Of Kewra Flower In Marathi

ADVERTISEMENT

जास्त काळ राहील सुगंध

Shutterstock

जेव्हा तुम्ही परफ्यूम लावणार असाल तेव्हा लक्षात घ्या की, असा परफ्यूम घ्यावा ज्याचा सुगंध जास्त काळ टिकून राहील. तुम्हाला जर हे कळत नसेल तर तुम्ही विक्रेत्याकडून सल्ला घेऊ शकता. यामध्ये लव्हेंडर, व्हॅनिला आणि जास्मिन या तीन परफ्यूमचे सुगंध जास्त काळ टिकणारे असतात असं समजण्यात येतं. त्यामुळे परफ्यूम निवडताना तुमच्या आवडीनुसार निवडा. 

भारतीय मुलींना आवडतील असे उत्कृष्ट परफ्युम्स

ADVERTISEMENT

स्ट्राँग परफ्यूम घेऊ नका

Shutterstock

परफ्यूमची खरेदी करत असताना तुम्ही कोणता ऋतू चालू आहे हेदेखील लक्षात घ्या. उन्हाळा असेल तर अत्यंत हलका आणि फ्रेश अर्थात ताजेतवाने वाटेल अशा सुगंधाचा परफ्यूम तुम्ही निवडा. कारण उन्हाळ्यात तुम्ही स्ट्राँग परफ्यूम लावल्यास, तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही डोकंदुखीचा त्रास उद्भवू शकतो. तसंच हिवाळ्यात तुम्ही स्ट्राँग परफ्यूम लाऊ शकता. जेणेकरून त्रास होत नाही. 

तुम्ही चुकीच्या ठिकाणी तर Deodorant लावत नाही ना, लक्षात ठेवा या गोष्टी

ADVERTISEMENT

Beauty Benefits of Kewra in Hindi

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

28 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT