ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
बाथरूममधील जागा व्यवस्थित वापरण्यासाठी उपयोगी टिप्स

बाथरूममधील जागा व्यवस्थित वापरण्यासाठी उपयोगी टिप्स

घरातील सर्वात जास्त स्वच्छतेची गरज असलेली जागा कोणती असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल..हॉल किंवा किचन. हो ना…पण खरं उत्तर आहे बाथरूम. कारण सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी याचा वापर करतो. घरातील एक महत्त्वाची जागा असूनही याकडे सहसा लोकांचं दुर्लक्षच होतं. बाथरूममध्ये तुम्ही शँपूपासून कपड्यांच्या साबणापर्यंत सर्व ठेवता. पण तुम्ही कधी बाथरूम ऑर्गनाइज ठेवण्याबाबत विचार केला आहे का? ज्यामुळे बाथरूमही छान आणि सुटसुटीत दिसेल. अनेकदा महिलांची तक्रारही असते की, घर नीट ठेवता येतं. पण बाथरूममध्ये सजावटीसाठी काही करता येत नाही. आता परिस्थिती बदलत आहे. आज आम्ही तुम्हाला बाथरूमलाही कसा छान मेकओव्हर देता येईल याबाबत सांगणार आहोत.

Home Decor Tips : घराला सजवताना लक्षात घ्या या गोष्टी

Canva

ADVERTISEMENT

फ्लोटिंग शेल्फ्स जर तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये ब्युटी प्रोडक्ट्स ठेवायचे असतील तर तुम्ही फ्लोटिंग शेल्फ्स बनवून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला सकाळी तयारी करताना कोणत्याही प्रोडक्ट्सना शोधण्यात वेळ घालवावा लागणार नाही आणि ही कपाटं दिसायलाही छान असतात. ही कपाटं तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला होम डेकोरच्या दुकानात ही कपाटं मिळतील.

दरवाज्याच्या वापर बरेच जणांकडे बाथरूमच्या दरवाज्याच्या वर किंवा तुम्ही सामान ठेवण्यासाठी दरवाज्याचाही वापर करू शकता. जिकडे आपल्यापैकी बऱ्याच जणांचं लक्ष जात नाही. बाथरूमच्या वरच्या जागेत एखादं कपाट किंवा दरवाज्याला हूक्स किंवा रॅक अडकवून तुम्ही या जागेचाही वापर करू शकता. यामुळे तुम्हाला बाथरूममध्ये किंवा बाथरूमच्या खिडकीला मोकळं ठेवता येईल. 

हँगिग शॉवर शेल्फ जर तुमच्या बाथरूमला ऑर्गनाइज ठेवायचे असेल आणि चकाचक लुक द्यायचा असेल तर तुम्ही हँगिग शॉवर शेल्फचा वापर करू शकता. शॉवरच्या जागी तुम्ही शेल्फ लावून घेऊ शकता आणि तिथेच बॉडी वॉशपासून शँपूपर्यंत सगळं ठेवू शकता. तुम्हाला ऑनलाईन अशा प्रकारच्या शेल्फची खरेदी करता येईल. तुम्हाला यामध्ये भरपूर व्हरायटीही पाहायला मिळेल. 

स्टोरेज बास्केट जर तुम्हाला कपाटं लावून बाथरूममधील जागा वाया घालवायची नसल्यास तुम्ही स्टोरेज बास्केट हा पर्याय वापरू शकता. जे तुम्ही कधीही काढून दुसऱ्या ठिकाणीही ठेवू शकता. याला जागाही कमी लागते आणि हे कधीही स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला काढता येईल. अशा प्रकारची स्टोरेज बास्केट आजकाल ग्रोसरी मार्केट्समध्ये सहज मिळतात. 

ADVERTISEMENT

दरवाज्याच्या मागे आपण बरेचदा दरवाज्याच्या मागे सिंगल हूक टॉवेलसाठी लावतो. पण तुम्ही सिंगल हूकऐवजी तिथे मल्टी लेयर रेलिंगही लावू शकता. यामुळे तुम्ही फक्त टॉवेलच नाही अजून इतरही वापर करू शकता.

HouseTips : मुलांची खोली सजवताना लक्षात घ्या या गोष्टी

Canva

ADVERTISEMENT

मग तुम्हाला बाथरूममधील जागेचा पूरेपूर वापर करण्यासाठी उपयुक्त असलेल्या या टिप्स कशा वाटल्या. ते आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला POPxoMarathi वर अजून काय वाचायला आवडेल तेही आम्हाला सांगा. 

Vaastu Tips : घरात बासरी ठेवण्याचे फायदे

03 May 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT