ADVERTISEMENT
home / Care
Tips For Eyebrow Care Routine

आयब्रोजची अशी राखा निगा, फक्त थ्रेडिंग करणं पुरसं नाही

आयब्रोज आपल्या चेहऱ्याचा एक महत्त्वाचा भाग असतात. तुमच्या आयब्रोजवरून तुमचा लुक ठरत असतो. थ्रेडिंग करताना आयब्रोजचा शेप जरा जरी बदलला तर तुमचा लुकही त्यानुसार चेंज होतो. त्यामुळे फक्त थ्रेडिंग केलं की आयब्रोजची निगा राखली गेली असं अनेकींना वाटतं. पण तसं मुळीच नाही थ्रेडिंग करण्यासोबतच तुम्ही एक स्कीन केअर रूटिन आयब्रोजची निगा राखण्यासाठी फॉलो करायला हवं. यासाठी जाणून घ्या आयब्रोजची निगा नेमकी कशी राखावी. ज्यामुळे तुमचे आयब्रोज होतील काळेभोर आणि घनदाट

Tips For Eyebrow Care Routine

आयब्रोजची निगा राखण्यासाठी स्कीन केअर रूटिन

चांगल्या लुकसाठी तुम्ही कमी खर्चात घरच्या घरी काही टिप्स फॉलो करून तुमच्या आयब्रोजची निगा राखू शकता. 

  • थ्रेडिंग करताना जास्त प्रयोग करू नका. इतरांप्रमाणे लुक करण्यासाठी तुमच्या आयब्रोजची जाडी कमी जास्त केल्यास तुमचा लुक खराब होऊ शकतो. 
  • आयब्रोज ब्रशने तुमच्या आयब्रोज नियमित विंचरा ज्यामुळे तुमच्या भुवयांच्या केसांखालील रक्ताभिसरण सुधारते आणि भुवयांचे केस दाट होतात.
  • भुवयांचे केस कधीच स्वतः उपटून काढू नका. थ्रेडिंग करताना तज्ञ्ज ब्युटिशिअन करून भुवयांना योग्य शेप द्या.
  • भुवयांना शेप देताना त्या ट्रीम करणं आणि फक्त जास्तीचे केस काढणं अपेक्षित असतं. पण जर तुम्ही भुवया जास्त प्रमाणात सतत कोरल्या तर तुमच्या भुवयांची वाढ खुंटते. आयब्रो करताना थ्रेडिंगच्या त्रासापासून वाचण्यासाठी सोप्या टिप्स
  • भुवयांना नियमित एरंडेल तेलाने अथवा इतर कोणत्याही हेअर ऑईलने मसाज करा. तेलाने मसाज केल्यामुळे आणि विंचरल्यामुळे तुमच्या भुवया दाट होतात.दाट भुवया हव्या मग नारळाच्या तेलाचा करा असा वापर
  • भुवयांना कोरफडाचे जेल लावा ज्यामुळे तुम्हाला भुवयांना घरीच शेप देणं शक्य होईल शिवाय भुवया मऊ होतील.
  • त्वचेप्रमाणेच भुवयासुद्धा एक्सफोलिएट करणं गरजेचं आहे. यासाठी एखाद्या घरगुती स्क्रबरने आयब्रोज स्क्रब करा. यासाठी तुम्ही मध, साखर, कॉफीचा वापर करू शकता. 
  • भुवया वाढण्यासाठी आयब्रोजची वाढ करणारे सीरम केसांना लावा. 
  • मेकअप करताना ब्रो जेलचा वापर करणं टाळा. कारण त्यामुळे तुमच्या भुवया पातळ होण्याची शक्यता आहे. परफेक्ट लुकसाठी असा करा स्टेप बाय स्टेप आयब्रो मेकअप
  • डोळे आणि भुवयांचा मेकअप वेळेत काढून टाका आणि चांगले मॉईस्चराईझर रात्री झोपताना भुवयांना लावा. 
  • या साध्या आणि अगदी घरी करण्यासारख्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या भुवयांची निगा राखू शकता. त्यामुळे सतत थ्रेडिंग करून तुमचे आयब्रोज पातळ आणि विरळ होणार नाहीत. कारण आता तुमचा लुक तुमच्या घनदाट आयब्रोजमुळे आणखी छान  दिसेल. 
13 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT