सध्या महिलांना हाय वेस्ट लुक अत्यंत आवडतो आणि हेच कारण आहे की, आता हाय वेस्ट (High Waist) जीन्सशिवाय हाय वेस्ट पँट्सदेखील सध्या चलनात आहेत. या पद्धतीच्या बॉटम वेअरचे वैशिष्ट्य हे असते की, तुमच्या पायांना थोडेसे लांब अथवा बारीक दाखविण्यासाठी तुम्ही ही स्टाईल नक्कीच कॅरी करू शकता. हायवेस्ट नक्कीच अतिशय स्टायलिश बॉटम वेअर (Bottom Wear) आहे यामध्ये काहीच शंका नाही. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही ते योग्य पद्धतीने कॅरी करू शकता. पण याबाबतीत काही महिला चुका करतात. त्यामुळे संपूर्ण लुक बिघडतो. तुम्हाला ही फॅशन जेव्हा व्यवस्थित कॅरी करायची असेल तेव्हा आम्ही दिलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. या टिप्सचा वापर केल्यास, तुम्ही व्यवस्थित हायवेस्ट पँट फॅशन कॅरी करू शकता. नवे ट्रेंड फॉलो करा.
फिटिंगवर करा लक्ष केंद्रित
जेव्हा हायवेस्ट पँट स्टाईल करण्याचा आपण विचार करतोस, तेव्हा सर्वात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे तुमची पँट अधिक टाईट अथवा सैलसर असू नये. तुम्ही घट्ट पँट जर घालत असाल तर तुम्हाला नक्कीच आरामदायी वाटणार नाही. तर सैलसर पँट घातल्यास तुम्हाला बल्की वाटेल. त्यामुळे नेहमी तुमच्या हायवेस्ट पँट या फिटिंगच्या घालायला हव्यात. त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
टॉपमध्ये निवडा शॉर्ट्स लुक
तुम्ही जर हायवेस्ट पँट घालत असाल तर तुम्ही प्रयत्न करा की, तुम्ही अशा पद्धतीने स्टाईल करा की, तुमची कंबर तुम्हाला व्यवस्थित फ्लॉन्ट करता येईल. तुम्ही जेव्हा अप्पर वेअर (Uppar Wear) मध्ये थोडेसे लहान अर्थात शॉर्ट्स आऊटफिट अर्थात क्रॉप टॉप इत्यादी हायवेस्ट पँटसह अत्यंत चांगले दिसतात. तुम्ही जर हायवेस्ट पँटसह लांब आणि वाईड कपडे घालणार असाल तर तुम्हाला तुमच्या पायांचा स्लिम लुक दाखवता येणार नाही. त्यामुळे टॉप अथवा असा टी – शर्ट निवडा जो तुमच्या हिप्सच्या वरच्या बाजूला असेल अथवा लांबीला कमी असेल.
लेअरिंग करा
हेदेखील हायवेस्ट पँट स्टाईल करण्याची एक चांगली पद्धत आहे. तुम्हाला हायवेस्ट पँटसह जर क्रॉप टॉप घालून अधिक आरामदायी वाटत नसेल तर तुम्ही कोणता हंगामात हे कपडे वापरत आहात त्याप्रमाणे त्याचे लेअरिंग करा. तुम्ही या पद्धतीने क्रॉप टॉप हाय वेस्ट पँटसह जॅकेटदेखील घालू शकता. ही स्टाईल अधिक आकर्षक दिसते. तसंच तुमचा लुक यामुळे अधिक स्टनिंग दिसतो.
नॉटेड लुक
असं अजिबातच नाही की, प्रत्येक वेळी शॉर्ट अपरवेअर कपडेच हायवेस्ट पँटसह स्टाईल करायला हवेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओव्हरसाईज्ड टी शर्ट (Oversized t shirt) देखील यासह घालून स्टाईल करू शकता. वास्तविक मोठा टी शर्ट तुम्हाला वापरायचा असेल तर तो तुम्ही अगदी साध्या पद्धतीने घाला आणि कमरेवर एक गाठ मारा. हा नॉटेड लुक तुम्हाला अधिक आकर्षक दाखविण्यास मदत करतो. तसंच तुमचा मोठा टी शर्ट तुम्हाला एक स्टायलिश लुक देतो.
टक इन करा
हायवेस्ट पँट घालताना ही लहानशी लक्षात ठेवायची स्टाईलिंग टीप जी तुमचा पूर्ण लुक बदलू शकते. जर तुम्ही हायवेस्ट पँट कोणत्याही लांब शर्ट अथवा टी – शर्टसह घालणार असाल तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की, हे तुम्ही नेहमी टक इन करा. तुम्हाला हा लुक अधिक खास बनवायचा असेल तर तुम्ही यासह बेल्टचा वापरही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हायवेस्ट पँटची स्टाईल केली तर तुम्हाला अधिक एलिगंट लुक मिळतो आणि तुम्ही अधिक आकर्षक दिसता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक