ADVERTISEMENT
home / आरोग्य
रात्री शांत झोप येत नाही का, मग फॉलो करा या टिप्स

रात्री शांत झोप येत नाही का, मग फॉलो करा या टिप्स

 

रात्री वेळेवर झोपून सकाळी लवकर उठणं आरोग्यासाठी उत्तम असतं. पण आजकालची बदललेल्या जीवनशैलीमुळे लवकर झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ पाळणं शक्य होत नाही. शिवाय काम, कामाचा ताण, चिंता काळजीमुळे रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. उद्याचं प्लॅनिंग आणि भविष्यकाळाची चिंता यामुळे लवकर झोपच येत नाही. तुमचाही असा प्रॉब्लेम असेल तर ही माहीती जरूर वाचा.

रात्री लवकर झोप का येत नाही

 

आरोग्यशास्त्रानूसार माणसाने किमान सात ते आठ तास शांत झोप घेणंं गरजेचं आहे. मात्र आजही अशी अनेक माणसं आहेत जी रात्री किमान दोन ते तीन तासदेखील नीट झोपू शकत नाहीत. काहींंना अंथरूणावर पडल्या पडल्या झोप लागते तर काहीजण रात्रभर तळमळत राहतात. आजकाल झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. निद्रानाशाची अनेक कारणे असू शकतात. शांत झोप येण्यासाठी काय करावे जाणून घ्या.

  • कष्टाची कामे
  • भविष्यकाळाची  चिंता
  • अभ्यास अथवा कामाचा ताण
  • एखादा गंभीर आजार
  • टी.व्ही आणि मोबाईलची सवय, मोबाईलचे दुष्परिणाम म्हणजे झोप लवकर लागत नाही.
  • व्यसने अथवा अती कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन
  • अतीप्रवास
  • नातेसंबंधामधील ताणतणाव
  • अती व्यायाम  अथवा शारीरिक दगदग
  • नैराश्य

कुटुंबासाठी गुड नाईट मेसेज

Shutterstock

ADVERTISEMENT

रात्री वेळेवर झोपण्यासाठी फॉलो करा या सोप्या टीप्स

 

रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा – आजकालच्या दगदगीच्या जीवनात रात्री झोपण्याची वेळ पाळणं कठीण असलं तरी अशक्य मुळीच नाही. यासाठीच रात्री शक्य तितक्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

झोपेच्या गोळ्यांची सवय लावू नका – बऱ्याचदा निद्रानाश दूर करण्यासाठी अनेक लोक झोपेची गोळी घेतात. जरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने झोपेच्या गोळ्या घेत असाल तरी तुम्हाला भविष्यात या गोष्टीची सवय लागू शकते. ज्यामुळे तुम्हाला निद्रानाशातून मुक्त होणं कठीण जाऊ शकतं.

झोपण्याआधी प्रार्थना अथवा सकारात्मक पुस्तके वाचा – बऱ्याच लोकांना याचा चांगली अनुभव आलेला आहे. रात्री झोप न लागण्याचं कारण असतं. डोक्यात सुरू असलेले चिंता, काळजीचे विचार. यासाठीच रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना अथवा सकारात्मक विचार केल्यामुळे चिंता, काळजी दूर होण्यास मदत होते आणि तुम्हाला शांत झोप लागते.

झोपण्याआधी वातावरण निर्मिती करा – माणसं झोपताना टीव्ही पाहत अथवा मोबाईल पाहत झोपण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही अथवा मोबाईलच्या प्रकाशामुळे तुम्हाला झोप लागणं मुळीच शक्य नाही. उलट यामुळे तुमच्या डोळ्यांवर अधीक ताण येतो आणि मेंदूला झोपण्याचा संकेत मिळत नाही.   यासाठीच झोपण्यापूर्वी वातावरण निर्मिती जरूर करा. जसं की मंद संगीत लावा, बेडरूममध्ये मंद प्रकाशाचा दिवा लावा, झोपण्यापूर्वी अंघोळ करा, बेडशीट आणि पिलो कव्हर बदला असं केल्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगली झोप लागू शकते.

ADVERTISEMENT

रात्रीचे हलके जेवण करा – रात्री झोपताना जड आहार घेऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. जर चुकून रात्रीचे जेवण भरपूर झाल्यास शतपावली न करता झोपू नका. रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवा.

वाचा – घोरणे बंद करण्यासाठी उपाय

मेडीटेशन अथवा प्रार्थना करा – झोपताना मनात चांगले विचार असतील तर चांगली झोप लागते. चिंता,काळजीचे विचार तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत. यासाठी झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार, प्रार्थना अथवा मेडीटेशन करा ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि गाढ झोपदेखील लागेल.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

तुमच्या चपला कधी देवळाबाहेर चोरीला गेल्या आहेत का

ADVERTISEMENT

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती

रोजच्या वापरातील हे लोकप्रिय मराठी शब्द तुम्हाला माहीत आहेत का

 

29 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT