हिवाळा संपून उन्हाळ्याला चांगलीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे उबदार, लोकरीचे कपडे कपाटात ठेवून सुती आणि हलके कपडे वापरण्याची आता गरज निर्माण झाली आहे. मात्र असं असलं तरी तुम्ही तुमचे लोकरीचे कपडे कसेही कपाटात ठेवू शकत नाही. कारण जर ते व्यवस्थित ठेवले नाही तर ते कपाटातील आर्द्रतेमुळे खराब होतात आणि त्यांच्यावर जीवजंतू पोसले जातात. पुढच्या वर्षी जेव्हा वर्षभरानंतर तुम्ही गरज लागल्यावर थंडीत हे कपडे पुन्हा बाहेर काढता तेव्हा त्यांच्यावर एकतर डाग पडलेले असतात किंवा ते वापरण्यामुळे तुम्हाला आजारपण येऊ शकतं. यासाठीच जाणून घ्या उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच लोकरीचे कपडे कसे पॅक करून ठेवावे.
उन्हात वाळवून मगच ते पॅक करा –
लोकरीचे अथवा उबदार कपडे नाजूक आणि मऊ असतात. त्यामुळे नेहमीच अशा कपड्यांना जरा जास्त काळजी घेण्याची गरज भासते. मऊसूत शॉल, स्वेटर पॅक करून ठेवण्यासाठी तुम्ही टीश्यू अथवा बटर पेपर वापरायला हवा. ज्यामुळे त्यांना फंगस अथवा बूरशी लागणार नाही शिवाय त्यांचे रंगही उडाणार नाहीत. लोकरीचे कपडे प्लास्टिकमध्ये मुळीच बंद करून ठेवू नका. कारण त्यामुळे अशा कपड्यांमध्ये ओलसरपणामुळे बुरशी लागू शकते. प्रत्येक कपडा वेगवेगळ्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. ज्यामुळे ते व्यवस्छित राहतील आणि त्यांच्यामुळे तुमच्या इतर कपड्यांना इनफेक्शन होणार नाही.
कीड लागणार नाही याची काळजी घ्या –
जर तुमचे कपाट लाकडी असेल तर वर्षभर या कपड्यांमधील ओलाव्यामुळे त्यांना कीड लागू शकते. ज्यामुळे तुमचे लोकरीचे कपडे तर खराब होतीलच शिवाय त्यासोबत इतर कपड्यांनाही कीड लागेल. असे कपडे जर तुम्ही चुकूनही घातले तर तुम्हाला त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते.
कपड्यांमध्ये ठेवा कडूलिंबाची पाने
लोकरीचे कपडे आता तुम्ही किमान काही महिने वापरणार नाही. समजा कधी तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेला तरच त्याची तुम्हाला पुन्हा गरज लागणार. त्यामुळे काही महिन्यांसाठी हे कपडे असेच पडून राहणार. त्यामुळे ते आताच नीट पॅक करून ठेवायला हवे. आधीच सांगितल्याप्रमाणे बटर पेपर अथवा सूती, मलमलच्या कापडात ते गुंडाळून ठेवा. शिवाय प्रत्येक कापड वेगवेगळे पॅक करा आणि दोन कापडांच्या गुंडाळीत कडूलिंबाचा पाला भरून ठेवा. मात्र लक्षात ठेवा कडूलिंबाची पाने थेट तुमच्या कपड्यांच्या संपर्कात येता कामा नयेत. नाहीतर त्याचे डाग तुमच्या कपड्यांना लागू शकतात. यासाठी एका वेगळ्या कापडी पुरचूंडीत ही पाने गुंडाळून मी ती कपड्यांच्या मध्ये ठेवा. कडूलिंबाची पाने अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे त्यामुळे कपाटातील वातावरण निर्जंतूक होते.
लोकरीचे कपडे आणि नेहमीचे कपडे वेगवेगळे ठेवा –
पॅक करून झाल्यावर लोकरीचे कपडे आणि उन्हाळा, पावसाळ्यातील वापरण्याचे कपडे एकत्र ठेवू नका. लोकरीचे कपडे या कपड्यांपेक्षा वेगळ्या ठिकाणी ठेवा. मात्र बंद पेटी अथवा बंद कपाटात ते नक्कीच ठेवू नका. अधून मधून त्याला हवा लागेल अथवा कपाट अथवा पेटीत तुम्ही लोकरीचे कपडे नीट पॅक करून ठेवू शकता.
फोटोसौजन्य – pixels
अधिक वाचा –
उन्हाळ्यासाठी कूल आणि ट्रेंडी टॉप्स डिझाईन्स (Summer Tops For Women In Marathi)
उन्हाळात पाय टॅन होऊ नयेत म्हणून अशी घ्या काळजी (Tips On Foot Care In Marathi)