ADVERTISEMENT
home / Care
Tips to take care of curly hair while sleeping in Marathi

तुमचेही केस असतील कुरळे तर रात्री झोपताना घ्या अशी काळजी

केस सरळ असो वा कर्ली केसांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र जर तुमचे केस कर्ली असतील तर मात्र तुम्हाला थोडी जास्त निगा केसांची राखायला हवी. कारण कुरळे केस सरळ केसांच्या मानाने लवकर फ्रिजी होण्याची शक्यता असते. सध्या कर्ली केसांचा ट्रेंड असल्यामुळे अनेक जणी त्यांचे केस सरळ असले तरी मुद्दाम ते कर्ली करून घेतात. अशा वेळी तर केसांची योग्य निगा राखायलाच हवी. कुरळ्या केसांचा काळजी फक्त दिवसाच नाही तर रात्रीदेखील घ्यायला लागते. कारण रात्रीच्या वेळी कर्ली केस जास्त खराब होऊ शकतात. यासाठी रात्री झोपताना या गोष्टी ठेवा लक्षात.

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय (Kes Saral Karnyasathi Upay)

तुमची झोपण्याची पद्धत आणि पोझिशन

प्रत्येकाची झोपण्याची पोझिशन ही निरनिराळी असते. काही जण उपडी झोपतात, कोणी पाठीवर तर कुणी कुशीवर झोपतं. पण जर तुमचे केस कर्ली असतील तर तुम्ही पाठीवर झोपणं योग्य नाही. कारण पाठीवर झोपल्यामुळे तुमच्या हेअर फॉलिकल्सवर दाब येतो. ज्यामुळे केस जास्त गुंततात आणि फ्रिजी होतात. कर्ली केस सोडवणं हे महा कठीण काम असतं. त्यामुळे अशा केसांच्या मुलींनी झोपताना ते गुंतू नयेत यासाठी सावध राहायला हवं. अशा वेळी कुशीवर झोपणं सर्वात चांगलं कारण यामुळे तुमचे केस तर खराब होत नाहीतच शिवाय कुशीवर झोपणं आरोग्यासाठीही जास्त चांगलं असतं.

अशी करा लहान केसांची हेअर स्टाईल (Hairstyles For Short Hair)

ADVERTISEMENT

झोपताना पिलो कोणती वापरता

झोपताना डोक्याखाली पिलो घेण्याची सवय अनेकींना असू शकते. मात्र तुम्ही जर सुती अथवा इतर फॅब्रिकची पिलो वापरत असाल तर तुमचे केस तुटणे अथवा गुंतणे  नैसर्गिक आहे. कर्ली केस मेंटेन करण्यासाठी तुम्हाला नेहमी सॅटिन कव्हर असलेली पिलो वापरायला हवी. ज्यामुळे तुमचे केस कर्ली आणि निरोगी राहतील.

केसांची स्टाईल

तुम्ही केस मोकळे सोडता अथवा कोणती हेअर स्टाईल करता यावरही तुमच्या केसांचे आरोग्य अवलंबून आहे. कर्ली केस मोकळे सोडल्यावर खूप छान वाटत असले तरी ती ते मेंटेन करणं नक्कीच त्रासदायक असतं. त्यामुळे तुम्ही घराबाहेर जाताना जरी केस मोकळे सोडले तरी घरी आल्यावर ते लगेच बांधून ठेवा. कारण केस बांधलेले असतील तर ते खराब होण्याची शक्यता कमी होते. रात्री झोपताना केस बांधून ठेवणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. फक्त लक्षात ठेवा केसांना सॅटिनचे हेअर बॅंड लावा. ज्यामुळे ते ताणले जाणार नाहीत. 

केस सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय (Silky Hair Tips In Marathi)

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT